साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील शिंदाड गावातील गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार (कमान) बांधकामासंदर्भात प्रलंबित विषयावर अनेकवेळा संघटना आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देवून दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे शासन निर्णय पुढे करत टाळाटाळ आणि काही समाजकंटकांनी कमानीला विरोध केल्यामुळे समता सैनिक दलासह ग्रामस्थांतर्फे निवेदनाद्वारे निषेध नोंदविला आहे. अशा आशयाच्या निवेदनाच्या प्रती पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी, शिंदाड ग्रामपंचायत आदींनाही रवाना केल्या आहेत. ज्या ठिकाणी महामानवांचा सन्मान होत नसेल अशा ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, आमचे पुनर्वसन न झाल्यास प्रशासकीय दालनात संसार मांडू, त्यामुळे निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी, अशी निवेदनाद्वारे विनंती…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रौत्सव भक्ती अन् चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवारी, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान श्री मंगळग्रह मंदिरात नऊ दिवस मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगीरूपे भाविकांना पहावयास मिळणार आहेत. त्यात भूमिमातेला नऊ दिवस विविध रंगातील वस्त्र परिधान करून मंदिरात आकर्षक सजावट केली जाणार आहे. नवरात्रौत्सवाच्या प्रारंभदिनी अर्थात घटस्थापनेच्या दिवशी यजमानांच्या हस्ते सकाळी विधिवत मंत्रोउच्चारांद्वारे विशेष पूजा-अर्चा होऊन घट बसविले जातील. याप्रसंगी मंगळेश्वरी भूमिमातेला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करुन विराजमान केले जाईल. तसेच अखंड ज्योतही लावली जाईल. नवमीच्या दिवशी नवचंडी महायाग तर विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजाही होईल. भूमिमातेची असणार दहा वेगवेगळी रुपे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत पाडळसरे धरणासंदर्भात खा.उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमनुसार काम न झाल्यास खासदारांसोबत समितीही आंदोलन करणार आहे. मात्र, खासदारांनी शासन प्रशासनाविरोधात आंदोलन न केल्यास जनआंदोलन समितीमार्फत खासदारांच्या दाराशी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे. पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात चालढकल व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खासदार यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धरण जन आंदोलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीच्या कार्यालयात झाली. पाडळसरे धरणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या स्तरावर सुधारित प्रशासकीय मान्यता दीर्घ काळापासून प्रलंबित आहे तर हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा, यासाठी पाडळसरे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि जळगाव गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात शुक्रवारी, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी श्री मंगळग्रह मंदिर येथे २३ ऑक्टोबरपर्यंत रोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. शिबिरात फक्त मोतीबिंदू आहे किंवा नाही याबाबतच मोफत तपासणी होईल. चष्म्यांचे नंबर काढून मिळणार नाहीत. त्यासाठी कृपया कोणीही येऊ नये. ज्या शिबिरार्थींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करावे लागेल त्यांना शिबिरस्थळीच शस्त्रक्रियेची तारीख कळविली जाईल. ज्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाची आहे त्या व्यक्तींसह त्यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीलाही गोदावरी फाउंडेशन, जळगाव येथे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ‘युवारंग’ महोत्सवातील उपविजेत्या ठरलेल्या ‘प्रताप’ महाविद्यालयातील विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार आणि अमोल पाटील यांनी वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. ‘आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा प्रभाव वाढत आहे किंवा नाही’ विषयावरील वादविवाद स्पर्धेत प्रभावी मांडणी करून त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले. ‘युवारंग’ महोत्सवात यशस्वी ठरलेल्या निर्भय सोनार आणि अमोल पाटील यांना ॲड. सारांश सोनार, प्रा. लीलाधर पाटील, यशपाल पवार, योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल प्राचार्य डॉ.ए.बी. जैन, प्रा.डॉ.नितीन पाटील, डिगंबर महाले, प्रा.डॉ.रमेश माने, प्रा. संदीप नेरकर, प्रा.धीरज वैष्णव, प्रा.जी.एच.निकुंभ, प्रा. कल्पना पाटील, प्रा.विजय तुंटे, सचिन खंडारे, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, डॉ.जी.एम.पाटील, विनोद पाटील, प्रकाश मुंदडा, प्रा.पराग पाटील, मारवडचे…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील सामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.चे चेअरमन सुनील हरी पाटील आणि व्हा. चेअरमन अण्णा पवार यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेत सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक माणिकराव माधवराव पाटील यांचा चेअरमन पदासाठी तर शारदा एकनाथ चव्हाण यांचा व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीवेळी विकासोचे संचालक बाळकृष्ण साळुंखे, साहेबराव पाटील, रवींद्र साळुंखे, पंढरीनाथ पाटील, दगा भील, अण्णा पवार, सुनील पाटील, विजय पाटील, मयूर पाटील, रेखा नेरपगार, लीना सोनकुळ आदी उपस्थित होते. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार विभागाचे…
साईमत, मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यविरोधात ईडीने दाखल केलेल्या भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला आहे. यापूर्वी खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकील मोहन टेकावडे यांनी याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. काय आहे भोसरी जमीन घोटाळा.. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महसुल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. ३.१ कोटी रुपये िंकमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवभोजन केंद्रात भोजन देताना अस्वच्छता असणे, सीसीटीव्ही नसणे, अन्न शिजविण्यासाठी किचनची व्यवस्था नसणे, लाभार्थ्यांशी अरेरावी आदी कारणांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी शिवभोजन चालकांना कारणे दाखवासह केंद्र का रद्द करू नये अशा आशयाच्या नोटीस दिल्या आहेत. मेहरूण परिसर, जिल्हा रुग्णालय, रेल्वे मालधक्का, गोलाणी मार्केटसह विविध ठिकाणी असलेल्या शिवभोजन केंद्रांत अन्न शिजविण्यासाठी किचन नसणे, केंद्रात अस्वच्छता असणे, लाभार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्था नसणे आदी तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानूसार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पथकांची नियुक्ती करून केंद्र तपासणीचे आदेश दिले. त्यात अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. यामुळे संबंधित तीस केंद्र चालकांना १७ ते १९ आक्टोबरदरम्यान…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आणि फैजपूर पोलीस उपनिरीक्षक सय्यद मयनुद्दिन यांच्या पथकाने तालुक्यातील कासवे येथील बंद स्टोन क्रशर येथून समान नंबरचे दोन रिकामे डंपर पकडून कारवाई केली आहे. दरम्यान, तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणारी वाहनांसह अनेक मोटरसायकली, बुलेट, रिक्षा मिनीडोर, ॲपे रिक्षा, कालीपिली प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे आरटीओ आणि पोलिसांनी तपासली तर अनेक बोगस नंबरची वाहने आढळून येण्याची शक्यता आहे. कासवे येथील नदी पात्राजवळ अंदाजे १० ब्रास रेती साठा जप्त करण्याची कारवाई करून जप्त केलेला साठा यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला. दरम्यान, समान नंबरचे डंपर पकडल्याने फैजपूर पोलिसात गुन्हा नोंदण्याची कारवाई सुरू…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी बसमध्ये चढत असलेल्या वृध्दाच्या खिश्यातून रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. भिमराव सोनू बिऱ्हाडे (वय ६८ , रा.देवपूर, धुळे) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामानिमित्त ते ११ ऑक्टोबर रोजी अमळनेर शहरात आलेले होते. काम आटोपून दुपारी १ वाजता अमळनेर येथील बसस्थानकात आले. अमळनेर ते दोधवड (हिंगोणा) बसमध्ये चढत असतांना संशयित महिला आरोपी संगिता विष्णू लोढे (रा. चाळीसगाव) आणि इतर अनोळखी दोन महिलांनी भिमराव बिऱ्हाडे यांच्या शर्टाच्या खिश्यात मागून हात घालून ६०० रूपयांची रोकड लांबविल्याचे समोर आले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलेला पकडले त्यात महिलेने नखाने…