Author: Sharad Bhalerao

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव रविवारी, १५ ते २६ ऑक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी, विश्वस्तांनी दिली आहे. चोपड्याच्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्त उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. वहन आणि त्याचा मार्ग असा राहील. १५ रोजी हत्ती (गांधी चौक, बाजारपेठ), १६ ला चंद्र (मोठा देव्हारा, गणेश कॉलनी), १७ ला सिंह (अरुणनगर, श्रीराम नगर), १८ ला मोर (गुजर अळी), १९…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील रोटरी क्लबच्यावतीने तालुक्यातील उत्तमनगर आदिवासी बहुल पाड्यावर बुधवारी, ११ रोजी विनामूल्य आरोग्य तपासणीसह गरजूंना मोफत औषधी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात पाड्यावरील २०० च्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १२० लहान बालके, कुपोषित बालके आणि गर्भवती महिलांची संख्या लक्षणीय होती. चोपडा तालुक्यातील ग्रामीण भाग हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी वैद्यकीय सेवा मिळणे जिकरीचे असल्याने रोटरीच्या वतीने ‘आनंद क्षण’ नावाने वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. त्यात तपासणी, मोफत औषधी वाटपासह रक्ताची तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी डॉ. नीता जैस्वाल, डॉ.पराग पाटील, डॉ.भूषण सोनवणे, डॉ. सचिन कोल्हे, डॉ.वैभव पाटील यासह स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहकार्य लाभले. संपूर्ण…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील बारावीचा विद्यार्थी मनोज हटकर याने ‘पाच हजार मीटर चालणे’ क्रीडा प्रकारात विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, प्रा.श्याम पवार, शाळेचे प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायब सुभेदार भटू पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडू आणि क्रीडा शिक्षक व्ही.जी.बोरसे यांचा सत्कार करून त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळेत आपण मेहनत घेत आहोत. मात्र, काळानुरूप आपणास बदल करावे लागतील. तंत्रज्ञानाची सांगड घालून बालकांचा सर्वांगिण विकास करावयाचा आहे, असे मत वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील जांभोळला वाकोद केंद्राची तिसरी शिक्षण परिषद केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे आणि जांभूळ शाळेच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण सोनवणे होते. शिक्षण परिषदेत सर्व शाळांनी आपल्या शाळेतील यशोगाथा लकी ड्रॉ पद्धतीने सादर केल्या. त्यात वडगाव, कुंभारी आणि वाकोद या शाळांना संधी मिळाली. कुंभारी शाळेचे उपशिक्षक प्रशांत वाघ यांनी आयसीटीचा वापर व शीट निर्मितीबद्दल प्रात्यक्षिक घेतले. जांभोळ शाळेतील उपशिक्षक अनिल…

Read More

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर गणेशोत्सव संपल्यानंतर सर्वांना नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्रीत ठिकठिकाणी गरबा, दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाळधी येथे जीपीएस सार्वजनिक मित्र मंडळ आणि प्रतापराव पाटील मित्र परिवार यांच्यातर्फे सुमारे तीनशे महिला व तरुणींना गरबा, दांडियाचे प्रशिक्षण देण्यात आले. ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले. १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या प्रशिक्षणात महिला व तरुण-तरुणींचा ओढा अधिक दिसून आला. गरबा किंवा दांडिया खरं तर गुजरात, राजस्थानमधील लोकप्रिय व पारंपरिक नृत्यप्रकार आहे. पण नवरात्रीत महाराष्ट्रातील विविध शहरात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या ३ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या आदिशक्ती चंडीकादेवी पाटणादेवी मंदिराजवळील तितूर नदीवरील पुलाच्या कामाला नवरात्र उत्सवात मुहूर्त मिळाला नाही. आ.मंगेश चव्हाण यांनी आमदार निधीतून दोन वेळा २५ लाख रुपयांच्या निधीचे पत्र देऊनही नवीन पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली नाही. पाटणा ग्रामस्थांनी पुलासाठी जलसमाधी घेण्याचे आंदोलनही पुकारले होते. अतिशय धोकेदायक व पाण्याचा प्रचंड प्रवाह असणाऱ्या नदीतून जीव मुठीत धरत यावर्षीही लाखो भाविक भक्तांना मार्ग काढावा लागतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे आ.मंगेश चव्हाण यांनी कामासाठी पुढाकार घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी तितूर नदीवर तात्पुरत्या स्वरुपात पुलाच्या उभारणीचे काम गुरुवारी,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद आणि जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे ९ ते ११ ऑक्टोबरमध्ये घेण्यात आल्या. त्यात १७ व १९ वर्षाच्या आतील गटात इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडू मुला-मुलींनी घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे १० खेळाडु नाशिक विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. सर्व खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालयातील नंदिनी लक्ष्मण सूर्यवंशी (वयोगट १७-४८ किलो), पायल गोविंदा सूर्यवंशी (वयोगट १७-६० किलो) तसेच कृष्णा सुनील पाटील (वयोगट १९-५० किलो) यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे तथा जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत प्रथमस्थान पटकावले आहे. त्यामुळे त्यांची नाशिक येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच याच स्पर्धेत भावेश जितेंद्र पाटील (वयोगट १४-५० किलो), पूजा भक्तराज महाजन (वयोगट १७-४४ किलो) यांनी उपविजेतेपद प्राप्त करत यश संपादन केले आहे. यशस्वी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्ट्‌स, एस.एम.ए.सायन्स अँड के.के.सी. कॉमर्स कॉलेजला जागतिक मानसिक आरोग्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डी. एल. वसईकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशिष राठोड उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. के. एस. खापर्डे, डॉ. सुनिता कावळे, प्रा. सुनीता जगताप यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात सुनीता जगताप यांनी मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व व उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. आशिष राठोड यांनी विविध मानसिक आजारांची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी काही ध्यान तंत्राबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एल. वसईकर यांनी मनोगतात शारीरिक, मानसिक आरोग्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांमधील ‘ताण तणाव’…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी गेल्या एक ते दीड महिन्यापासून तालुक्यात सुरु असलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, विविध वैयक्तिक मैदानी स्पर्धांमध्ये शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्य. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविलेले आहे. अशा सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी सहसचिव प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे, क्रीडा शिक्षक अशोक साळुंखे, विद्यालयातील जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीचे संचालक संजय सोनवणे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक अशोक साळुंखे, मुख्याध्यापक निळकंठ सोनवणे…

Read More