साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत ‘वर्ग ७ अन् १ शिक्षक’ अशी सद्यस्थिती आहे. शाळेची पटसंख्या १११ आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे येत्या आठवड्याभरात शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीसह पालकवर्गाने दिला आहे. येथील बस स्टँड परिसरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहे. त्यात १११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, चालू शैक्षणिक वर्षापासून शाळेला मोहम्मद वसीम शेख हे एकमेव शिक्षक आहे. त्यांच्यावर मुख्याध्यापक पदाचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे शैक्षणिक ज्ञानदान, कार्यालयीन कामकाज व बीएलओचीही जबाबदारी असल्याने मोहम्मद शेख यांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविणे व कार्यालयीन…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने, नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन, नंदुरबारतर्फे ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या १६ वी राज्यस्तरीय सबज्युनिअर नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा मुला-मुलींचा संघ जाहीर केला आहे. स्पर्धेसाठी निवड झालेला संघ रवाना झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे, उपाध्यक्ष खा. उमेश पाटील, य.प.स्कूलचे संचालक परमानंद सूर्यवंशी, मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी, सचिव प्रमोद पाटील, मार्गदर्शक एम.वाय.चव्हाण, जळगाव जिल्हा नेटबॉल प्रशिक्षण क्रीडा शिक्षक योगेश पांडे यांच्यासह सदस्यांनी जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनतर्फे यशवंत पब्लिक स्कूल वाघळी, ता.चाळीसगाव विद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा निवड चाचणीतून संघ जाहीर करण्यात आले. पंच अधिकारीपदी वाल्मीक गवळी, भगवान राखुंडे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी.पी.कला, एस.एम.ए. विज्ञान आणि के.के.सी. वाणिज्य महाविद्यालयात कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटन आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.धनंजय वसईकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून हेरंब ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेडचे एम.डी. तथा रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्सचे अध्यक्ष हर्षद ढाके उपस्थित होते. यावेळी हर्षद ढाके यांनी कॉमर्स असोसिएशनचे उद्घाटन केले. त्यांनी उद्योजक बनणे प्रत्येकास शक्य आहे. उत्तम बिझनेस आयडियासाठी पैशाची आता अडचण नाही, हा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. विस्तृतपणे उद्योजक का व कसे बनावे, याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रमुख उपलब्धता व उपक्रमांची माहिती उपप्राचार्य प्रा.धनंजय वसईकर यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम समन्वयक डॉ. राहुल कुळकर्णी यांनी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकी बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. त्यात सरपंचपदासाठी ललीत लामखेडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ललीत लामखेडे हे जामनेर न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा विविध कार्यकारी सोसायटी वाकी बु.चे माजी चेअरमन नाना लामखेडे यांचे चिरंजीव होत. निवडीवेळी माजी सरपंच पूजा पाटील, उपसरपंच ज्योती कदम, सदस्य कैलास सुरवाडे, मालता राजपूत, मनिषा पाटील, बी.डी. लामखेडे, निलेश पाटील, शालिग्राम कदम, सार्थक कदम, बापू पाटील, भागवत कदम, राजू पाटील, भिमसिंग राजपूत, प्रकाश पिंपळे, संजय राजपूत, विजय राजपूत, बबलू पाटील, भगवान राजपूत, हरी पाटील, वाय.टी. पाटील, सुभाष लामखेडे, राहूल लामखेडे, रमेश…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील कोल्हेनगरातील रहिवाशी तथा माजी नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचे गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ वर्ष होते. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानापासून दुपारी १ वाजता निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी महापौर ललित कोल्हे यांचे वडील होत.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गणेश उत्सव आणि ईद हे सण नुकतेच शांततेच्या वातावरणात पार पडले. त्यासाठी नागरिकांसह पोलीस दलाने सामोपचाराने प्रयत्न केले. तसेच पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवला. त्यासाठी रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊन आणि ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीकडून सत्कार करुन अभिनंदन पत्र देण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, पो.नि.जि विशेष शाखा, पोलीस निरीक्षक अभिमान सोनवणे, राखीव पो.नि.पोलीस उपनिरीक्षक रेशमा अवतारे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी तसेच पंकज जैन, डॉ.विजय साखंला, विजय झांबड, शितल जैन, कमलेश डांबरे, प्रियेश छाजेड आदी उपस्थित होते.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी परिवर्तन निर्मित ‘नली’ आणि ‘अरे संसार संसार’ कार्यक्रमांचे गुजरातमधील चैतन्य मराठी मंडळाच्यावतीने आयोजन केले होते. परिवर्तनचे हे कार्यक्रम राज्यभर व राज्याच्या बाहेर गाजत आहेत. गुजरातमध्ये तिथल्या मराठी मंडळांनी परिवर्तन जळगावची दखल घेत परिवर्तन महोत्सवासाठी परिवर्तनला आमंत्रित केले होते. त्यात ‘नली’ हा एकल नाट्यप्रयोग हर्षल पाटील यांनी अत्यंत समर्थपणे सादर करत रसिक प्रेक्षकांना हसविले आणि रडवलेही. संपूर्ण सभागृह अंतर्मुख होऊन प्रयोगाला दाद देत होते. दुसऱ्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांवर आधारित संगीतमय कार्यक्रम ‘अरे संसार संसार’ सादर केला. परिवर्तनच्या कलावंतांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम सादर केला. त्यामुळे दोन तास सभागृह आवाक होऊन बहिणाबाईच्या…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी विभागीय क्रीडा संकुलाचे लवकरात लवकर कामकाज सुरू करण्याच्या ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आणि विभागीय क्रीडा संकुलाचे कामकाज सुनियोजित पध्दतीने उत्कृष्ट करण्याच्या क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली योजना, अंदाजपत्रकाबाबत वास्तुविशारद, सल्लागारांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामुळे मेहरूण येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेस वेग आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आर्किटेक्ट कन्सल्टंट मे कोलाज डिझाईन प्रा. लि. मुंबई, मे.शशी प्रभू अँड असोसिएटस (पुणे) आणि मे.व्ही.के.आर्किटेक्चर (पुणे) यांनी सादरीकरण केले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी खु. गावातील मध्यवर्ती भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे यासंदर्भात नागरिकांनी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील आणि सरपंच शरद कोळी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ क्रेन मागवून त्वरित रात्री १० वाजता सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून हातोहात सर्व पथदिवे बदलण्याचे काम सुरू केले. तसेच पुढील टप्प्यात वानखेडे गॅरेज ते बायपासपर्यंत नवीन हायमस्ट पथदिवे बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी पथदिव्यांची तात्काळ दखल घेऊन काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सरपंच शरद कोळी, चंदू माळी, भाईदास माळी, अमीन पटेल, पवन माळी, चंदू पवार, दिनेश कडोसे…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, युवा सेनेचे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमात वैशाली सूर्यवंशी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. कार्यक्रमाला नरेंद्रसिंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, गोपाल परदेशी, विलास पाटील, गोपाल…