साईमत, भुसावळ : प्रतिनिधी नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागु होणाऱ्या विविध बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने सजग राहून संशोधन वृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ.एस.एम. गायकवाड यांनी केले. भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात ‘New Frontiers in Biological Sciences NFBS -२०२३’ विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करतांना ते बोलत होते. तसेच वनस्पती आणि प्राणीशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, संशोधनाच्या नवीन विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत संपूर्ण भारतातून १२५ संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यापैकी ५४ संशोधकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. व्यासपीठावर…
Author: Sharad Bhalerao
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी शहरात गेल्या महिन्यात गणेशोत्सव आणि ईद मिलाद सण, उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवासह आगामी सण उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करून वेळेत दुर्गा विसर्जन मिरवणूक समारोप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले. ते फैजपूर येथील पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. शारदीय नवरात्र दुर्गोत्सवानिमित्त फैजपूर पोलीस ठाण्यातर्फे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना नवरात्र व आगामी सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात नगरपालिकेला साफसफाईसाठी व विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्डे बुजण्यासाठी तसेच विजेचे प्रश्न उद्भवणार…
साईमत, रावेर : प्रतिनिधी शहरात नगर पालिका हद्दीत लावण्यात आलेले अनधिकृत बॅनरवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. पालिकेने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. रावेर गावात बऱ्याच लोकांचे वाढदिवसाचे बॅनर हे नगर पालिकेची परवानगी न घेता लावण्यात येतात. तसेच बॅनर हे बरेच दिवस काढले जात नाही. वाढदिवसाच्या बॅनरची परवानगी घेतल्याशिवाय वाढदिवसाचे बॅनर लावू देऊ नये, परवानगीमध्ये बॅनर काढण्याची मुदतही टाकावी, मुदतीचे आत बॅनर न काढल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, वाढदिवसाचे बॅनर लावण्याकामी परवानगी न घेता बॅनर लावल्यास त्यावर कायदेशिर कारवाई दाखल करण्यात यावी, असे न केल्यास रा.काँ.मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी दिवसेंदिवस समाजाला पारंपरिक वाद्यांचा विसर पडत चालला आहे. सार्वजनिक उत्सव, मिरवणूक, लग्न समारंभ आदी ठिकाणी डीजे वाजविण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे साहजिकच पूर्णत: बँड वादकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यावर अवलंबून असलेला बँड मालक सोबत सर्व बँड कारागीरांच्या उपजिविकेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्याचा विचार केल्यास डीजे बंद होणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मलकापूर येथील विश्रामगृहात शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता बँड मालक व सर्व बँड कारागीरांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला सर्व बँड मालक, कारागीरांनी जास्तीत जास्त संख्येने…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जीवन जगले पाहिजे. त्यासाठी आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञानाची आवश्यकता आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन संस्कृतीतून कशी क्रांती घडविली. तसेच विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन आणि त्यांच्या कक्षा रूंदावण्यासाठी सर्वांगिण व्यक्तीमत्त्व विकासासाठी अभ्यासक्रमाच्या पुस्तकासमवेत अवांतर वाचन करावे, असे प्रतिपादन प्रा.सिद्धार्थ झनके यांनी केले. त्यांनी इतर महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दाखले देत विद्यार्थ्यांना मार्मिक हितोपदेश दिला. स्थानिक म्युनिसिपल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. डी. एस. राठोड होते. यावेळी ॲड. संजयसिंह ठाकूर, प्रा. वर्षा देशमुख…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी सामाजिक संस्था ‘जनशक्ती विकास संघ’ (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने पुणे येथे ‘समाजरत्न’ पुरस्कार सोहळ्याचे येत्या गुरुवारी, २ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यावेळी रत्नांचा सन्मान सोहळा होणार आहे. त्यात कायदा तज्ज्ञ आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मलकापूर येथील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यात नेहमी अग्रेसर असणारे ॲड.मो.वसीम यांना २०२३ चा ‘समाजरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय लोकांना ई-पासची सुविधा, लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असल्यावरही लोकांना मदतीचे कार्य केले आहे. त्यांचे सामाजिक कार्य पाहून ॲड.मो.वसीम यांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने येत्या २ नोव्हेंबरला गौरविण्यात येणार…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अजित कुलकर्णी, रा.से.योजना अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.संजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.अजित कुलकर्णी यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. त्यासाठी वाचन स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे, असे मार्गदर्शनात सांगितले. प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन उपलब्ध पुस्तकातून विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करावे, उच्च अधिकारी बनावे, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांसह…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी ‘विजय दिवस’ म्हणून मानल्या जाणाऱ्या विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे “विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव” येत्या शुक्रवारी, २० ऑक्टोबर रोजी शहरातील चांडक विद्यालयाच्या प.पू.डॉ. हेडगेवार सभागृहासमोरील मैदानावर येथे साजरा करण्यात येणार आहे. उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख आ. शैलेश पोतदार असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मलकापूर छत्रपती शिवाजी शैक्षणिक क्रीडा बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके असतील. याप्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहून संघप्रेम व्यक्त करावे, असे आवाहन नगर संघ चालक दामोदर लखानी तथा नगर सह संघचालक राजेश महाजन यांनी केले आहे. समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व सज्जनांचे रक्षण होवून झालेला विजय म्हणून विजयादशमी मोठ्या उत्साहात साजरा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी जीवनात वाचनाचा संस्कार असणे गरजेचे आहे. त्यामुळे जगण्याचा अर्थ कळतो. यासाठी जीवनात वाचनामुळे माणूस समर्थ बनतो, असे प्रतिपादन म.गां. माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पाटील-चव्हाण यांनी केले. त्यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील संस्कारक्षम आणि प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचे जीवनातील महत्त्व आणि डॉ.कलाम यांच्या जीवनातील ठळक, प्रेरणादायी घटनांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन, विजय पाटील आदी उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चोपडा तालुक्यातील चौगावच्या ऐतिहासिक किल्ल्यावर नुकतेच गिर्यारोहण केले. समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर यांच्या मार्गदर्शनातून उपक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी तथा क्रीडा शिक्षक प्रा.नारसिंग वळवी, विद्यार्थी विकास विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष गुजराथी यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी योग्य नियोजन केले. चौगावातील विश्राम तेले यांनी प्रत्यक्ष गिर्यारोहणात सहभागी असलेल्या सर्वांना किल्ल्याविषयीची विस्तृत अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले. समाजकार्य महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल परेश चित्ते, चालक नितीन पवार, उपशिक्षक जितेंद्र जोशी, देवेंद्र पाटील यांनी उपक्रमात सहभाग घेतला. गिर्यारोहण करतेवेळी विद्यार्थ्यांनी चौगाव येथील प्राचीन तलाव, त्रिवेणी संगम याठिकाणी भेट…