७८ विद्यार्थी, ६० दिवस : विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १ जुलै ते १ सप्टेंबर या कालावधीत ६० दिवसांचा इंग्रजी अभ्यास उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमात दहावीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शाळेचा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ‘इंग्रजीचा’ दरवाजा उघडणारा ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचा उपक्रमातून सूर उमटला बोर्डाच्या परीक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या रायटिंग स्किल्स व सुंदर लिखाणाच्या सरावावर उपक्रमात विशेष भर देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी दररोज उपस्थित राहून उत्साहाने उपक्रम पूर्ण केला. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयावरील…
Author: Sharad Bhalerao
पत्रकार परिषदेत भाजपाचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचा विश्वास साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारताच्या अमृतकाळात सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने केलेली जीएसटी ‘दरकपात’ ऐतिहासिक आणि सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंब, व्यापारी आणि व्यावसायिकाला थेट दिलासा मिळणार असल्याचा विश्वास भाजपाचे प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पत्रकार परिषदेला आ. सुरेश भोळे (राजूमामा), भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, राजेंद्र सोनवणे, जिल्हा पदाधिकारी अशोक राठी, दीपक परदेशी, आशिष सपकाळे, जीएसटी सहसयोजक चंद्रशेखर अग्रवाल, मनोज…
सोहळ्यात विद्यार्थ्यांना मिळणार यशाचे सुवर्ण ‘सन्मानचिन्ह’ जळगाव/साईमत/प्रतिनिधी: जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी, २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन), टेलिफोन ऑफिसच्या मागे, जळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प.पू. मुनिश्री १०८ आस्तिक्य सागर महाराज व प.पू. मुनिश्री १०८ विनियोग सागर महाराज यांच्या पावन उपस्थितीत आणि छत्रछायेखाली कार्यक्रम होईल. गुणगौरव सोहळ्यात जिल्ह्यातील दिगंबर जैन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हासह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन, उद्योगपती अशोकभाऊ जैन, केंद्रीय राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री ना.…
वैभवी बगाडेसह परशुराम विद्यालयाने गाजवला ‘पोवाडा’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : बालरंगभूमी परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभरात अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून “इतिहास महाराष्ट्राचा– श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक” उपक्रमाचे आयोजन केले होते. राज्यभरातील २६ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून सात हजारांहून अधिक बालकलावंतांपैकी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ठ विजेत्यांची महाअंतिम फेरी गेल्या १३ व १४ सप्टेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात पार पडली. महाअंतिम फेरीत जळगाव शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने समूह गटात विशेष लक्षवेधी पुरस्कार पटकावला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साभिनय सादर केलेल्या पोवाड्याला सन्मान मिळाला. त्याचबरोबर वैभवी बगाडे हिने सादर केलेल्या पोवाड्यालाही एकल गटात विशेष लक्षवेधी पुरस्कार मिळाला. यावेळी बालरंगभूमी…
जळगाव एलसीबीची कारवाई, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) धडाकेबाज कारवाईत प्रवाशांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कारवाईत एका रिक्षा चालकास अटक केली आहे. दरम्यान, त्याच्याकडून रिक्षासह १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सहा वाजता जळगावहून भुसावळकडे रिक्षाने जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील २५ हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने संशयित…
कामायनी एक्सप्रेस प्रकरण : चार आरोपींसह साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कामायनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर हल्ला करून पैशांची बॅग हिसकावणाऱ्या चार आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडले आहे. कारवाईत तब्बल साडेचार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. बऱ्हाणपूर–जळगाव मार्गावरील कामायनी एक्सप्रेसमध्ये गेल्या ९ सप्टेंबर रोजी प्रवासी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांच्यावर चार संशयितांनी हल्ला करून त्यांच्याकडील बॅग हिसकावली होती. घटनेनंतर आरोपी रावेर स्टेशनवर उतरून फरार झाले होते. तपासाअंती १८ सप्टेंबर रोजी जी.एस. ग्राऊंड परिसरात संशयित आरोपींच्या हालचाली दिसत असल्याची माहिती वरिष्ठ…
जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई, भुसावळात अटक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क कारवाईत गुजरात राज्यातील अट्टल गुन्हेगार साहील उर्फ सलीम पठाण (वय २१, रा. भाटिया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) याला भुसावळ शहरात सापळा रचून अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी तापी व्यारा (सेशन कोर्ट, गुजरात) येथील गंभीर गुन्ह्यात फरार होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या अटकेसाठी गुजरात पोलिसांना शोध सुरू होता. गुजरातमधील निझर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीवर तापी व्यारा कोर्टातील केसनुसार जबरी चोरी, शारीरिक मारहाण तसेच कट रचण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. एलसीबीच्या…
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळेला प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय औषध दक्षता सप्ताहानिमित्त ‘औषध दक्षता–सामान्य चिकित्सकांमध्ये जागृती’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ४० चिकित्सकांनी सहभाग घेऊन औषध सुरक्षा जनजागृतीसाठी एकत्र संकल्प केला. कार्यशाळेतील सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यशाळेचा औषधांचे दुष्परिणाम ओळखणे, त्याची नोंद करणे व समाजात औषध सुरक्षा जनजागृती करणे मुख्य हेतू होता. कार्यशाळेत ‘महिलांमधील औषध सुरक्षिततेवर’ डॉ. माया आर्वीकर यांनी प्रकाश टाकला तर डॉ. चंद्रया कांते यांनी ‘परिणामकारकता व दुष्परिणाम’ ओळखण्याबाबत माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ. निलेश बेंडाळे यांनी ‘औषधांची सामाजिक सुरक्षितता’ अधोरेखित केली तर…
१० सुवर्णांसह १९ पदके ; मान्यवरांच्या हस्ते पदके प्रदान साईमत/जळगाव/प्रतिनिधी : सीआयएससीईच्या सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत १९ पदके पटकावली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देशभरातून आलेल्या स्पर्धकांवर वर्चस्व गाजवले. विशेष म्हणजे आयोजक जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या यशात भर घातली. विजेत्या खेळाडूंना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास आणि आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली. १४ वर्षाखालील गटात महाराष्ट्राची दिशा मेहता (मुंबई) हिने उत्कृष्ट कामगिरी करत ‘सर्वोत्तम खेळाडू’ हा मान मिळवला.…
एक मित्र आणा, संस्कार पसरवा : युवकांसाठी संस्कारांची अनोखी पर्वणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील टीव्ही टॉवर शेजारील उभारलेले भव्य, नक्षीकामयुक्त आणि सांस्कृतिक-धार्मिक वारशाचे दर्शन घडवणारे श्री स्वामिनारायण मंदिर केवळ उपासना आणि आराधनेचे केंद्र नाही तर भारतीय सनातन धर्माच्या परंपरा, संस्कार आणि आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. अशा मंदिरात नियमितपणे विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी, २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत “ब्रिंग अ फ्रेंड्स” विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना भारतीय संस्कृतीची, सनातन धर्माच्या महान परंपरेची आणि स्वामिनारायण संप्रदायाच्या शाश्वत संदेशाची ओळख करून देणे,…