Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील जारगाव चौफुली परिसरात बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करून त्याला अटक केली आहे. विशाल पंकज देसले (वय २०, रा. जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस हवालदार योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा शहरातील जारगाव चौफुली येथे संशयित आरोपी विशाल देसले हा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित आरोपी…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न येथील श्रीराम ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे चारचाकीमधून आलेल्या अज्ञात तीन जणांनी उभ्या दोन टँकरमधून ४० हजार रूपये किंमतीचे ४४० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, गणेश श्रीराम पाटील (वय ६४, रा. गणपती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचे धरणगाव तालुक्यातील एकलग्न येथे श्रीराम ऑटोमोबाईल नावाचे पेट्रोलपंप आहे. ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तीन जण एका कारमध्ये आले. त्यांनी पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरमधून ४० हजार रूपये किंमतीचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात सर्वत्र डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी खा.उन्मेश पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी लागलीच परिसरातील रुग्णालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. अशा आजारांमुळे ज्येष्ठ ते विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडून कुठलीही ठोस उपाययोजना राबविली जात नाही. त्यामुळे आपण याबाबत ठोस भूमिका घेण्याची विनंती केली. संतप्त नागरिकांना घेऊन खा.उन्मेश पाटील यांनी नगरपालिकेवर धडक दिल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले होते. सविस्तर असे की, गेल्या आठवड्यात लक्ष्मीनगर परिसरातील नववीत शिकणाऱ्या उद्योन्मुख खेळाडू यश विवेक काळे याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यापासून शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. रुग्णालयात…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरीतील प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गंत नांद्रा उपकेंद्र येथे आयुष्यमान भव: कार्यक्रमामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्या आदेशावरून तसेच जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश पाटील, डॉ.कोमल देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नांद्रा आणि रोटवद येथे महिलांच्या विविध आजारांविषयी मार्गदर्शन शिबिर नुकतेच घेण्यात आले. शिबिरात मार्गदर्शनासाठी आलेल्या डॉ.सीमा तडवी यांचा गावाच्यावतीने रोटवद ग्रा.पं.च्या सदस्या सीमा बाविस्कर आणि माध्यमिक शाळेच्यावतीनेही सत्कार करण्यात आला. नांद्रा येथे ज्येष्ठ महिला सरूताई यांच्याकडून सत्कार करण्यात आला. डॉ.सीमा तडवी यांनी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. शिबिरात…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्यावतीने येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी आठव्या ‘ऋणानुबंध’ वधु-वर-पालक परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत मेळाव्याचे नियोजन सूत्रबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली. बैठकीत उपस्थित समाज बांधवांनी अनेक सूचना मांडल्या. सर्व सूचनांवर विचार करून पुढील नियोजन करू, अशी ग्वाही महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी दिली. खेळीमेळीच्या वातावरणात बैठकीची सांगता झाली. मेळाव्याची कार्यकारिणी अशी ‘ऋणानुबंध २०२४ ‘वधु-वर-पालक परिचय मेळाव्याच्या कार्यकारिणीत स्वागताध्यक्ष म्हणून विजय वसंत विसपुते, नियोजन समिती प्रमुखपदी शाम छगन भामरे, मेळावा प्रमुख दीपक बन्सी जगदाळे, उपप्रमुख भगवान मुरलीधर दुसाने, सचिवपदी प्रशांत त्र्यंबक विसपुते, सहसचिव…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील कोतकर कॉलेजजवळ पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे शासकीय वाहनाने गस्त करीत असतांना एक पांढऱ्या रंगाची हुंडाई कार (क्र. एमपी ०९ डब्ल्यूसी १४८५) हिच्यावर संशय आला. त्यानंतर त्यांनी कार चालकास थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने इशाऱ्याला न जुमानता भरधाव वेगाने कार नेली. गस्तीवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ एकमेकांना संपर्क करून चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यावर येऊन कार अडविण्याचा प्रयत्न केला. वाहन चालकास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने तो वाहन रेल्वे स्टेशन जवळील मालधक्क्याजवळ सोडून पळून गेला. कार चालकाच्या बाजुस असलेल्या मागील दरवाजाच्या फुटलेल्या काचमधुन पाहिल्यावर कारमध्ये गोण्या व गोण्यांच्या बाजुला अफुची बोंडे व…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ सोमवारी, ९ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी आणि त्रस्त नागरिक आघाडीतर्फे जि.प.च्या विश्रामगृहापासून सकाळी ११ वाजता नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अमळनेरात सध्या प्रशासक राज सुरू आहे. त्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडल्याने यावरून ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. खड्डयात रस्ते आहेत की, रस्त्यात खड्डे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. शहरातील गटारींची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत…

Read More

साईमत, साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणी गावातील वृद्ध महिलेला बनावट लेबल लावून जुने मशीन नवे दाखवून २ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात अन्नपूर्णा खंडेराव पाटील (वय ७२) या महिला आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतीसाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात टिलर करण्याचे साहित्य घेण्यासाठी पृथ्वीराज मोटर्सचे संचालक बाबुराव रावसाहेब खेडकर (रा.नेवासा, ता. शेगाव, जि.अहमदनगर) याचे यांच्याशी १४ मार्च २०२३ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी संपर्क साधून २ लाख ४० हजार रूपये किंमतीचे पॉवर टिलर…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रेल येथील १९ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना शनिवारी, ७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील रेल गावात १९ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. शनिवारी, ७ ऑक्टोबर पहाटे ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारा अशोक हिरामण भील याने महिलेच्या घरात घुसून तिचे आई-बहीण व महिलेला अश्लील शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात अशोक भील याच्या विरोधात तक्रार…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आजचा युवक भरकटलेल्या अवस्थेत जगत आहे. त्याला शिक्षणातील अभ्यासक्रम व गुण म्हणजे पराविद्या याशिवाय ध्येय निश्चिती, संघर्ष, शौर्य, आव्हाने, आत्मसन्मान, संवेदनशीलता, कर्तव्य, प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, एकाग्रता ह्या अपराविद्यासह चांगल्या गुणांची आवश्यकता आहे. हे सर्व गुण विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद, शिवाजी महाराज, डॉ. अब्दुल कलाम, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले व इतर अनेक संतांच्या चरित्राच्या वाचनातून मिळतील. यासाठी स्वतःमधील न्यूनगंड कमी करून स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार व्हावे. यासाठी आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थाने जागे होण्याची गरज असल्याचे मत मॅनेजमेंट गुरु प्रशांत पुष्पल (पुणे) यांनी व्यक्त केले. रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजी नगर यांच्या सहकार्यातून रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेद्वारे शहरातील चार महाविद्यालयातून सुमारे…

Read More