साईमत, जामनेर : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय डॉजबॉल स्पर्धा जामनेर गुरुवारी, १९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी मुख्य क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.आशिषकुमार चौधरी, इंदिराबाई ललवाणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, संचालक फकीरा धनगर, संजय महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, नाशिक जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव मुकुंद झनकर, धुळे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट क्रीडाशिक्षक महासंघाचे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मारवाड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित, नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ नुकताच साजरा केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.पवन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी विकास समन्वय समितीच्या (क.ब.चौ.उ.म.वि.जळगाव) सदस्यपदी निवड झालेले प्रा.डॉ.पवन पाटील यांचा प्राचार्य डॉ. वसंत देसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ‘युवारंग’त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील साई नवदुर्गा मित्र मंडळातर्फे नुकत्याच पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत हर्षाली बनकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने लोहारा येथील साई नवदुर्गा मित्र मंडळातर्फे स्तुत्य उपक्रम राबविला. स्पर्धेत २५ मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. सानिध्या खरे हिने ‘भीम’ गीतावर नृत्य सादर करून द्वितीय क्रमांक पटकाविला. आचल माळी व ग्रुप यांनी ‘एकली एकली नाचोरे’ गीतावर तृतीय क्रमांक पटकाविला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील लहान मुले, महिला, वयोवृद्ध, गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. यशस्वीतेसाठी साई नवदुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजू कोळी, पवन खाटीक, नितीन माळी, अतिक कोळी, नितीन कोळी, गजानन भिवसने, यांच्यासह सदस्य कार्यकर्त्यांनी…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था संचलीत कला व विज्ञान महाविद्यालयातील जय आत्माराम बिऱ्हाडे (६० किलो ग्रीकरोमन प्रथम), सयाजी बापू मदने (७४ किलो फ्रीस्टाईल, प्रथम), शिवम सतीश संकपाळ (७९ किलो, फ्रीस्टाईल, प्रथम) यांनी डी.डी.एस.पी.महाविद्यालय, एरंडोल येथे क.ब.चौधरी, उ.म.वि.अंतर्गत आयोजित, एरंडोल विभाग आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत आपआपल्या गटात विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांची फैजपूरला होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिघांना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, कार्यवाहक रघुनाथ पाटील, पहेलवान अनिल बिऱ्हाडे, पहेलवान अशोक पाटील, प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तिघांच्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी वीज महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे त्रस्त झाले आहेत. महावितरणचा ८ तास वीज देण्याचा निर्णय हा केवळ कागदावरच दिसत आहे. शेतासाठी सोमवार ते गुरुवार सकाळी ८ तास आणि शुक्रवार ते रविवार रात्री ८ तास वीज पुरविण्याचे वीज महावितरणचे नियोजन आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र सकाळी ८ तासाच्या विजेच्या वेळी महावितरणचे कर्मचारी याच वेळेला विजेचे काम करतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारपूस केल्यावर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे शेतकऱ्यांना मिळत आहे. विजेची अडचण असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे वीज महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांना सांगत आहे. यावर्षी पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा समारोप समारंभाचे समारोपकर्ते चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार संदेश निकुंभ यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि.चाळीसगाव संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण, संचालक प्रमोद पाटील, सुनील देशमुख, भाऊसाहेब पाटील, सोनूसिंग राजपूत, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्या डॉ.उज्ज्वल मगर, उपप्राचार्य डॉ.जी.डी.देशमुख, स्पर्धा समन्वयक डॉ.के.बी.बेंद्रे, स्पर्धा मार्गदर्शक डॉ.के.सी.देशमुख, डॉ.आर.पी. निकम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धेतील…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या रावेर विभागाच्यावतीने भुसावळ येथे शनिवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता नाहाटा कॉलेज जवळील माळी समाज मंगल कार्यालय माळी भवन येथे ‘ओबीसी आरक्षण अधिकार’ महामेळाव्याचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण अधिकार महामेळावा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा विभागातील भुसावळ येथे ‘ओबीसी आरक्षण अधिकार’ महामेळावा होत आहे. महामेळाव्यात ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासह अनेक मागण्या मेळाव्यात होणार आहे. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक समता परिषदचे…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील समस्त माळी समाजातर्फे वधू-वर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन केले आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात सूचीचे प्रकाशन होईल. माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी उद्योजक रितेश माळी, माळी बंधन संकेतस्थळाचे संचालक प्रशांत महाजन, उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, गोकुळ महाजन, विवेक महाजन, संकेत चौधरी, रोहित महाजन आदी उपस्थित होते. माळी समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा २०२३ हा १० डिसेंबर रोजी लेवा भवन येथे होणार आहे. त्यानिमित्त वधूवर परिचय सूची प्रकाशित…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्त्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरीता लवकर निदान, लवकर उपचार या सूत्रानुसार वेळीच कर्करोग निर्मूलन होऊ शकते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निदान व संशोधन दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत असतो. त्यानिमित्त हा अख्खा महिना “पिंक मंथ” म्हणून ओळखला जातो. हा पिंक मंथ ब्रेस्ट कॅन्सर झालेल्यांना समर्पित आहे. महाराष्ट्र शासनाने याविषयी जनजागृती हाती घेतली आहे. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग तपासणी अभियानअंतर्गत बुधवारी जनजागृती करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी साने गुरुजी हे मुला-फुलांचे कवी होते. लहान मुलांमध्ये ते लहान होऊन मिसळून जात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत होते. त्यांना गोष्टी सांगत होते. अशा मातृहृदयी गुरुजींच्या नावाने सुरु असलेली कथामाला गेली अनेक वर्षे अव्याहत सुरु ठेवणाऱ्या कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेला आणि कथामाला संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सी. एस.पाटील यांनी कथामाला उद्घाटनासह प्रथम पुष्प गुंफतांना केले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे होत्या. ईशस्तवन, स्वागतगीत आणि साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी सादर केल्याने वातावरण निर्मिती छान झाली. प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने मुले भारावली होती. प्रमुख पाहुणे…