साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील धरणगाव येथे आजुबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत आहे. वाढत असलेल्या वस्ती तसेच गाव हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या लगत असल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये अनेकदा किरकोळ प्रमाणात चोरी वा इतर प्रकार होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून किंवा वित्त आयोगाच्या फंडातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, त्यामुळे गावातील अवैध व्यवसाय आणि इतर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल. यासंदर्भात सरपंच, सचिव यांना सामाजिक कार्यकर्ते करण विनोद झनके यांच्यासह समस्त नागरिकांच्यावतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. किरकोळ चोरी वा इतर प्रकाराची माहिती कायद्याचा तगादा मागे लागू नये, म्हणून बऱ्याचदा पोलीस स्टेशनला…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी बेघर असलेल्यांसाठी घरकुल आवास योजनेच्या शहरी भागात नगर परिषदेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. मात्र, अनेक गरजू आणि पात्र असलेले लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्यांना शासनाच्यावतीने घरकुलासाठी देण्यात येणारे अनुदान प्राप्त न झाल्याने तो त्यांना त्वरित देण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्तीचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणाचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून करण्यात आली. अशा आशयाचे निवेदनही त्यांना नुकतेच देण्यात आले. शासनाच्यावतीने बेघर असलेल्यांकरीता घरकुल आवास योजनेच्या शहरी भागात नगर परिषदेच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो. मात्र, लाभापासून अनेक गरजू व पात्र असलेले लाभार्थी वंचित आहे. ज्यांचे घरकुल मंजूर झालेल आहेत. त्यांना देण्यात आलेल्या…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जलसमाधी आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना अंगाला केळीचे पान बांधून डोक्यावर केळीचे घड घेऊन केळीच्या पानावरती पीक विम्यासाठी निवेदन दिले. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांच्या आत केळी पिक विमा देऊ, असे आश्वासन दिले. परंतु आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात केळी पिक विम्याची नुकसान भरपाई जमा झालेली नाही. जिल्हा प्रशासन व राजकीय नेते कागदी घोडे नाचवत असल्याच्या निषेधार्थ चांगदेव येथे तापी पूर्णा पवित्र संगमावर पिक विम्यापासून वंचित ठेवणाऱ्या संवेदनहीन जिल्हा प्रशासनाचे पिंडदान आंदोलन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी निषेध व्यक्त केला. आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदडे, निकिता इंगळे, संजय इंगळे, छोटू पुजारी,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीकडून ग्रामनिधीमधील महिला बालकल्याणच्या दहा टक्के निधीमधुन गावातील ७ कुपोषित बालकांना १२ हजार रुपयांचे पोषण आहाराचे किराणा किटचे वाटप विस्तार अधिकारी सुरेश कठाडे, सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले. तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीच्या राजीव गांधी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विस्तार अधिकारी कठाडे यांनी शासनाच्या आदेशानुसार ‘कुपोषण मुक्त भारत’ अभियानातंर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप करावे, असे सुचविले. त्या अनुषंगाने कळमसरे ग्रामपंचायतमार्फत दरवर्षी कार्यक्रम घेतला जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यापुढे एकही कुपोषित बालक गावात आढळणार नाही, त्याची दक्षता घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. यावेळी नीमचे…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता दुरावस्थेत आहे. त्यामुळे रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांना मोठी अडचण येत होती. त्यामुळे नगरपालिकेला रस्त्याच्या दुरूस्तीबाबत निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतर परिसरातील रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपालिका प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दिलेले आश्वासन कधी पूर्ण होईल ? याकडे परिसरातील नागरिक लक्ष ठेवून आहेत. पावसाळ्यात झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेता एकवीरा नगरमधील मिलिंद बोरसे, मयूर पाटील, सुशांत पाटील, शुभम पाटील, धीरज नेरपगार, अभिजीत पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाकडे दोनवेळा पाठपुरावा करून रस्त्याच्या संदर्भात निवेदनही दिले होते. मात्र, नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बिलखेडा शिवारातील शेतात कापसाच्या पिकावर सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमीकल कंपनीचे रासायनिक खत मारल्याने शेतकऱ्याचे सुमारे सहा लाख रूपयांचे नुकसान होवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी, ९ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या जबाबदार तीन जणांविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, सुकलाल बंडू भदाणे (वय ६५, रा. बिलखेडा ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे बिलखेडा शिवारातील शेत गट नंबर २०५ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी कापसाची लागवड केली आहे. कापसाच्या वाढीसाठी त्यांनी गेल्या २५ जुलै रोजी सरदार ॲग्रो फर्टीलायझर ॲण्ड केमिकल कंपनीचे खत कापसाच्या…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव येथील विद्यार्थिनी राघवी संजू सूर्यवंशी हिची २०२३ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिची एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तेलंगणा येथील डॉ.पी.एम.आर.मेडिकल कॉलेज, हैदराबादला निवड झाली आहे. राघवी ही साधनाताई प्रतापराव पाटील, माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय, आमडदे शाळेतील उपशिक्षक संजू जीवराज सूर्यवंशी, जिल्हा परिषद शाळा वडधे, ता.भडगाव येथील प्राथमिक शिक्षिका ज्योतिका सूर्यवंशी यांची कन्या आहे. यशाबद्दल भडगाव परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह लाडकुबाई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे, किसान परिवारातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालकांसाठी झालेल्या पोद्दार प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांमध्ये पालकांच्या आठ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम लढतीत महेश गेमनानी यांच्या नेतृत्वाखालील पोद्दार नाईट रायडर्स हा संघ विजयी ठरला आहे. तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोतदार पँथर हा संघ उपविजेता ठरला. पंच म्हणून शुभम सर आणि आसिफ सर यांनी काम पाहिले. पोद्दार नाईट रायडर्स संघातील खेळांडुमध्ये कर्णधार महेश गेमनानी, राज पुंशी, अजित डेंबानी, मनीष बजाज, श्रेणिक जैन, दीपक पंजाबी, विशाल महाले यांचा समावेश आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ आणि ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन ॲण्ड आर्टिस्ट युनियनतर्फे विविध क्षेत्रात अष्टपैलु कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण कस्तुरबा हॉल माटुंगा, मुंबई येथे नुकतेच करण्यात आले. त्यात चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील अनिल पगारे यांना सामाजिक क्षेत्रातील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीमरत्न पुरस्कार २०२३’ सन्मानचिन्हासह सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी अविनाश महातेकर (माजी राज्यमंत्री), शेखर मुंदडा (अध्यक्ष, गोसेवा आयोग महाराष्ट्र तथा महाएनजीओ फेडरेशन), अभिजित राणे (अध्यक्ष-धडक कामगार युनियन), नरवीर तानाजी मालुसरे, वंशज शितल मालुसरे, अनंत ऊके, भावेश तन्ना, दीपक काळींगण, गुलाब चांडक आदी मान्यवर उपस्थित होते. अनिल पगारे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तमगव्हाणला जि.प. प्राथमिक शाळेत शासनाच्या उमेद अभियानातंर्गंत जिजाऊ महिला ग्रामसंघातर्फे बचत गटांनी महिला आनंद मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी १० महिला बचत गटांनी स्वत: खाद्यपदार्थ बनविले होते. विविध खाद्यपदार्थ बनवून महिलांनी स्टॉल लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन स्टॉलवरील पदार्थांचा स्वाद घेतला. यावेळी माजी जि.प. सदस्या मंगला पाटील, तमगव्हाणच्या सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच अरुण पाटील, पिंपळवाडच्या सरपंच शोभा नागरे, उमेद अभियानच्या तालुका समन्वयक विद्या भांबळे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी गायकवाड, प्रवीण पाटील, कैलास वाघ, माजी सरपंच माधवराव पाटील, शिवदास पाटील,…