साईमत, भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव सिव्हील सोसायटीतर्फे रन फॉर वरणगाव ही पाच कि.मी. व १० कि.मी. धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल ५८ धावपटू सहभागी झाले होते. त्यात ३५ महिला धावपटू होत्या. त्यात पाच कि.मी.च्या स्पर्धेत महिलांच्या गटात सुनिता संजय सिंग ह्या प्रथम ठरल्या. शिवाय १० कि.मी. महिलांच्या गटात रिना परदेशी प्रथम तर विनिता शुक्ला ह्या द्वितीय ठरल्या. त्याचबरोबर १० कि.मी. पुरुषांच्या गटात राजेंद्र ठाकूर प्रथम तर निलेश पाटील द्वितीय ठरले. पाचही धावपटू ज्यावेळी बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे जात होते, त्यावेळी उपस्थित इतर धावपटू एकच जल्लोष करीत होते. व्यासपीठावर भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि चाळीसगाव राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात स्वा.सै. कर्मवीर शिक्षण महर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंती महोत्सव वर्षानिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन माजी कामगार राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेडचे चेअरमन डॉ.विनायक चव्हाण होते. यावेळी माजी मंत्री एम.के. पाटील, खा.उन्मेष पाटील, माजी आ.राजीव देशमुख, संस्थेचे सचिव, प्राचार्य बाळासाहेब विश्वासराव चव्हाण, संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती पुष्पा भोसले, सहसचिव रावसाहेब साळुंखे, भैय्यासाहेब पाटील, प्रमोद पाटील, आर्कि. धनंजय चव्हाण, ॲड.साहेबराव पाटील, सुनील…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांना पत्र पाठवून स्वीकृती कळविली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक, म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी दिली. ९७ वे मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. तसेच संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पाडळसरे धरण मीच पूर्ण करणार आणि त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, अशी प्रत्यक्ष कामाची माहिती देऊन काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री अनिल पाटील यांनी दिली. ते म्हणाले, जे मी बोलतो, तेच करतो ते दाखविण्यासाठीच सर्वांना याठिकाणी बोलावलेले आहे. प्रत्यक्ष अमळनेर तालुक्याच्या जनतेने आणि सर्व पत्रकारांनी याठिकाणी यावे कामाची प्रगती पहावी. हाच माझा हेतू आहे. कुणाच्या भुलथापांवर विश्वास ठेवू नका, असे आव्हान मंत्री अनिल पाटील यांनी केले. धरण तर पूर्ण होईल पण धरणातून पाणी घ्यावे कसे याची चिंता मला नेहमी सतावत होती. म्हणूनच मी आधी पाणी धरणातून घ्यावे कसे त्याचीही तरतूद करून ठेवलेली आहे. त्यासाठी १५००…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील दाताळा ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवक सुधीर ढोले ग्रामसेवकाची बदली होऊन पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु तेथील ग्रामसेवक हे पदभार सोडण्यास तयार नाही. तसेच देवधाबा येथील ग्रामसेवक दीपक ठाकूर या ग्रामसेवकांच्या मनमानीला ग्रामस्थ त्रस्त झाली आहे. घरकुल आणि शौचालय बांधण्याचे पैसे द्याल तर काम होतील, अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवकांची बदली होत नाही, तोपर्यंत पंचायत समितीला टाळे लावून आंदोलनाचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपा नेते शिवचंद्र तायडे यांनी सोमवारी, ८ जानेवारीला पंचायत समिती कार्यालय तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकले. तालुक्यातील दाताळा आणि देवधाबा अशा दोन्ही गावांमध्ये शासनाच्या योजनांचा जसे घरकुल, शौचालय यासह आदी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी एचआयव्ही बाधित व देह विक्री करणाऱ्या महिलांना देण्यात येणाऱ्या सामाजिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. तसेच जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, डॉ.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील एकूण ६४ दुकानदारांकडे मालमत्ता थकबाकी करापोटी २८ लाख रुपये थकबाकी होती. त्यांना मनपा प्रशासनाकडून त्या कारणास्तव अधिपत्र बजावण्यात आले होते. परंतु मार्केट यार्ड भागातील ६४ दुकानदारांनी थकबाकी कराचा भरणा न केल्याने ८ जानेवारी २०२४ रोजी मनपा प्रशासनाने दुकाने सीलबंद करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती एस.एस.पाटील, प्रकाश सोनवणे या प्रभागाधिकारी वर्गाच्या अधिपत्याखाली प्रत्येकी १० कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे कार्यवाही करण्यासाठी देण्यात आलेला होता. त्यांचे पथकाने सोमवारी दिवसभर १२ दुकानदारांवर दुकाने सीलबंद करण्याची कार्यवाही केली. २४ दुकानदारांनी जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी भीतीपोटी तसेच ऑनलाईन आदी मार्गाने मालमत्ता थकबाकी करापोटीचा भरणा ९…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. केंद्रीय राजकारणात मोठे योगदान राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी रावेर लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान धर्तीवर रावेर लोकसभा मतदारसंघात सुशिक्षीत अन् राजकीय बाळकडू मिळालेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांचे ‘गाव तेथे संपर्क अभियान’ सुरू आहे. या अभियानाच्या माध्यमातून डॉ. केतकी पाटील यांच्या राजकीय वाटचालीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती रावेर लोकसभा मतदारसंघाची. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या २० वर्षापासून भाजपाच्या ताब्यात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी धुळे येथील चंद्राई बिग बिलिनियर मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार’ अमळनेर येथील रुक्मिणीताई कला, वाणिज्य महिला महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत विजयनाना पाटील आर्मी स्कुल आणि ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक अनिल नथू पाटील यांना रुक्मिणीताई कला, वाणिज्य महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एस.जे. शेख, अकॅडमीक परफॉर्मन्स इंडिकेटर एक्सपर्ट प्रा. डॉ. दीपक पाटील, प्रा. एस.पी.ढाके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत ‘द रोल ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी-२०२० इन इंडियन एज्युकेशन सिस्टीम’ याबद्दल शोधनिबंधाचे सादरीकरण व शैक्षणिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. यावेळी धुळे येथील रायबा…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. पत्रकार, पोलीस व प्रशासन यांच्यात ऋणानुबंध असतात. समाजातली प्रकाशी व अंधारी बाजू पत्रकाराला माहिती असते. त्यामुळे प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून सर्वसामान्य लोकांचे दुःख आपल्या लेखणीतून पत्रकार व्यक्त करत असतात. हे दुःख पोलीस, प्रशासन व न्यायव्यवस्थेकडे आल्यानंतर लोकांना न्याय मिळत असतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे दुःख आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा पत्रकार हा लोकशाहीतील एक प्रमुख व महत्त्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी केले. भुसावळ येथील शहर पत्रकार संस्थेतर्फे पंचायत समिती हॉलमध्ये ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नवरत्न सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुसावळ…