Author: Sharad Bhalerao

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर पाळधी बु. येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार आहे. ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १७ पैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. पाळधी बु. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी ९ अर्ज दाखल झाले होते. मात्र, माघारीच्या दिवशी सहा जणांनी माघार घेतल्याने आता या पदासाठी तीन जण रिंगणात आहे. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे. सात वॉर्डातून १७ जागांसाठी ६६ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातून सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित ११ जागांसाठी २७ उमेदवार निवडून रिंगणात उतरले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या जागांमध्ये वॉर्ड एकमधून २, वॉर्ड दोनमधून ३ तर वॉर्ड तीनमधून…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तळेगावसह शिरसगावला सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी गुणवंत शेलार आणि दिलीप पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तालुक्यातील तळेगाव, शिरसगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट दिली. तळेगावला ते म्हणाले की, राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. शासनाने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे सांगत मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, मा.जि.प.सदस्य अतुल देशमुख, शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, माजी सैनिक विकास पाटील तर तळेगावचे कल्याणराव देशमुख, तुषार देशमुख, कैलास शेलार, सतीश देशमुख, प्रवीण शेलार, महेंद्र…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरातील भडगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात श्रीकृष्ण नगरातील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भूषण संतोष हटकर (वय २०, रा. श्रीकृष्ण नगर, पाचोरा) असे मृत तरूणाचे नाव आहे. सविस्तर असे की, जळगाव चौफुलीजवळील श्रीकृष्ण नगर परिसरातील रहिवासी भूषण संतोष हटकर (वय २०) आणि प्रवीण नाना हटकर (वय २२) हे दोघे मित्र दुचाकीवरुन (क्रमांक एमएच १९ ई डी २१९६) मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घरी जात होते. दरम्यान जारगाव चौफुलीकडून (क्र.एमएच १५ बीएन १०३५) मधील दोघेजण भडगाव रस्त्याकडे जात असतांना…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धन कार्यात अग्रेसर सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्रभरातील जवळपास १०० पेक्षा अधिक किल्ल्यांवर दसऱ्यानिमित्त तोरणे पताका बांधून गडाचे पूजन करण्यात आले. याच उपक्रमातंर्गत चाळीसगाव तालुक्यातील मल्हारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून तोरणे, पताका बांधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढत भंडाऱ्याची उधळण करुन गडाचे पूजन करण्यात आले. मल्हार गडावरील गडदेवता खंडोबाची आरती आणि तळी भरून संबळ पिपाणीच्या तालावर ठेका धरणाऱ्या दुर्गसेवक, दुर्गसेविकांच्या उपस्थितीत सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत राबविला जाणारा मल्हारगड दसरा महोत्सव यंदा सातव्यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला. चाळीसगाव तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, दुर्गसेविका तसेच चाळीसगाव सायकल असोसिएशन, स्विमिंग असोसिएशनचे असंख्य सदस्य उपस्थित होते.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी विजयादशमी आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून तालुका बौद्ध पंचायतच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायतीचे अध्यक्ष तथा माजी आमदार साहेबराव घोडे, तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण, माजी आ.राजीव देशमुख, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, दै.’ग्रामस्थ’चे संपादक किसनराव जोर्वेकर, चा.ए.सोसायटीचे सचिव डॉ.विनोद कोतकर यांच्या हस्ते समारंभ झाला. पंचायतीचे कार्याध्यक्ष गौतम झाल्टे, उपाध्यक्ष रामचंद्र जाधव, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, संचालक गौतम जाधव, राहुल जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेतर्फे सरचिटणीस धर्मभूषण बागुल यांनी केले. त्यांनी तालुक्यात १० एकर जमिनीवर १० कोटीचे भव्य असे बौद्धविहार उभारण्याची संस्थेची योजना आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांना…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांनी जळगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बकालेंच्या अटकपूर्व जामिनावर सरकार पक्षातर्फे २५ ऑक्टोबर रोजी खुलासा सादर करण्यात आला. न्यायालयाने याबाबत पुढील कामकाजासाठी आता ३१ ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. निलंबित पोलीस किरण बकाले यांचे उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही तसेच न्यायालयाने चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर व्हा म्हणून सांगितल्यावरही ते हजर राहत नाहीत. उच्च न्यायालयाने आधीच बकाले यांचा अटकपूर्व नाकारला असताना…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी एकीकडे सर्वत्र दसऱ्याचा उत्साह सुरू असतांना मध्यरात्रीनंतर शहर पुन्हा एका खुनाच्या घटनेने हादरले. शहरासह परिसरातील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झालेला आहे. पोलीस प्रशासनाने अनेक गुन्हेगारांना हद्दपार केले असले तरी गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यातच अलीकडच्या काळात खुनांची सुरू असलेली मालिका देखील कायम असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दसऱ्याच्या रात्री शहरात दिलीप रामलाल जोनवाल यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आदील दस्तगिर खाटीक आणि साजिद सागिर खाटीक या दोघा चुलत भावांना अटक करण्यात आली आहे. यातील आदील हा याच घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खून का बदला खून या…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील साळवा येथील भिलाटी भागात राहणाऱ्या ऊसतोड कामगारांनी दोन भावांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, रमेश शालीकराम मालचे (वय-४५, रा. निशाणे, ता.धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांनी शेतातील ऊस काढण्यासाठी धरणगाव तालुक्यातील साळवा गावानजीकच्या भिलाटी वस्तीतील कामागारांना ॲडव्हॉन्स पैसे दिले होते. दरम्यान, सोमवारी, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रमेश मालचे व त्याचा मोठा भाऊ सुधाकर मालचे हे साळवा येथील भिलाटी वस्तीत गेले. दसरानंतर तुम्हाला कामावर जायचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या पर्वाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन केले. त्यानुसार चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव आणि शिरसगाव येथे सकल मराठा समाजाने साखळी उपोषणाला बुधवारी, २५ रोजी सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे, आंदोलने केली असताना शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. संवैधानिक पध्दतीने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात सरसकट मराठा समाजाचा समावेश करण्यासाठी सलग १७ दिवस आमरण उपोषण केले. आमरण उपोषणाची दखल घेऊन…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या गावांना २५ लाखांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंतचा विकास निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यात पाच हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना ५० लाख तर पाच हजाराच्या आतील लोकसंख्या असणाऱ्या गावांना २५ लाख रुपये विकास निधी दिला जाणार आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असावा व गावाचा ही विकास करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट-तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. चाळीसगाव तालुक्यात येत्या…

Read More