Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निंभोरासीम ते पिंप्रीनांदु दरम्यानच्या दोघे फाट्यापासून ते तापी पुलापर्यंत रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहेत. हे संचारबंदी आदेश फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी लागू केले आहेत. केळी पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नसल्याने पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सचिन रमेश पाटील (चोरवड, ता. रावेर) व योगेश ब्रिजलाल पाटील (रा. मुंजलवाडी, ता. रावेर) हे १८ ऑक्टोबरपासून रावेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहे. त्यातील उपोषणार्थी रमेश नागराज पाटील हे रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी चाळीसगावचे बी.पी.आर्ट्‌स, एस. एम. ए. सायन्स अँड के.के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव येथे महाविद्यालयाचा वार्षिक अंक ‘उन्मेष’ नियतकालिकाचे प्रकाशन सुरेश स्वार (चेअरमन, सिनिअर कॉलेज कमिटी) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ.ए. व्ही. काटे, उपप्राचार्य प्रा.डी.एल.वसईकर, उपप्राचार्य डॉ.कला खापर्डे, संपादक डॉ.सुनीता कावळे आदी उपस्थित होते. यावेळी सुरेश स्वार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कथा, कविता, लेख लिहायला प्रोत्साहित करावे. त्यांना आपल्या भावना, विचार लिहिण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनीही मनोगत…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोळगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव, संचलीत गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी नंदिनी लक्ष्मण सूर्यवंशी (४८ किलो) हिने क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे तथा धुळे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, धुळे येथे आयोजित १७ वर्षाआतील मुलींच्या विभागस्तरीय वुशू स्पर्धेत प्रथमस्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे तिची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नंदिनीला कार्यवाहक रघुनाथ पाटील, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल तिचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर, प्राध्यापक-प्राध्यापिका आदींनी कौतुक केले आहे.

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी नवरात्रीचा सण संयम, सहिष्णुता, भक्ती, सामर्थ्य, तपश्चर्या, धैर्य, धर्म, पवित्रता आणि सिद्धी यांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या काळात उपवास केला जातो आणि देवीची प्रार्थना केली जाते. हा उत्सव भक्ती, साहित्य, संगीत आणि कला प्रतिबिंबित करतो. समाजातील महिलांचे स्थान मजबूत करते. नवदुर्गेचे गुण अंगीकारून स्त्रीशक्तीचा विस्तार करता येईल. महिलांनी नऊ देवींच्या नऊ गुणांना अंगीकार केले पाहिजे. तसेच समाजातील प्रत्येक जात धर्मातील महिलांचे स्थान मजबुत होईल तीच खऱ्या अर्थाने देवींची पूजा होईल, असे प्रतिपादन चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले. चोपडा तालुक्यातील विटनेर येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते गावातील सुप्रसिद्ध दैवत…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतच्या २१ हजार ३८१ विद्यार्थ्यांसाठी १० ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अनिल झोपे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या नियोजनातून ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम चाळीसगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दहा दिवसांचा कृती कार्यक्रम आखला गेला होता. या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवस निहाय गणिताच्या मूलभूत क्षमतांचे अध्ययन व अध्यापन करण्याचे नियोजन केले गेले…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वालझरी पिंपरखेड येथे टकारखान शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत इम्रान खान यांच्या शेतातील गायीच्या वासराचा बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्री फडशा पाडला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने वलझरी शिवारातील एका उसाच्या शेतात वासराचा फडशा पाडला होता. वनविभागाला त्याची माहिती दिली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. सध्या शेतात मका तयार करणे, कापूस वेचणी अशी कामे सुरू आहे. पिंपरखेड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शेतकरी व मजूर भयभीत झालेले आहे. मजूर बिबट्याच्या भीतीने शेतात कामास यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती उपाय योजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत संकलित केलेले अमृत कलश यात्रेचे १६ ऑक्टोबर रोजी आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.ए.व्ही.काटे, उपप्राचार्य प्रा.वसईकर, उपप्राचार्य डॉ.खापर्डे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.आर.बोरसे, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.बी.पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.बंस्वाल, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पगार, प्रा.अंकुश जाधव, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.उंदिरवाडे, प्रा.प्रमोद पवार यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते. अमृत कलश म्हणजे आपल्या मातीला आणि मातेला वंदन करणे होय. असे पूर्ण भारतातील अमृत कलश संकलित करण्यात येऊन दिल्ली येथे त्यांचे सामूहिक पूजन केले जाणार आहे. त्यानंतर याच उपक्रमाचा भाग म्हणून रासेयो आणि…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील गणेश रसवंतीच्या चालकाने ग्राहकाची साधारण एक लाखाची सोन्याची पुडी परत करून प्रामाणिकपणा दाखविला. चौधरी यांचा प्रामाणिकपणा पाहून पंकज दुसाने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट आणि पेढे देऊन त्यांचा सत्कार करुन आभार मानले. त्याबद्दल त्यांच्या प्रामाणिकपणाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पी.एन.ज्वेलर्सचे संचालक पंकज दुसाने हे बाजारातील गणेश रसवंतीत रस पिण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांची सोन्याची एक पुडी तेथेच पडली. दुसाने हे घरी गेल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सकाळी सर्वत्र शोध घेतला. मात्र, सोन्याची पुडी सापडली नाही. दिवसभरात कुठे-कुठे गेले त्या मार्गाने शोधत-शोधत ते गणेश रसवंतीवर गेले. तेव्हा दुकानाचे चालक नामदेव सदाशिव…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने संस्थापक-अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्रात गुजरात, केंद्रीय माळी समाज सुधार यांच्या प्रयत्नाने रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील क्षत्रिय काच माळी समाज मंगल कार्यालयात ओबीसी आरक्षण निर्धार मेळावा आयोजित केला आहे. माळी समाज बांधवांसह महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघातर्फे केले आहे. ओबीसी आरक्षणावर गदा येता कामा नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जातीनिहाय जनगणना व्हावी आदी मागण्यासाठी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पाऊले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. दरम्यान, या बैठकीला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री गुलाबराव पाटील सहभागी झाले होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार रमेशदादा पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार चिमणराव पाटील, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त…

Read More