Author: Sharad Bhalerao

साईमत, भडगाव : प्रतिनिधी शहरासाठी १३३ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. त्यामुळे आगामी दीड वर्षात शहरवासीयांना दररोज शुध्द पाणी मिळणार असल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. योजनेत गिरणेवर पक्का बंधारा, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. शहरवासीयांना जो शब्द दिला होता, तो पूर्ण करता आल्याचे मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले. भडगाव शहरासाठी शासनाकडून १३३ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर झाली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला. त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्‍न कायमचा निकाली निघाला आहे. आगामी दीड वर्षात योजनेचे काम पूर्णत्वास येऊन शहरवासीयांना दररोज शुध्द पाणी मिळणार आहे. योजनेत गिरणा नदीवर कच्च्या बंधाऱ्याच्या जागी पक्का केटीवेअर बांधण्यात…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथील महिला सरपंच शांताबाई पाटील ह्या आठ महिन्यापासून सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. आठ महिन्यात ग्रामसेवक जी.एच.राठोड यांनी कोणत्याही कामात सरपंच यांना विश्‍वासात न घेता कामे केल्याचे आरोप सरपंच यांनी केला आहे. येथील ग्रामनिधी गावातील नळपट्टी, पाणीपट्टी यांची वसुली रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर किती आहे हे वारंवार सरपंच यांनी विचारले. तेव्हा त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली. तसेच शासकीय योजनेतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना किती घरकुले मंजूर करण्यात आली, किती पूर्ण झाली, किती प्रलंबित आहेत, याबाबत सरपंच ग्रामसेवकांना माहिती विचारायचे. परंतु त्या संदर्भात एकही घरकुलाची माहिती त्यांना मिळाली नाही. तसेच ग्रामसेवक हे वीस दिवसातून एक दिवस यायचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने चोरी करुन माल घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जप्त केलेला पाईप आणि वाहन अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापुढे कोणी संशयित व्यक्ती चाळीसगाव शहरात फिरत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला द्यावी. यामुळे चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याकामी पोलिसांना मदत होईल. तसेच ‘चाळीसगाव शहर सुरक्षित शहर’ राहील, असे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. सविस्तर असे की, येथील शहर पोलीस स्टेशनने यंदा २०२४ हे वर्ष ‘चाळीसगाव शहर सुरक्षित शहर’ संकल्पनेखाली काम सुरु केले आहे. संकल्पनेच्या आधारे चाळीसगावच्या नागरिकांमध्ये सुरक्षेकामी जनजागृती करण्यात येत आहे.…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून यावल तालुक्यातील एका ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा आदेश यावल पंचायत समितीच्या कार्यालयात प्राप्त झाला आहे. परंतु यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी याप्रकरणातील फिर्यादीला अंधारात ठेवून कारवाई दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे यावल तालुक्यासह जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात चर्चिले जात आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा दुरुपयोग केला आहे. संबंधित ग्रामसेवकाने सरपंच व त्या ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. त्यामुळे पंधरावा वित्त आयोगातील अंदाजे ७ ते ८ लाख रुपयांचा निधी आपल्या सोयीनुसार खर्च करून गैरप्रकार भ्रष्टाचार केला आहे. दप्तरी दाखल असलेल्या बिलाप्रमाणे नेमक्या त्याच वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात आहे किंवा…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील येवती-रेवती ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रवक्ता प्रमोद धामोडे यांच्या पत्नी साधना प्रमोद धामोडे यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली आहे. येवती ग्रामपंचायत येथे प्रशासक पंडित ठाकरे आणि ग्रामसेवक गणेश घुले यांच्या समक्ष सर्वानुमते ईश्‍वर चिठ्ठीद्वारे शुभम गणेशराव पाटील यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. शुभम पाटील उच्चशिक्षित असून ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व येवती गावाला उपसरपंच म्हणून लाभले आहे. त्यामुळे गावातील शैक्षणिक, आरोग्य व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी डॉ.आनंद माळी, योगेश माळी, भागवत पाटील, जितु ट्रेलर, दत्तु धनगर, भागवत धनगर, डिगंबर माळी,…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी लक्झरी बस आणि टँकरच्या झालेल्या जबर धडकेत टँकरचा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी, ६ डिसेंबर रोजीच्या रात्री राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी नगर उड्डाणपुलाजवळ घडली. रिमझिम पाऊस सुरु असल्यामुळे ट्रकचे ब्रेक लागले नसल्याने अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सविस्तर असे की, अकोल्याकडून भुसावळकडे जाणारी लक्झरी बस (क्र.एआर २० ए ३५०७) तर जळगावकडून खामगावकडे जाणारा टँकर (क्र.जीजे १६ एडब्ल्यू ३८०४) या दोन्ही वाहनांमध्ये लक्ष्मी नगर उड्डाणपुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. लक्झरी बसमधील ३५ ते ४० प्रवासी सुखरूप…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी वरणगाव नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्याबाबतीत भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी बुधवारी, ६ डिसेंबर रोजी वरणगाव नगर परिषद कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी थकीत कर वसुली, पाणी पुरवठा बाबतीत आढावा घेऊन नगर परिषदेच्या नवीन इमारतीची पाहणी केली. वरणगाव नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार चार वर्षापासून प्रशासक म्हणून भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी यांच्याकडे आहे. तेच शहराच्या विकासाची सुत्रे हलवित आहेत. मात्र, यापूर्वी असलेले प्रशासक रामसिंग सुलाणे यांचे वरणगाव नगर परिषदेच्या कामकाजाकडे फारसे लक्ष नव्हते. त्यांनी वरणगावात मोजक्याच कार्यक्रमावेळी हजेरी लावली होती. त्यामुळे बहुतांश…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी कंटेनरमधून निर्दयतेने ५४ म्हशीचे पारडू (हेला) यांना कोंबून घेऊन जाताना तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळ मुक्ताईनगर तालुका सनातन हिंदू समाज गोरक्षक व हिंदू समाज कार्यकर्ते यांनी कंटेनर बुधवारी, ६ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलिसांना पकडून दिला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील डोलारखेडा फाट्याजवळून ६ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कंटेनर (क्र.आरजे ११ जीबी ९४८७) हा जात असताना गोरक्षक कार्यकर्त्यांनी कंटेनर थांबवून त्यामध्ये काय आहे, त्याची पाहणी केली. तेव्हा कंटेनरमध्ये ५४ म्हशीचे पारडू अंदाजे दोन वर्ष वयाचे कोंबून घेऊन जाताना आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुमखेडा, शिवार हतनूर धरणाच्या पुलाजवळ भारतीय वंशाचे दोन लाख ८५ हजार रुपये किमतीचे १३ उंट अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून त्यांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी दहा लाख रुपये किमतीची आयशर ट्रकला (क्र.सीजी १२ बीएच ३२८१) बुधवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी पकडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून एक फरार झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विनोद भिमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकबूल खान फकरुद्दीन खान (वय ४५, रा.वरखेडा तह.आष्टा, जि. सिहोर), अरबाज खान शकील…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या चाळीसगाव येथील विराट सभेसाठी येताना बऱ्याच चांगल्या गोष्टी दिसल्या. जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळावे, यासाठी सर्व समाजाने एकत्र येत स्वागत केले. शहरातील हॉटेल सदानंद जवळील त्यांचे जल्लोषमय झालेले स्वागत. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर जाऊन अभिवादन त्याठिकाणी बौद्ध समाजाचे लोकांनी एकत्र येत जरांगे पाटील यांचे स्वागत केले. पुढे अँग्लो उर्दू शाळेजवळ मुस्लिम संघटना व नेत्यांनी स्वागत केले. देशमुख, राजपूत, बंजारा व सकल मराठा समाज यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. हजारोच्या संख्येने नागरिकांनी सभेला गर्दी केली. कॉलेजजवळ नगरसेवक भगवान पाटील यांनी श्रोते व कार्यकर्ते यांच्यासाठी नाश्‍त्यासह पाण्याची केलेली सोय.अशा अनेक…

Read More