बीसीसीआयच्या पॅनलमध्ये निवडीबद्दल संदीप गांगुर्डेंचा गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंचांची दोन दिवसीय कार्यशाळा जळगाव येथील जैन हिल्सवरील सुबीर बोस सभागृहात नुकतीच पार पडली. कार्यशाळेत जळगावसह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील ४५ पंच सहभागी झाले होते. बदललेल्या नियमांसह विविध क्रिकेट नियमांची सविस्तर चर्चेसह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व पंचांची ५० गुणांची सराव चाचणी (रिव्हिजन टेस्ट) घेण्यात आली. उद्घाटन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले. कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून अजय देशपांडे (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी जळगावचे…
Author: Sharad Bhalerao
डॉ. बेंडाळे महाविद्यालयात आयोजित विद्यापीठस्तरीय समुपदेशन कार्यशाळेत प्रतिपादन साईमत/जळगाव/जळगाव : आधुनिकीकरणामुळे आज आपण जागतिक झालो असलो तरी कौटुंबिक पातळीवर एकाकी होत आहोत. मोबाईलभोवती आपले जीवन प्रदक्षिणा घालू लागले आहे. त्यामुळे तरुण-तरुणी भावनिकदृष्ट्या संस्कारमुक्त बनत आहेत. अशा परिस्थितीत समुपदेशन अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न ‘समुपदेशनाने’ सुटतात, असे प्रतिपादन अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय विद्याशाखा-सदस्य, विद्या परिषद जळगाव कबचौउमविचे प्रा. डॉ. साहेबराव भुकन यांनी केले. जळगाव विद्यापीठ, आजीवन अध्ययन-विस्तार सेवा विभाग (पीएम-उषा) आणि डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एकदिवसीय मुला-मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन अधिष्ठाता प्रा. डॉ. भुकन यांच्या…
आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्राविरुध्द आंदोलन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) समोर उभारलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीसह रोगराई पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना घेऊन मनपाविरोधात धडक आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत संताप व्यक्त केला. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या आयुक्तांना निवेदनही दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कचऱ्याचा ढीग उघड्यावर टाकल्यामुळे माशा, डास, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी विद्यार्थी, शिक्षक, परिसरातील नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिनियम आणि…
प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम ज्ञानदेव (एस. डी.) भिरुड यांना त्यांच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’ या मान्यताप्राप्त संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून भिरुड यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम केले आहे. प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात निरपेक्ष आणि असामान्य कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी.…
ओझोनविषयी जागरूकतेचा ध्वज शाळेत फडकला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “ओझोन वाचवा – जीवन वाचवा” अशा हरित संदेशाने शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल दुमदुमून गेली. यासोबतच ओझोन दिनानिमित्त हरित संदेशांनी भगीरथ स्कुल ‘गुंजले’ होते. राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक संकल्प व्यक्त केले. त्यामुळे ओझोन दिनानिमित्त जागरूकतेचा ध्वज भगीरथ स्कूलमध्ये फडकला. शाळेतील अथर्व सोनार ह्या विद्यार्थ्यांने ओझोनचे महत्त्व अधोरेखित केले तर दीपाली इंगळे हिने ओझोन थर घटल्यामुळे होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत संवर्धनाचे आवाहन केले. याप्रसंगी किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक…
जुन्या वादातून घडली होती घटना, पोलिसांनी २४ तासात संशयित पकडले साईमत/जळगाव/प्रतिनिधी/: शहरातील मेहरूण परिसर पुन्हा एकदा ‘गुन्हेगारी टोळक्यांच्या’ दहशतीने हादरला आहे. रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ जुन्या वादातून हर्षल उर्फ ‘बब्या’ कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) या तरुणावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडलेल्या अशा घटनेत ‘बब्या’ गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अवघ्या २४ तासात संशयित आठ जणांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, जखमीचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख (वय २१, रा. मंगलपुरी, मेहरूण) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी…
राष्ट्रीय हरित सेनेतर्फे खुबचंद सागरमल विद्यालयात ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील खुबचंद सागरमल विद्यालयात सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेनेतर्फे जागतिक ओझोन दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाद्वारे ओझोनच्या संरक्षणासाठी जनसहभागाची हाक दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृतीचा वसा घेतला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, एल. एन. महाजन यांनी ओझोन थराचे महत्त्व आणि त्याच्या संवर्धनाची गरज याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिका कल्पना देवरे, योगेंद्र पवार, संजय पाटील यांच्यासह राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. ओझोन दिवस आपल्याला पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देतो. भविष्यातील पिढ्यांसाठी निरोगी पृथ्वी हवी असेल तर प्रत्येकाने ओझोन थर वाचविण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.…
विद्यार्थ्यांच्या सहभागाने उजळला ‘हिंदीचा’ गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी गीत, कवितांसह मनोगतांनी ‘हिंदी दिन’ रंगला. हा दिन शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागाने ‘हिंदीचा’ गौरव उजळला होता. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम होते. याप्रसंगी उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, हिंदी भाषा समितीचे सर्व शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजनासह माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व पटवून देणारी मनोगते व कवितांचे सादरीकरण केले. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीने कविता सादर केली तर गिरीशने मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक के. व्ही. पाटील…
‘केसीई’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘झेन जी’सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भविष्यातील विद्यार्थी घडणार असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांनी केले. गेल्या आठ दशकांहून अधिक काळ खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने शिक्षण क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत गुणवत्तापूर्ण आणि आत्मनिर्भर पिढी घडवली आहे. अशा परंपरेला पुढे नेत संस्थेचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा मनभावन संकुलातील कान्ह कला मंदिर येथे मंगळवारी उत्साहात पार पडला. त्यावेळी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे…
अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : समाजाच्या प्रगती आणि युवा पिढीच्या क्षमतेसाठी शिक्षणासह ‘आयआयटी’सारख्या उच्च दर्जाच्या तांत्रिक आणि संशोधनावर आधारित संस्थांची उभारणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अभियंता दिनानिमित्त जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष तथा विशेष सत्कारार्थी माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, प्रमुख वक्ते सत्कारार्थी महेश झगडे यांचा मानपत्र, शाल, डॉ.विश्वेश्वरय्यांची प्रतिमा, पुस्तक, चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता…