साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए सायन्स, के.के.सी. कॉमर्स कॉलेजतर्फे आयोजित संगणकशास्त्र विषयातंर्गत पोस्टरसह मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत ५० पोस्टरसह १० मॉडेलचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा.दीपक आवटे, डॉ.योगिनी वाघ आदी उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संगणक विषयाचे विविध भागांचे व संगणक भाषेचे पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशनच्या सहाय्याने सुंदर सादरीकरण केले. स्पर्धेत एफ. वाय., एस. वाय. आणि टी. वाय. बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशनच्या बाबतीत विद्यार्थ्यांचे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुंबई : प्रतिनिधी पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टाने नाकारली आहे. आ.एकनाथराव खडसे यांनी एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी हायकोर्टाने खडसेंना कठोर कारवाईपासून आजपर्यंत दिलासा दिला होता. मात्र, आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि इतर काहीजण आरोपी आहेत. दोन वर्षांच्या कारावासानंतर गिरीष चौधरी यांना नुकताच जामीन मिळाला आहे.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी सन २०१४ पासून शहरात भाजपचे आमदार आहेत. तेव्हापासून आमदारांनी शहराला खड्डयात घातले आहे. आजही शहरवासिय खड्ड्यांमुळे नरकयातना भोगत आहेत. रस्त्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. महापालिकेला काम करू दिले जात नाही. गटारी, स्ट्रीट लाईट नाही. आमदारांनी कोणतेही एक तरी ठोस काम दाखवावे, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. पिंप्राळा व हुडको या भागात ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे सोमवारी सायंकाळी सभेत रूपांतर झाले, त्यात आमदार सुरेश भोळे यांनाच टार्गेट करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा या कार्यक्रमातून राज्य व केंद्र सरकारच्या करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड असे फलक लावून आमदारांना टार्गेट केले जात आहे. जिल्हा प्रमुख…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन रात्रगस्त पेट्रोलिंगची मोहीम राबविण्यात आली होती. पेट्रोलिंग करीत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास मालेगाव रस्त्यालगतच्या एल.पी.जी. पंपासमोर मालेगावकडून चाळीसगाव शहराकडे एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसली. वाहन चालकास त्याचा जाब विचारल्यावर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरुन पोलिसांचा संशय बळावल्याने पिकअप वाहन नाशिक जिल्ह्यातील मालेगावला दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन गुन्हा दाखल करुन पाच लाखाच्या पिकअप वाहनासह संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की, मालेगाव रस्त्यालगतच्या एल.पी.जी. पंपासमोर रात्री गस्तीवर असलेले पो.ना. अमृत पाटील, पो.कॉ. विजय पाटील यांनी पिकअपच्या वाहन चालकास थांबविण्याचा इशारा केला होता.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि देवरे फाउंडेशनतर्फे आयोजित ‘एका प्लाास्टिकची दुसरी गोष्ट’ प्लास्टिकपासून होणाऱ्या परिणामावर हिरापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महाविद्यालयात नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.आर.जाधव होते. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. संगीता चव्हाण यांनी केले. कार्यशाळेसाठी पुणे, मुंबई येथून ग्रीन वर्क ट्रस्टच्या मार्गदर्शिका गार्गी गीध, रुपाली नाईक यांनी प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणाम, प्लास्टिकचे वीस वर्षापासून ते चारशे वर्षांपासूनचे आयुष्य व प्लास्टिकचे पार्टीकल तयार होऊन ते डम्पिंग स्टेशन, नाले, गटारी, समुद्र व समुद्रातून मासे व आपल्या अन्नसाखळीत शिरून ते माणसाच्या शरीरापर्यंत पोहोचून रक्तात प्रवेश केला आहे. प्लास्टिकपासून होणारे दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कुतुबमिनारपेक्षा उंच असलेले डम्पिंग स्टेशन…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जळगावचे पोलीस अधीक्षक यांना नोटीस पाठवून २५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी, २५ ऑक्टोबरला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आ.किशोर पाटील यांनी ऑगस्ट महिन्यात पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्च शिवीगाळ केली होती. तसेच महाजन यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आ.किशोर…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथील ११वीचा विद्यार्थी जयदीप कैलास सोनवणे याने क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे छ.शि.महाराज, क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित १७ वर्षाच्या आतील जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथमस्थान पटकावले आहे. त्यामुळे त्याची नाशिकला होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जयदीपला कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, कैलास सोनवणे, सुरेश पहेलवान, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. जयदीपच्या यशाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील गुढे येथे श्री गोपेश्वर महादेव सहकारी भाजीपाला व फळे उत्पादक खरेदी विक्री संस्था मर्यादितचा उद्घाटन सोहळा एम. के. पाटील आणि शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच झाला. याप्रसंगी डॉ. उत्तमराव महाजन, उद्धवराव महाजन, विकासोचे चेअरमन भाऊराव माळी, दिलीप पाटील, रघुनाथ माळी, संजय पाटील, श्याम सर तसेच कोळगावसह समस्त ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संस्थेच्या मालकीच्या जमिनीवर भाजीपाला आणि फळझाडे यांची लागवड करणे व उत्पादन कार्यक्रम अंमलात आणणे, आपल्या संस्थेच्या अंतर्गत भाजीपाला व फळझाडे लागवडीकरीता यंत्रणा व साधन सामग्री उभी करणे, भाजीपाला व फळांची चांगल्या प्रकारे साठवणूक करणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथून जवळील शहापुरातील तरुण शेतकरी संदीप प्रकाश राजपूत आणि प्रदीप फत्तेसिंग परदेशी हे त्यांच्या शेतात गट क्रमांक ११३/१ येथे रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेल्यावर त्यांना शेतात रात्री १० वाजेच्या दरम्यान बिबट्याचे दर्शन झाले. संबंधित वनविभागाने त्वरित दखल घेऊन बिबट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणी, मका काढणी व शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने शहापूर जवळील नाचणखेडा-भीलखेडा परिसरातही थैमान घातले आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याला चांगलेच जखमी केले होते.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील संघाच्या मालकीच्या जागेत स्वागत गेटसह कंपाऊंड वॉल तसेच मोकळ्या ग्राऊंडवर सिमेंटचे पेव्हर ब्लॉक या विकास कामांसाठी आमदार निधीतून दहा लाख देण्याची मागणी केली आहे. राजेंद्र गंगाधर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या आ.लता चंद्रकांत सोनवणे यांचे स्वागत करून मागणीचे निवेदनही देण्यात आले. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही.एच. करोडपती, सचिव प्रमोद डोंगरे, जयदेव देशमुख, यशवंत जडे, दिलीप पाटील, सेवानिवृत्त तलाठी एम.बी.साळुंखे, जे.एच.नेरपगारे, प्रभाकर बैरागी, सुभाष पाटील यांना आ.लता सोनवणे यांनी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे राजेंद्र पाटील यांच्यासह उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्या समक्ष आश्वासनही दिले. सर्वांनी…