साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेला आ.मंगेश चव्हाण यांनी अचानक भेट देत तेथे विद्यार्थ्यांना मिळत असलेले निकृष्ट जेवण व विद्यार्थ्यांच्या ढासळलेल्या गुणवत्तेची बाब उघडकीस आणून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. त्याची जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन,. मंत्री ना. अनिल पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनेच्या अनुषंगाने पंचसूत्री कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात केवळ चाळीसगाव निवासी शाळाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा वसतिगृहे येथे पुढील काळात तो राबविला जाणार आहे. त्यात…
Author: Sharad Bhalerao
साईमत, सोयगाव : प्रतिनिधी शस्त्रासह दरोडा घालण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनाने जाणाऱ्या सात दरोडेखोरांना सोयगाव पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पथकांनी रविवारी रात्री एक वाजेच्या दरम्यान शहरातील शिवाजी चौकात रंगेहाथ पकडले. मात्र, त्यापैकी सहा दरोडेखोर अंधाराचा फायदा घेवून फरार झाले आहे. वाहनातून पंचवीस हजार रुपये किंमतीची लाकडी ग्रीप असलेल्या लोखंडी धातूच्या गावठी कट्ट्यासह दहा हजार रुपये किंमतीच्या दोन तलवारी आणि दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच महिंद्रा बोलेरो वाहन दहा लाख रुपये असा दहा लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून एकास अटक केली आहे. सविस्तर असे की, सोयगाव शहरातील शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या गस्तीवरील पोलीस पथकाला रविवारी, १५ रोजी रात्री एक…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी. आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे डॉ.कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन देवगाव येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धेत ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात सात उत्कृष्ट विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख आय.आर.महाजन यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली. निबंध स्पर्धेत प्रथम श्वेता गौतम बैसाणे (इयत्ता दहावी), द्वितीय गिरीजा सुनील माळी (आठवी),…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी स्व. एल.बी. राजपूत यांच्या स्मृतीनिमित्त जळगाव जिल्हा क्रीडा संघातर्फे आयोजित तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेला शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. ही स्पर्धा जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने घेतल्या जात आहे. स्पर्धेत विविध १० गटात ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी यांनी अखिल भारतीय विद्यापीठाचे माजी खेळाडू मीरा गाडगीळ आणि श्रीपाद जोशी यांच्यासोबत खेळून केले. यावेळी जिल्हा क्रीडा संघाचे सचिव नितीन अट्रावलकर, कोषाध्यक्ष सचिन गाडगीळ, राजु खेडकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शैलेश जाधव, अमित चौधरी, सुभाष गुजराती आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन ॲड. विक्रम केसकर यांनी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवून ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (१६, रा. विठ्ठल पेठ) या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात राहणारी ट्विंकल चौधरी ही इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेली होती, तर वडील शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता तिने लहान भावाला दुकानावर काही…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील ९ अनुकंपाधारक उमेदवारांना तलाठी व लिपिक टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याहस्ते शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी तसे नियुक्ती पत्र देण्यात आले. शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत शासकिय नोकरी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांने या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार ‘क’ संवर्गातील १० जागांसाठी १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली. कागदपत्रांच्या पडताळणी नंतर ९ उमेदवारांना अंतिम नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या आदेशानुसार जामनेर सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप हिवाळे यांची फेरनिवड केली आहे. तसेच युवक तालुकाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नव्याने निवड करण्यात आली. यावेळी माजी जि.प.सदस्य संजय गरूड, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, सामाजिक न्यायचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय जाधव, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विश्वजित पाटील, राहुल इंगळे, दिलीप सोनवणे, विशाल माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा तालुक्यातील देवझिरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. समाजकार्य महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू तृतीय वर्ष व एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष क्षेत्रकार्याच्या वैजापूर व मुळ्यावतार गटाचे क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग वळवी यांच्या लक्षात आले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे त्यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरासाठी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा अधिकारी राजेंद्र रनाळकर, महालॅबचे तंत्रज्ञ प्रमोद ठाकरे यांनी सहकार्य केले. शिबिराच्या आयोजनाचे नियोजन क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. प्रा. आशिष गुजराथी, प्रा. नारसिंग…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील प्रताप विद्या मंदिराच्या मुलींच्या संघाने विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत झेंडा रोवला आहे. कळवण येथे नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराच्या १९ वर्षाआतील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावून भरीव कामगिरी केली. प्रथम फेरीत नंदुरबार संघासोबत झालेल्या सामन्यात २-० ने बाजी मारली तर नाशिक संघासमवेत २-० ने आघाडी घेत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आदींनी तसेच सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हातगाव येथे राष्ट्रसंत भगवान बाबा मंदिर भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विधिवत पूजन करुन मंदिर बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री एम.के.आण्णा पाटील, शिक्षक आमदार किशोर दराडे, आ.मंगेश चव्हाण, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, उद्योजक सतीश दराडे, वंजारी समाज भूषण बाळासाहेब सानप, जिल्हा चिटणीस ॲड. प्रशांत पालवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांच्यासह भगवान बाबा उत्सव समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी पंचक्रोशीतील समाज बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.