साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा क्रीडा संघातर्फे आयोजित स्व. एल.बी. राजपूत स्मृती प्रित्यर्थ तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत स्वरदा साने हिने सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि युथ गर्ल्स गटाचे विजेतेपद मिळविले. या तीन गटात अनुक्रमे आर्या बेहडे, धान्वी पाटील आणि चिन्मयी बाविस्कर हे उपविजयी राहिले. या व्यतिरिक्त मिडजेट मुले विजयी शौर्य पांडे, उपविजयी केशीन गोगया, कॅडेट मुले विजयी श्रीराम केसकर, उपविजयी ज्योतिरादित्य चव्हाण, मुली विजयी मण्मयी थत्ते, उपविजयी धान्वी पाटील, सब ज्युनिअर विजयी प्रेषित पाटील, उपविजयी आरुष जाधव, ज्युनिअर मुले विजयी दक्ष जाधव, उपविजयी भूमिज सावदेकर, युथ मुले विजयी महेश चौधरी, उपविजयी दक्ष जाधव, पुरुष विजयी पुष्कर टाटीया, उपविजयी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील बसस्थानकाजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. कैलास निंबा पाटील (वय ३९, रा. बांभोरी, ता.धरणगाव) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. सविस्तर असे की, कैलास पाटील हा तरूण बुधवारी, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरात दुचाकीने जात असतांना धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चारचाकीवरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर (रा.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन झूम मिटिंग आणि स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पध्दतीने मीटिंग आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवा पर्यटन समितीचे अध्यक्ष स्वच्छता मॉनिटर धिरज कुमावत ह्या नववीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.सोनवणे यांनी ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. व्ही.आर.खोंडे यांनी मनोगत केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन व्ही. एन.पाटील यांनी केले तर…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी गावात अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घर फोडून रोख १ लाख ६५ हजारांची रोकड आणि एका शेतकऱ्याच्या ७ हजार रूपये किंमतीच्या कोंबड्या चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात एकाच दिवशी तीन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यात अनिल विश्वास माळी (वय ४८, रा. बांभोरी) हे भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते १४ ऑक्टोबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख ५० हजरांची रोड…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवीच्या नवरात्रोत्सवाला रविवारी, १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यंदा सप्तमी आणि अष्टमीला शनिवार आणि रविवारची सुट्टीचा योगायोग येत आल्याने दोन दिवस मनुदेवीच्या चरणी लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनालाही खबरदारी व उपाययोजना घ्यावी लागली होती. श्री क्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठानलाही परिश्रम घ्यावे लागले. नवरात्रोत्सवानिमित्त आणि भाविकांच्या सुख-सोयी सुविधा करीता मनुदेवी मंदिराच्या सभागृहात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या अध्यक्षतेखाली व फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यावल पो.नि.राकेश मानगावकर, यावल बस आगाराचे वाहतूक नियंत्रक विकास करांडे व कर्मचारी, वनविभागाचे वनपाल…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात रविवारी, १५ ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून द्रुपदाबाई वाचनालयाचे सचिव युवराज पाटील उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून महापुरुषांविषयी माहिती दिली. तसेच वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी वाचन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. वाचन प्रेरणा दिनाविषयीचे महत्त्व…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी, १६ ऑक्टोबर रोजी स्व. संदीप चव्हाण राज्यस्तरीय वरिष्ठ व कनिष्ठ आंतर महाविद्यालयीन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन रोशन केवलसिंग कच्छवा (सहाय्यक आयुक्त IRS,C&IT) यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण असतील. स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. समारोप प्रमोद हिले (उपविभागीय अधिकारी चाळीसगाव), प्रशांत पाटील (तहसीलदार, चाळीसगाव) यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळासाहेब विश्वासराव चव्हाण (सचिव, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड, चाळीसगाव) असतील. स्पर्धेचे उद्घाटन आणि…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून ग्रंथालयात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी दिलीप सोनवणे होते. प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून अमळनेर पो.स्टे.चे पीएसआय अनिल भुसारे, से.नि.प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रमुख भाऊसाहेब देशमुख, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष राजू महाले, हेमंत भांडारकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ.कलाम यांचे विचार देशाला महासत्तेकडे नेतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले. वाचनालयाच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, सचिव प्रकाश वाघ, संचालक भिमराव जाधव यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी, विद्यार्थी, वाचकवर्ग उपस्थित होते. सुत्रसंचालन स्पर्धा परीक्षेचे संचालक विजय पवार यांनी केले.
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील दामोताबाई सुर्वे वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त लोहारा येथील सुर्वे वाचनालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नागरिक आदर्श शिक्षक प्रभाकर चौधरी, वाचनालयाचे अध्यक्ष बापू विनायक पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘माणुसकी समूहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष, समाजसेवक तथा पत्रकार गजानन क्षीरसागर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचे पुस्तकांवर किती प्रेम होते हे त्यांच्या जीवनावरील उदाहरणे देऊन स्पष्ट करून दिले. ज्येष्ठ नागरिक आदर्श शिक्षक प्रभाकर चौधरी यांनीही वाचन करा, वाचनाने मन व बुद्धी यांचा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील टाकळी प्रदे येथे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वाचनालयाचे चिटणीस डॉ.चंद्रभान गोविंदराव पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून नारळ फोडले. अध्यक्षस्थानी तुषार सूर्यवंशी होते. यावेळी कोषाध्यक्ष संजय पवार, संचालक दत्तात्रय वाणी, अरुण मगर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार, योगेश वाणी, गायत्री पाटील उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल दीपक पवार यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. वाचनालयाच्या लिपिक छाया पाटील यांनी आभार मानले.