साईमत, चोपडा : प्रतिनिधी राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांची तपासणी करून औषधी, यंत्र सामुग्री तसेच वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याबाबतची खातरजमा करणे तथा जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सुस्थितीत आहेत याची खात्री करणे, विशेषतः नवजात अर्भक व बालके यांचे आरोग्याबाबत दक्षता घेणे, ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय, प्रा.आ.केंद्रे, उपकेंद्रे यांना नियमितपणे भेटी देऊन येणाऱ्या अडचणी स्थानिक स्तरावर उपलब्ध निधीचा विनियोग करण्याबाबत कार्यवाहीसाठी तसेच सर्व रुग्णालय अंतर्गत स्वच्छता व स्वच्छ पिण्याचे पाणी याची दक्षता घेऊन त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या सूचना असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा आरोग्य अधिकारी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथुन जवळील घुसर्डी ता.पाचोरा येथे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना लागलेल्या विजेच्या शॉकमुळे एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. केळी लागवडीसाठी पावटी पाडतांना दुर्दैवाने तार तुटणे त्याच ठिकाणावरून ११ केव्ही गावठाणची वीज वाहिनी जाणे पावटी पाडण्यासाठी वापरलेला तार तुटून तो सरळ त्याच लाईनवर जाणे, अशी घटना घडल्याने पूर्ण गाव सुन्न झाले आहे. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय २३) हे काका राजेंद्र निकुंभ, चुलत भाऊ साई व यश निकुंभ हे सर्व शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते. पावट्या…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय व रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे ‘युगपुरुष स्वामी विवेकानंद’ खान्देशस्तरीय वक्तृत्व स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात त्यांनी ‘युवकांचे प्रेरणास्थान : स्वामी विवेकानंद’, ‘सोशल मिडीया आणि आजचा युवक’, ‘शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी’, ‘राजकारणाची दशा आणि दिशा’ विषयांवर वक्तृत्व सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन भगिनी मंडळाच्या अध्यक्षा तथा कबचौ उमवि सिनेट माजी सदस्या पूनम गुजराथी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर एमएसडब्ल्यू प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अंकिता कोळी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी गेल्या २ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले समाजबांधव रोशन राजपूत आणि गिरीश परदेशी यांना पाठिंबा देण्यासाठी पिंप्राळा परिसरातील राजपूत समाज व शोभाराम प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड संघटनेच्यावतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. सुरवातीला पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रॅलीस सुरवात झाली. नंतर महाराणा प्रतापाच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. तेथून रॅली शिवतीर्थावर शिवरायांना अभिवादन करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. सर्वांच्यावतीने उपोषणकर्त्या समाजबांधवांना स्वाक्षरी केलेले पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही सर्वांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पिंप्राळ्यातील राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष देवसिंग राजपूत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय ‘युवारंग’ युवक महोत्सवास शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी शोभायात्रेने प्रारंभ झाला. शोभायात्रेस विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील आणि के.सी.ई.सोसायटीचे व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. यावेळी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, ॲड. अमोल पाटील, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य सर्वश्री विष्णू भंगाळे, दीपक पाटील, नितीन ठाकूर, स्वप्नाली काळे, अमोल मराठे, डॉ.संदीप नेरकर, ऋषीकेश चित्तम, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, ॲड.प्रवीणचंद्र जंगले, प्राचार्य ए.आर.राणे, प्राचार्य गौरी राणे, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, प्रा.जुगलकिशोर दुबे, डॉ.मनोज महाजन आदी उपस्थित होते. महोत्सवासाठी मुळजी जेठा…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगावकडे जाणाऱ्या मारोती ओमनीला जळगाव-भुसावळ महामार्गावर शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अपघात झाला होता. त्याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत प्रसंगावधान राखून तातडीने अपघातग्रस्त वाहनचालकाला मदत केली. सविस्तर असे की, जळगाव-भुसावळ महामार्गावरुन जळगावकडे जाणारी मारोती ओमनी (क्र.एमएच ३९ जे ५४३८) ही दुभाजकाजवळ धडकली होती. यावेळी वाहनात वाहनचालकासह दोन ते तीन व्यक्ती बसलेले होते. याच मार्गावरुन माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे मॉर्निंग वॉक करीत होते. अपघाताची ही घटना त्यांच्या लक्षात येताच तातडीने त्यांचे सहकारी रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, शिवानंद बिरादर, नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, छायाचित्रकार उमेश नामदेव आदींनी प्रसंगावधान…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजपूत समाजाला जो शब्द दिला होता, त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून राजपूत समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने मागण्या त्वरित मान्य कराव्या. राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राजपूत समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाचे गिरीशसिंह परदेशी व रोशनसिंह राजपूत यांच्यासह समाजबांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. आंदोलनाला जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळत आहे. शनिवारी महाराष्ट्र…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी एज्युकेशन टुडेद्वारा केलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीत अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल मेरिट ॲवार्ड – २०२३’ ने स्कूलला सन्मानित करण्यात आले. अनुभूती स्कूलच्यावतीने ज्येष्ठ शिक्षक वेणू गोपाल वंगारा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. “एज्युकेशन टुडे” प्रतिष्ठीत मासिकाद्वारे १५ निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली. एज्युकेशन टुडे सर्वेक्षण आणि ज्युरी टीम्सने सुरू केलेल्या विस्तृत रँकिंग सर्वेक्षणाच्या आधारे विविध शाळांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले गेले. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठीत असलेल्या एज्युकेशन टुडे सर्वेक्षणात अनुभूती निवासी स्कूलला प्रथम तीनमध्ये मानांकित करण्यात आले. निसर्गाच्या सान्निध्यात शंभर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्यावतीने सोमवारी, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत ‘बातमी लेखन’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. बातमी लेखनासाठी लेखन कौशल्य महत्त्वाचे आहे. सामाजिक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्थांमध्ये एखाद्या व्यक्तीकडे बातमी लेखनाची जबाबदारी दिली जाते. बातमी कशी लिहावी, बातमी लेखनाचे तंत्र काय ? त्याची माहिती व्हावी, यासाठी माध्यमशास्त्र प्रशाळेतर्फे १६ ऑक्टोबर रोजी माध्यमशास्त्र प्रशाळेत ‘बातमी लेखन’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. ही कार्यशाळा निशुल्क आणि सर्वांसाठी खुली आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.सुधीर भटकर (८४०७९२२४०४), डॉ.गोपी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, जळगाव येथे अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे सायबर सुरक्षा, पोक्सो कायदा व महिलासंबंधी कायदे विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती सी. एस. पाटील होत्या. ‘सायबर सुरक्षा’ विषयावर पायस सावळे हिने मार्गदर्शन केले तर ‘पोक्सो कायदा व महिला संबंधी कायदे’ विषयावर बाल सहायता कक्ष, जळगाव येथील विद्या सोनार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्रचार्य सौ.एस. एस. नेमाडे, शालेय समन्वयक राहुल वराडे, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे प्रमुख प्रा.अनिता ओहळ, प्रा.एच.एम. होले यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन नतीक्षा आंबेकर यांनी केले.