Author: Sharad Bhalerao

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरित्या आढळून आलेला वाळूचा साठा पोलीस पथक आणि महसूल पथकाने जप्त केला होता. वाळूसाठ्याचा लिलाव गुरुवारी, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भडगाव तहसील कार्यालयात अटी व शर्तीवर बंद लिफाफ्यातील निविदेद्वारे करण्यात येणार आहे. भडगाव तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहनातील वाळू महसूल पथकाने पकडली होती. त्यात ७३ ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या वाळूची विल्हेवाट लावण्याकामी वाळू साठ्यांचा लिलाव करण्याकामी वाळूची रक्कम ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे अपसेट प्राईस निश्चित केलेली आहे. त्यानुसार वाळूचा लिलाव करण्याचे निश्चित केले आहे. लिलाव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विहीत नमुन्यातील निविदा अनामत रक्कमेच्या डी.डी.सह बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी…

Read More

साईमत, पारोळा : प्रतिनिधी येथील नॅशनल हायवेवरील धरणगाव रस्त्यालगत चौफुलीला ‌‘श्री संताजी महाराज सर्कल‌’ असे नाव देण्यात यावे, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन पारोळ्याचे तहसीलदार उल्हास देवरे, नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना तेली समाज बांधवांतर्फे नुकतेच देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, परिसरात तेली समाज बांधवांचा सर्वाधिक वापर आहे. धरणगाव रस्त्याने तेली समाज बांधवांची ८० टक्के शेतजमीन याच सभोवतालच्या परिसरात आहे. सर्कलला ‌‘श्री संताजी महाराज सर्कल‌’ नावाने मंजुरी मिळाल्यास त्या नावाने संबोधण्यात येईल. तसेच मुखाने वाचून संताजीचे नाव घेण्यात येईल. म्हणून पुढील कार्यवाही करून चौफुलीला नाव देण्याची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष कैलास चौधरी, भाजपचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत ठेवलेली तीन लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, रोकडची पिशवी लांबविणारा चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध राजेंद्र तान्हीराम वाणी (वय ५७) यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, चोरट्यांनी ते पिशवीसह लंपास केल्याची घटना शहरात घडली. त्यामुळे भामटा कुठे आढळून आल्यास त्वरित शहर पोलीस स्थानकाला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. त्यात संदीप पाटील (पोलीस निरीक्षक,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रणधीर जाधव यांना उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून नुकतेच सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले. याबद्दल रणधीर जाधव यांच्यावर पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यासह पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिक काम केल्याची पावती असल्याची प्रतिक्रिया रणधीर जाधव यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे ‘एव्हीबी माझा’ चॅनलचा पाचवा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात चाळीसगाव येथे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पत्रकार रणधीर जाधव यांना ‘एव्हीबी माझा’चे मुख्य संपादक विजय भिसे यांच्या हस्ते उत्कृष्ट तालुका प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी सातारा…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ जळगावद्वारा आयोजित राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन केले होते. यावर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश पारधी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेचे विद्यार्थी ‘जीवनातील महत्त्व’ विषयावर प्रकाश टाकून परीक्षेच्या नियमांविषयी सूचना दिल्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. कार्यक्रमात नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम आयोजित राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. सतीश पारधी आणि प्रा. किशोर पाटील यांचाही सत्कार केला. गांधी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याकडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद आहे. मात्र, चाळीसगावला अत्याधुनिक ‘रेसलिंग मॅट’ उपलब्ध नसल्याने पहेलवानांची मोठी गैरसोय होत होती. चाळीसगावचे विद्यमान आ.मंगेश चव्हाण यांनी निवडणुकीपूर्वी चाळीसगाव शहरात ‘रेसलिंग मॅट’ देण्याचे आश्वासन दिले होते. शहरातील हनुमानवाडी स्थित जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला ४ लाखांची ‘रेसलिंग मॅट’ भेट दिली. जळगाव जिल्ह्यातील ही पहिली ‘रेसलिंग मॅट’ असून तिचे नुकतेच उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने तसेच आता मॅटच्या कुस्तीसाठीचे सराव करणे सोपे होणार असल्याने सर्व चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत. उद्घाटनाला कृषी उत्पन्न बाजार…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथे गेल्या २ ऑक्टोबर रोजी पडलेल्या दोन घरावरील दरोड्यातील दरोडेखोरांचा तपास अद्याप लागलेला नाही. मात्र, दरोड्यातील खाली बॅगा व कपड्याचा तपास लावण्यात योगायोगाने एका शेतकऱ्यास यश आले आहे. सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील देशमुख आणि चव्हाण या दोन कुटूंबाच्या घरी २ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात सोन्या- चांदीसह रोकड मिळून पाच ते सात लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला होता. गेल्या पाच दिवसांपासून दरोडेखोरांचा पोलीस कसून शोध घेत आहे. मात्र, तपास लावण्यात पोलिसांना अद्यापही पाहिजे तसे यश मिळालेले नाही. या उलट दोन दिवसात तीन रस्ता लूट एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न तर वेगवेगळ्या कॉलनीमध्ये…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पत्नीची प्रकृती बिघडल्यामुळे जामनेरातील रूग्णालयात तपासणी करून घरी निघालेल्या तरूणाचा डंपरच्या खाली आल्याने मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर रुग्णवाहिकेचे चालक दादु पाटील यांच्या मदतीने मयत संदीपचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे संदीप राजेंद्र सूर्यवंशी (मराठे, वय ३३) हा तरुण आई आणि पत्नीसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३०…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपला लढा सुरू आहे. त्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने भुसावळला येत्या शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी ओबीसी आरक्षण स्वसंरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. हा महामेळावा यशस्वी करा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस जे.पी.सपकाळे यांनी केले. जामनेर येथील माळी समाज मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ओबीसींच्या आरक्षणाला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींचे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व ओबीसी घटकांना एकत्रित करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने उत्तर महाराष्ट्रात…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर परिसर तथा बांबरुड राणीचे परिसरातील आदिवासी भिल्ल समाज बांधवांना नवीन रेशन कार्ड मिळावे. यासाठी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, तालुकाप्रमुख शरद पाटील यांनी पाचोरा तहसीलदार यांच्याकडे शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी पाचोरा येथे प्रस्ताव सादर केले. यावेळी एकनाथ अहिरे, दत्तू अहिरे, संजय ठाकरे, नंदू पाटील, नाना वाघ, धरमसिंग पाटील आदी उपस्थित होते. आदिवासी भिल्ल समाज बांधव हे मूळ रहिवासी आहेत. ते कष्ट करून उपजीविका भागवितात. तसेच ते भूमिहीन आहेत. ते शिक्षणापासून वंचित आहे. त्यांच्या जीवनात प्रचंड दारिद्य्र आहे. ते मतदार आहेत. ते नेहमी निवडणुकांमध्ये स्वयंस्फूर्तीने मतदान करतात. आजगायत ते रेशन कार्डापासून वंचित आहे. त्यांना…

Read More