Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जिल्ह्यात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातील परिसरात आठही मंडळात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची व्यथा नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. विमा कंपन्यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शासन स्तरावर जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. जिल्ह्यातील कापूस, मका, सोयाबीन, बाजरी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे हवालदिल झालेला आहे. अस्मानी संकटासह…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव, ता.भडगाव येथील खेळाडूंनी जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय आणि भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित तालुकास्तरीय १७ तसेच १९ वर्षाआतील तालुकास्तरीय शालेय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात विजयी, उपविजयी होत महाविद्यालयास यश केले आहे. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेच्या सविस्तर निकालातील यशस्वी खेळाडूंमध्ये १७ वर्षाच्या आतील मुलांमध्ये जयदीप कैलास सोनवणे (१०० मी.प्रथम), मिलिंद संजय पाटील (१५०० मी.प्रथम), १७ वर्षाच्या आतील मुलींमध्ये नंदिनी सूर्यवंशी (३ कि.मी.चालणे), १९ वर्षाच्या आतील मुलांमध्ये रोहन राजेंद्र राजपूत (लांबउडी, प्रथम व १०० मी.द्वितीय), गोपाल…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी ताण, तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.व्ही.काटे होते. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी समजून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. विद्यार्थी जास्तीत जास्त तणावमुक्त राहुन परीक्षा देतील. अशा प्रकारे सहाय्य केले पाहिजे, असे मत उपप्राचार्य डॉ. ए.व्ही.काटे यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ता म्हणून उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या सादरीकरणात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय परीक्षांमध्ये विद्यार्थी तणाव मुक्त परीक्षा आणि कॉपीमुक्त परीक्षा कशी देतील, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ राहुल कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. के.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी यशस्वी होण्यासाठी कोणताही कानमंत्र नव्हे तर कठोर परिश्रम हेच तंत्र असते, असे प्रतिपादन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रा. रमेश आवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. श्याम भगवानदास अग्रवाल सर्वांगीण विकास मंडळाच्यावतीने गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी स्व. शाम अग्रवाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ.बं.हायस्कूलमधील १०० विद्यार्थ्यांना शालेय भेट वस्तूचे वाटप केले. त्याप्रसंगी ते बोलत होत. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण होते. ॲड.प्रदीप अहिरराव यांनीही मंडळाच्या उपक्रमाबाबत माहिती देतांना मैत्री कशी असते, याबद्दल उपस्थितांना सांगितले. योगेश अग्रवाल यांनी संपूर्ण मित्र मंडळ हे अग्रवाल परिवाराचा एक अविभाज्य घटक आहे, असे सांगत मंडळाचे कार्य खूपच उल्लेखनीय, प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथे सोमवारी, २ ऑक्टोबरपासून चोरट्यांची दहशत थांबता थांबत नसल्याने नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. चक्क दुसऱ्या दिवशी चाळीसगाव रस्त्यावरील भोरटेक येथील पोलीस पाटील व एका मजुरास चाकू लावून मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लांबविल्याची घटना रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली. परिसरात एका पाठोपाठ एक घटना घडत गुन्हेगार प्रवृत्तीने डोके वर काढत दरोडेखोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव रस्त्यावरील भोरटेक येथील पोलीस पाटील राजेंद्र महाजन हे त्यांच्या शेताकडे जात होते. तेव्हा मागून तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून पैसे व मोबाईल हिसकावत पसार झाले. तेथून दोनशे मीटरच्या अंतरावर विनोद…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत आणि शहापूरसह १७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. जामनेर तालुक्यात शेंदुर्णी, पहूर, नेरी, फत्तेपूर ही मोठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची गावे आहेत. त्यापैकी पहुर पेठची ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. पहुर पेठ ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव असल्याने प्रस्थापितांसह सत्ताधाऱ्यांच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक, गोंडखेल, शिंगाईत, गारखेडा, पहुर पेठ सोबत सामरोद, शहापूर, नांद्रा हवेली, कापूसवाडी तोरणाळे, पठाडतांडा, खडकी, नवीदाभाडी, गोरनाळे, एकुलती, दोंदवाडे अशा १७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर वाकोद, रोटवद, नांद्रा, हिवरखेडा तवा,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पाटणादेवी मंदिरावर जाण्यासाठी बारा वर्षापासून अद्यापही नदीवर पूल झालेला नाही. याकडे पुरातन विभाग मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. मागीलवर्षी आ.मंगेश चव्हाण यांनी हे बघितल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु पुरातन विभागाने त्याला मंजुरी दिली नाही. ते स्वतःही पूल करत नाही, यामागे त्यांचा काय उद्देश आहे. यासंदर्भात पाटणा ग्रुप ग्रामपंचायत आ.मंगेश चव्हाण यांना भेटले. त्यांनी पुलासाठी पुन्हा निधी उपलब्ध करून दिला. परंतु पुरातन विभागाच्या आडमुठे धोरणामुळे परवानगी मिळत नाही. पुरातन विभाग स्वतःही करत नाही. ते केवळ देवी जवळील पैसा, सोने, साड्या, ओटी जमा करण्यासाठी येतात आणि निघून जातात. गावातील नागरिकांनी कुठलीही जीवितहानी होऊ नये, म्हणून लोकांना जाण्यासाठी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी गेल्या ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील नगर (तांबापूरा) येथील लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील गृहोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना त्वरित मदत मिळण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन पूरग्रस्तांच्या बँकेच्या खात्यात पाच हजाराची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित दिली जाणारी रक्कमही लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते असलम काकर आणि विकार खान यांच्या नेतृत्वाखाली शफी शेख, अहेमद खान, अब्दुल बासीत, इस्माईल खान, नियाजोद्दीन शेख यांनी वारंवार मोर्चे काढून तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन पूरग्रस्तांना कोणत्याही परिस्थितीत मदत…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भाजप- शिवसेनेच्या सत्तेत सोबत आलेल्या अजित पवार यांच्या गटातील अमळनेरचे आ.अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता त्यांना नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. पालकमंत्री पद मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे नंदुरबारचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या बाहेर फटाके फोडत एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला. मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद आल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीला पोषक वातावरण मिळणार आहे. ना.पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्याने…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी धुळे येथील अजय भवनात नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, नवी दिल्ली यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी विषयाचे शिक्षक शरद भिका पाटील यांना राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपती निवासन (निवृत्त कर्नल, भारतीय सेना), शिवाजी अकलाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.धुळे), गोरख देवरे (राष्ट्रीय अध्यक्ष-नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम), प्रफुल्ल पाटील (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, नैसर्गिक मानवाधिकार परिषद फोरम) यांच्या हस्ते देण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानद सचिव…

Read More