Author: Sharad Bhalerao

साईमत, रावेर : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील लवकरच रावेरला आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील ‘देवगिरी’ या अजित पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी, ९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजेला भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन श्रीराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रा.काँ.चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचीही भेट घेतली. याप्रसंगी श्रीराम पाटील यांच्यासोबत जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, डी. डी. बच्छाव, रावेरचे माजी नगराध्यक्ष शितल पाटील, प्रा.गोपाल दर्जी, मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नंदगाव येथील नवनिर्वाचित युवा ग्रामपंचायत सदस्याचा नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अनोखा संकल्प सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. येथील युवा सदस्य स्वप्निल सोनवणे यांनी वैयक्तिक खर्चातून गावातील महिला, माता भगिनींना प्रोत्साहन मिळावे, म्हणून राज्य सरकारच्या निर्णयाच्या धर्तीवर ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ आणि ‘माहेरची साडी’ अशा दोन आदर्शवत योजना सुरु केल्या आहेत. युवासेनेचे उपतालुका प्रमुख स्वप्नील सोनवणे हे नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी परिसरात सर्वश्रृत आहेत. आता आपले वडील तथा नंदगावचे माजी सरपंच शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्निल यांनी आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गावासह परिसरातून कौतुक होत आहे. आपल्या गावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरी जातांना…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव आहे. असे असूनही आज बरेच मुले -मुली अडचणींवर मात करत विविध क्षेत्रात उच्च पदांवर सेवेत आहेत तर अनेक जण उद्योग, व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आहेत. अशातच संवेदना फाउंडेशनतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील दहावी-बारावीतील गुणवंतांच्या सत्कारासह सेवाभावी संस्था आणि निराधार पाल्यांचा केलेला सत्कार हा सर्वांसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामनात स्पर्धा निर्माण होऊन त्यांना अधिक प्रगती साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून अधिक जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून अपेक्षित यश साध्य करावे आणि आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ऊस तोडणी दरात ३४ टक्के वाढ तर ठेकेदारांना कमिशन दरात एक टक्क्याने वाढ करण्यात येणार आहे. असा मोठा निर्णय शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या लवादाने नुकताच घेतला आहे. ह्या निर्णयामुळे ऊसतोड मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे येथे साखर संकुलनाची सभा नुकतीच पार पडली. त्यात शरद पवार आणि पंकजा मुंडे यांनी घेतलेला निर्णय बैठकीत साखर संघाचे पदाधिकारी पी.आर.पाटील, नॅशनल फेडरेशनचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या संयुक्त बैठकीत सर्व चर्चा झाली. त्याच बैठकीत आ.सुरेश धस, जयवंत पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवटे, ऊस तोड संघटनेचे सुखदेव सानप, प्रा. डॉ. डी एल. कराड, सुशीला मोराळे, श्री.रसाळ, विश्‍वजीत पाटील, कृष्णा तिडके,…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनुलोमचे मार्गदर्शक ना.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्व अनुलोमच्या वस्तीमित्रांना अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभुमीवर प्रभू श्रीराम यांच्या पंचधातूच्या मूर्तीचे वितरण करण्यात येत आहे. लोहारा येथील अनुलोमचे वस्तीमित्र तथा लोहारा शहर पत्रकार मंचे अध्यक्ष दीपक पवार यांनाही सोमवारी, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीराम मंदिर, लोहारा येथे अनुलोमचे भागसेवक ईश्‍वर चौधरी, डॉ.सुभाष घोंगडे, शरद सोनार, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, उपसरपंच दीपक खरे, ज्येष्ठ पत्रकार कृष्णराव शेळके, श्री स्वामी समर्थ केंद्राचे रामचंद्र काळे, माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे वितरण करण्यात आले. यानंतर प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची श्रीराम मंदिर…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेरला तालुका साहित्य-सांस्कृतीक मंडळातर्फे चौदावे खान्देश स्तरीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. त्यात पहुर येथील बालकवी, बाल साहित्यिक रूपाली कैलास माळी हिच्या ‘माय सावित्री’ कवितेला प्रथम क्रमांक तर ‘कहाणी एका संघर्षाची’ कथेसाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. याबद्दल तिला उपस्थित साहित्यिकांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर नाशिकचे अभिनेते गझलकार अजय बिरारी, धरणगावचे ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार बी.एन.चौधरी, जामनेर तालुका साहित्य-सांस्कृतीक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डी. डी.पाटील यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. रुपाली माळी हिने बालपणापासून कविता लिहिण्याचा छंद जोपासला आहे. तिने आतापर्यंत १२०० च्यावर स्वरचित कविता लिहिलेल्या आहे. तसेच रोज एक कविता लिहिण्याचा छंद जोपासत…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीसाठी एक ईव्हीएम व्हीव्हीपॅट मोबाईल व्हॅन उपलब्ध करुन दिली आहे. तिचे उद्घाटन चाळीसगाव भागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी निवडणूक नायब तहसीलदार डॉ.संदेश निकुंभ, वाघळीचे मंडळ अधिकारी प्रवीण महाजन, महसूल सहायक तुशांत अहिरे, टाकळी प्रचाचे तलाठी महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. त्यानंतर पातोंडा येथील मतदान केंद्रांवर मतदार जनजागृतीसाठी मंडळ अधिकारी यांच्या पथकासोबत व्हॅन पाठविण्यात आली. तसेच ही व्हॅन आणि आणखी एक अतिरिक्त गाडी याद्वारे संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात मतदार जनजागृती येत्या २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर यांच्या हस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एनसीसीच्या ९० कॅडेट यांनी पर्यवेक्षक एस.एस.पाटील, आर.पी.पाटील, जे. आर. बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्या गजानन पाटील ह्या विद्यार्थिनीच्या हस्ते ज्योत संचलन करून झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचाही संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यात माजी उपमुख्याध्यापक एस. जी. डोंगरे, केके विभागाच्या माजी शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, मुख्य लिपिक मिलिंद गुजराथी, सेवानिवृत्त सेवक सुरेश चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एस. एस. कुलकर्णी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्यावतीने…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कुल विद्यालयात मुख्याध्यापक संघाची नुकतीच सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष तथा हिवरखेडा हायस्कुलचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील होते. सभेला मुक्ताईनगर सुकळी हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा निवडणूक निरीक्षक पी.पी.दाणे, श्री.काटे उपस्थित होते. यावेळी शेंदुर्णी येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक तथा जामनेर तालुका उच्च माध्यमिक तालुका समन्वयक प्रमोद खलसे यांची जामनेर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेला आर.ए.पाटील नेरी, व्ही.एस.पाटील सामरोद, ए.ए.पाटील कापूसवाडी, गोपाल गुरुभाई वाघारी, गणेश पाटील टाकळी, आर.जे.सोनवणे, जामनेर, किशोर ढेकाळे नांद्रा, एस.आर.चौधरी वाकोद, श्री.निकम पळासखेडा मिराचे, श्री.बोरसे शहापूर, मनोहर पाटील तोरणाळे यांच्यासह तालुक्याभरातील मुख्याध्यापक उपस्थित होते.…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व भारतवासी आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अर्थातच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. श्रीराम मंदिर उभारणीचा येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ ला मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात श्रीराम लल्ला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. अशा सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यासाठी सर्व समाजसेवी संघटना, सामाजिक संघटना, श्रीराम भक्तांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सार्वजनिक चर्चासत्राचे सोमवारी, ८ जानेवारी २०२४ रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. ते पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी २२ जानेवारी हा भाग्याचा सुवर्णक्षण आहे.…

Read More