Author: Sharad Bhalerao

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथील पहुर गु्रप एज्युकेशन सोसायटी संचलित आर.टी.लेले हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा नुकताच गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोज जोशी होते. यावेळी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी पहुर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण कुमावत, उपाध्यक्ष शरद बेलपत्रे, गणेश पांढरे, शांताराम लाठे, रवींद्र घोलप, सादीक शेख, रवींद्र लाठे, शंकर भामेरे, जयंत जोशी, किरण जाधव, हरीभाऊ राऊत यांच्यासह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा विद्यालयाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, मनोज जोशी, शंकर भामेरे, रवींद्र घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन आर.टी. देशमुख तर आभार एस.आर.सोनवणे यांनी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे भागीरथीबाई पूर्णपात्रे कला, सीताबाई मांगीलाल अग्रवाल विज्ञान, कस्तुरबाई खंडू चौधरी वाणिज्य महाविद्यालय, केशव रामभाऊ कोतकर कनिष्ठ महाविद्यालय, चाळीसगावतर्फे आयोजित श्रीमती सीताबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट, श्रीमती शकुंतलाबाई अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. पूर्णपात्रे चॅरिटेबल ट्रस्ट, चाळीसगाव यांच्या सहकार्याने होत असलेल्या ३८ व्या कै. गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्व, श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृती करंडक वादविवाद आणि नारायण अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त वक्तृत्व राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी, १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर (निशाणी डावा अंगठा कार) यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून गौण खनिजाची अवैधरित्या होणारी चोरटी वाळू वाहतूक करणारे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिलदारांना नुकतेच देण्यात आले. तलाठी मंडळ अधिकारी वाळू माफिया यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर चाळीसगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे, वडगाव लांबे, जामदा, शिवारातील, गिरणा नदी पात्रातील वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुरू आहे. ह्या भागात वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर, टिपर, ट्रॅक्टर आदी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील शिवाजी नगरात स्व.पद्मश्री ना. धो. महानोर साहित्य नगरी एकलव्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे नुकतेच चौदावे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष म्हणून नाशिक येथील मराठी अहिराणी, कवी, गझलकार, गीतकार, लेखक, अभिनेता अजय बिरारी होते. स्वागताध्यक्ष म्हणून जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा साधना महाजन उपस्थित होत्या. उद्घाटक म्हणून ह.भ. प. ज्ञानेश्‍वर महाराज जळकेकर, तर समारोपीय सत्राचे अध्यक्ष बी.एन.चौधरी (सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा साहित्यिक, धरणगाव) होते. यावेळी कवयित्री सीमाराणी बागुल, डॉ. स्वाती विसपुते, ह.भ.प. रामकृष्ण दादा पाटील, उत्कृष्ट कथाकार राहुल निकम आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद नागरिक सहकारी पतसंस्थेच्यावतीने रौप्य महोत्सवानिमित्त १२, १३, १४ जानेवारी २०२४ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्थेच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वामी विवेकानंद व माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जिल्हा निबंधक विजयसिह गवळी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून धरणगावचे सहायक निबंधक विशाल ठाकूर उपस्थित राहतील. धरणगाव तालुक्यातील सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक व नागरिक यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटक…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ई.पी.एस.-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती आणि राष्ट्रीय सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्यांसाठी समिती प्रमुख ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ कामगार नेते (समिती कार्याध्यक्ष) जे. एन. बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी तहसील कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन केले आहे. सेवानिवृत्त कामगारांना दरमहा किमान ७ हजार ५०० रुपये पेन्शन व महागाई भत्त्यासह लागू करा, वृध्द पती-पत्नीस मोफत वैद्यकीय सुविधा द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन द्या व त्यासाठी भरावी लागणारी रक्कम मिळणाऱ्या पेन्शन वाढीच्या एरीयर्समधून समायोजन करण्यात यावी, वंचित झालेल्या सर्वांना किमान ५ हजार रुपये पेन्शन…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी देशात व देशाबाहेरही आपल्या मधुर रसाळ वाणीतून शिवपुराण कथेच्या माध्यमातून तमाम भाविकांना अध्यात्माची विलक्षण आनंद देणारे आंतरराष्ट्रीय कथाकार प.पू. पं.प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण महाकथेचा कार्यक्रम चाळीसगाव येथील मालेगाव रोड स्थित सुमारे ४० एकर परिसरात येत्या १६ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत आयोजित केल्याची माहिती खा.उन्मेश पाटील यांनी दिली. कथेच्या कार्यक्रमस्थळी खा.उन्मेश पाटील विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्त्यांसह पाहणी केली. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाविकांची उपस्थिती महाशिवपुराण कथेला लाभणार आहे. खा.उन्मेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह विविध अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पाहणी करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाययोजनांची चर्चा केली. खा.उन्मेश पाटील म्हणाले की,…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येत आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपरिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्‍न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’ सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर संमेलनाशी संबंधित प्रश्‍नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय संमेलनाच्या प्रसिध्दीसाठी रिल्स, व्हिडीओ व सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापरण्यात येत आहे. ९७ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे होत आहे. संमेलनाचे…

Read More

साईमत, यावल/फैजपूर : प्रतिनिधी येथील पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत दोन आयशर भरून सुमारे ८३ लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य म्होरक्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, फैजपूर परिसरात ठिकठिकाणी विकल्या जाणाऱ्या स्थानिक गुटखा तस्करांच्याही मुस्क्या पोलिसांनी आवळाव्या, अशी नागरिकांकडून मागणी पुढे येत आहे. सविस्तर असे की, फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना बऱ्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह बुधवारी, १० रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला. आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ आयशर (क्रमांक एम. एच. १९ सी.वाय.९३६४ आणि एम.एच.१९…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील भारत सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या जन औषधी मेडीकल स्टोअर्सचे विजय पाटील (सदस्य फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.मोंटूकुमार पटेल यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी तथा वर्धा येथील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भूषणकुमार सुरेश साठे यांची नुकतीच राज्य समन्वयकपदी निवड केली आहे. केंद्र सरकारच्या योजनेत त्यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. फार्मसी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सामावून घेऊन उत्तम रोजगार व सेवेची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामार्फत गरजु रुग्णांना अल्पदरात औषध उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read More