साईमत, मलकापूर : प्रतिनिधी संविधानाची खोली समुद्रापेक्षा खोल आहे. एवढे महान भारतीय संविधान आहे. त्यामुळे संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने राहण्याचा अधिकार दिला असल्याचे प्रतिपादन विधीतज्ज्ञ ॲड. साहेबराव मोरे यांनी केले. लीगल फायटर फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी रिपाइंचे ज्येष्ठ नेते सु.मा.शिंदे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे, ठाणेदार विलास पाटील, रिपाइं आठवले गटाचे विदर्भ उपाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, ‘समतेचे निळे वादळ’चे जिल्हाध्यक्ष ॲड. कुणाल वानखेडे, ॲड.जी. डी. पाटील, राहुल तायडे, ॲड. नितीन जाधव, ॲड.रवींद्र निकम, ॲड.सुनील मराठे, सय्यद आहेर, ॲड. विशाल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे होते. यावेळी जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. व्यासपीठावर रवींद्र पाटील (प्रदेश सरचिटणीस), तालुक्याचे नेते बंगालीसिंह चितोडीया, युवा नेते अरविंद चितोडीया, अरविंद तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील तर कार्याध्यक्ष म्हणून किरण राजमल पाटील (केकतनिंभोरा), नरेंद्र जंजाळ (विधानसभा क्षेत्रप्रमुख), विकास दशरथ पाटील (तालुका सचिव), प्रभू भिवा झाल्टे (शहराध्यक्ष), पंडीत गणपत नाईक (तालुका उपाध्यक्ष), अभयसिंग राठोड (कार्याध्यक्ष), दत्तात्रय नेरकर (ओबीसी शहराध्यक्ष), विकास चव्हाण (व्ही.जे.एन. टी. तालुकाध्यक्ष),…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांमध्ये ‘बहिणाबाई अभ्यासिकांना’ प्रारंभ होत आहे. यापैकी चार अभ्यासिका सुरू झाल्या आहेत तर येत्या आठवडाभरात उर्वरित सुरू होत आहेत. विद्यापीठाने अत्यंत अभिनव अशी योजना विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. विद्यापीठाने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात बहिणाबाई अभ्यासिका सुरू करण्याची योजना मांडली होती. ग्रामपंचायत/नगरपंचायत हद्दीतील महाविद्यालयांमध्ये ही अभ्यासिका सुरू केली जावी, अशी विद्यापीठाने कल्पना मांडली. महाविद्यालयातील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवांमध्ये संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परीक्षेच्या पूर्वतयारीकरीता आवश्यक असणाऱ्या बाबींचा विचार करून महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र वाचन कक्षाची निर्मिती करण्यात यावी आणि…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पान्हेरा, ता.मोताळा, जि.बुलढाणा येथील कान्हू सती मातेच्या यात्रेत जळगावच्या आनंद लोकनाट्य मंडळातील दोन कलावंतांचा झालेल्या अपघाती घटनेत दुर्दैवी मृत पावलेल्या कलावंतांच्या कुटूंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रूपये मदत मिळावी, यासाठी खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, कार्याध्यक्ष शेषराव गोपाळ, उपाध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांच्यासह खान्देशातील विविध लोककला प्रकारात कार्यरत ५० कलावंतांच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांना घटनेचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी लोककलावंत संतोष चौधरी,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरालगतच्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील “टोडलर टेल्स”मधील प्लेग्रुप व नर्सरीचे विद्यार्थीही जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये साजरा होत असलेल्या बालदिनाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, बालगीत, वेशभूषा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. सर्वप्रथम शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल व जी. एच. रायसोनी टोडलर टेल्सच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या रोजच्या अभ्यासातून थोडी उसंत मिळावी म्हणून शिक्षकांनी विविध सामूहिक खेळांचे आयोजन केले होते.…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी शहरात विविध ठिकाणी रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने डॉ.अमरकुमार आनंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान प्रचार, प्रसारासाठी मलकापूर शहरातील द पीपल्स बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा, हिंदी मराठी पत्रकार संघ, लिगल फायटर्स फाउंडेशन मलकापूर महाराष्ट्र यांना भारतीय संविधान उद्देशिकेच्या प्रत मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. डॉ. अमरकुमार तायडे संपूर्ण महाराष्ट्रात संविधान जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम राबवित असतात. तसेच प्रगल्भ असा वैचारिक वारसा असल्याचे हा तरुण चालता बोलता आलेले एक विद्यापीठ आहे. डॉ.तायडे यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून घेतले आहे. तसेच देशातील अनेक लहान-मोठे पुरस्कारही त्यांच्या नावे आहेतच. ते नवनवीन प्रयोग निस्वार्थीपणे…
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर सावदा नगरपालिकातर्फे शहरवासीयांना आकारण्यात आलेला घरपट्टी कर हा चुकीचा आणि जास्तीचा आहे. न.पा.कडून शहरात योग्य त्या मुलभूत सुविधांचा अभाव असताना अशा प्रकारे कर स्वरुपी सर्वसामान्य माणसांचे होणारे आर्थिक शोषण थांबविण्यात यावे, अशा जनहितार्थ मागणीचे निवेदन आ.चंद्रकांत पाटील यांना शहरातील समाजसेवक सोहेल खान, शिवसेना शहरप्रमुख सुरज उर्फ बद्री परदेशी, युसूफ शाह, फरीद शेख, गौसखान सर, शाईस्ता सर, मनिष भंगाळे, निसार अहमद, इरफान मियां यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष अफसर खान उपस्थित होते. त्यानंतर कॅबिनेटच्या होणाऱ्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून दोन-तीन दिवसात थेट समस्यांचे समाधान वरणगाव न.पा.च्या धर्तीवर वाढीव कराला स्थागिती मिळवून देण्यात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनातील एक अत्यंत लोकप्रिय असणारा ‘कवी कट्टा’ उपक्रम दोन दिवस आयोजित केला आहे. त्यात महाराष्ट्रातील नवोदित तसेच प्रस्थापित कवींना सहभागी होता येईल. अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात ‘कवी कट्टा’ नियोजनाबाबत बैठक नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी मराठी वाड्मय मंडळाचे कार्यवाहक नरेंद्र निकुंभ होते. व्यासपीठावर ‘कवी कट्टा’चे प्रमुख संयोजक तथा पुणे मंडळाचे उपाध्यक्ष राजन लाखे, ‘कवी कट्टा’चे समन्वयक रमेश पवार उपस्थित होते. बैठकीत ‘कवी कट्टा’ आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करुन विविध समित्यांची…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील घाट रोड छाजेड ऑइल मिल मागील जमजम किराणासमोर वार्ड क्रमांक १५ मधील रस्त्यावरील नगरपरिषदेची पाईपलाईन गेल्या कित्येक महिन्यांपासून लिकेज आहे. लिकेजमुळे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मलेरिया, डेंग्यू सारख्या आजाराला आमंत्रण देत आहे. हा लिकेज बंद करावा, अश्या आशयाचे लेखी निवेदन परिसरातील नागरिकांनी अनेकदा न.पा.च्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यांना केवळ आश्वासन दिले जातात. निवेदन कचरा कुंडीत टाकत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर केला आहे. अशा समस्या संदर्भात या भागातील माजी नगरसेवकांना अनेकदा सांगूनही ते लक्ष देत नाही, अशी माहिती नागरिकांनी दिली. नगरपरिषद येथे प्रशासक बसल्याने माजी नगरसेवकांच्या तक्रारी नगरपरिषदेमध्ये अधिकारी, कर्मचारी ऐकत नसल्याचा आरोप या भागातील…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जामनेर ते बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीजवळील वाडीकिल्ला गावाजवळ दुचाकी-मोटार सायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. त्यात दोन दुचाकी एकमेकांना धडकल्यानंतर कारने दोन्ही दुचाकींना उडविले. बोदवडहून जामनेरकडे जाणाऱ्या दत्तू रामा माळी आणि सुनील भोई यांच्या दुचाकीचा वाडीकिल्ला येथून मालदाभाडी येथे जाणारे ईश्वर त्र्यंबक पारधी यांच्या दुचाकीची धडक झाली. यामुळे दोन्ही वाहने रस्त्यावर पडले. त्यातच भरधाव वेगात असलेल्या मागून आलेल्या कारने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. अपघातात दत्तू रामा माळी, सुनील भोई आणि ईश्वर पारधी यांचा मृत्यू झाला. तसेच कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल…