Author: Sharad Bhalerao

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी नेपाळ येथील बॅकोट स्टेडीयम, काठमांडू येथे फर्स्ट साउथ एशियन थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात सात देशांमधील सुमारे २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत भारताने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय संघातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील तरोडा येथील रहिवासी आणि सद्यस्थितीत ठाणे येथील विद्यालयातील विद्यार्थिनी संजना गजानन हिवरकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळविले आहे. स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील खेळाडूंनी १५ सुवर्णपदक, १ रौप्यपदक तर १ कांस्यपदक पटकावले. नेपाळच्या संघाने स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. विजयी खेळाडूंची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली आहे. स्पर्धेतील सुवर्णपदकाची मानकरी संजना गजानन हिवरकर ही सेंट लॉरेन्स हायस्कुल, ठाणेची विद्यार्थिनी…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी गुरुगोविंदसिंग यांच्या जयंतीनिमित्त संगतवाडी गुरुद्वारा प्रबंधनच्या माध्यमातून ११ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात गुरूआरती, महाप्रसाद, लंगर भोजन कारसेवा यासोबतच शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुरुगोविंदसिंग यांचा धर्माभिमान, त्याग, सेवाभाव आणि पराक्रमी इतिहासाची अधिक माहिती मिळविण्याची जिद्द निर्माण व्हावी, याकरीता निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील विविध माध्यमांच्या १३ शाळांमधून स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संगतवाडी गुरुद्वारा येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी गुरुगोविंद सिंग यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी उत्स्फूर्त भाषणे व अभ्यासपूर्ण निबंध लेखन सादर केले. दुपारच्या सत्रात झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्षस्थानी कारसेवक बाबा रवींद्रसिंह होते. प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे, केंद्राचे आयात निर्यात धोरण तातडीने रद्द करावे, हिट अँड रन कायदा रद्द केला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस पडून आहे. शेतकऱ्यांचे देणं घेणं थांबून गेले आहे. अशीच गंभीर परिस्थिती असेल तर आत्महत्या कशा थांबतील. आधी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्त्वाचे प्रश्‍न घेऊन शासनाच्या विरोधात शुक्रवारी १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी, नीलकंठ पवार अध्यक्ष कृषी संघटना, गुलाबराव प्रताप, सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी, प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड, जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सोलर प्रकल्प पीडित शेतकरी महिला अंबीबाई गणेश राठोड यांच्या संशयास्पद खून प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी लेखी पत्र देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यास लिंबू शरबत पाजून आमरण उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी गुन्ह्याचे तपास अधिकारी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, शेतकरी बचाव कृती समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ माऊली, बंजारा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र डी.नायक, शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष वकील भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव, शिवसैनिक अवी इंदल चव्हाण, नागरे बंधू, प्रवीण जाधव, प्रदीप राठोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.…

Read More

साईमत, लोहारा, ता.जामनेर : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारा संचलित डॉ.जे.जे.पंडित माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजामाता आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.एन.दांडगे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांच्या हस्ते जिजाऊ माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगतपर भाषण सादर केली. तसेच कल्याणी मनोज सरोदे हिने राष्ट्रमाता जिजाऊ माता यांची वेशभूषा धारण केली होती. आपल्या कणखर आवाजाने ‘मी जिजाऊ बोलतेय’ विषयावर भाषण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.एन.दांडगे यांनी भाषणातून जिजाऊ माता यांनी छत्रपती…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे गेल्या ४ मे २०२३ रोजी लाडकारंजा, जि. वाशिम येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव डॉ.हनुमंत लुगे यांनी नुकताच जाहीर केला. राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख गिरीश चंद्रराव पाटील ‘अ’ श्रेणी, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार ‘ब’ श्रेणी तर शालेय राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू तथा माजी विद्यार्थी सुष्मित गिरीश पाटील ‘क’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रा.आशिषकुमार चौधरी (वरणगाव), राहुल साळुंखे (चाळीसगाव), सचिन सूर्यवंशी (धरणगाव), योगेश सोनवणे,…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी शहरातील तहसील कार्यालयासमोर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेला मुलींसह मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत ४० मुली आणि १४० मुले अशा एकूण १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोदवडचे नगराध्यक्ष आनंद पाटील, व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, नगरसेवक राजेश नानवाणी यांच्या हस्ते हिरवी झेंंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला आ.चंद्रकांत पाटील यांच्या सुविद्य पत्नी यामिनी पाटील, कन्या संजना पाटील, मुलगा हर्षराज पाटील, उद्योजक अनुप हजारी, अनिल गंगतीरे, निलेश माळी, हर्षल बडगुजर, संजय पाटील, निवृत्ती ढोले, शांताराम कोळी, अनंता वाघ, कलीम शेख, अजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शासनाने बेकायदेशीर लादलेली दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयाचा दंडाचा नियम चालकांसाठी लागु केलेला आहे. हा नियम सर्व चालकांना मान्य नाही. त्या अनुषंगाने सर्व चालक (टेम्पो चालक, टॅक्सी, रिक्षा, क्रुझर, ट्रक, खासगी, टँकर, डम्पर चालक) हा नियम शासन जोपर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत सर्व चालक स्टेरिंग छोडो आंदोलन करणार आहेत. त्यामुळे निवेदनाचा विचार करुन ‘हिट ॲण्ड रन’ कायदा मागे घेण्यात येऊन कष्टकरी चालकांना न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना दिले आहे. हे निवेदन त्यांच्यावतीने नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना दिले. यावेळी संघटनेचे छोटू पहेलवान, मुकेश चौधरी, नाना चौधरी, अल्ताफ खान यांच्यासह सर्व चालक मालक, चालक…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी शिक्षण मंडळ, संस्थेच्यावतीने शुक्रवारी, १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजता क्रीडा सप्ताहानिमित्त भव्य युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन चोपडा येथील चोपडा शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेमध्ये संस्थेच्या विविध शाखांमधील सर्व मुले व मुली विद्यार्थी तसेच पुरुष व महिला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धा महाविद्यालयाच्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयाच्या नुकत्याच झालेल्या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीने खरी कमाईचा अनुभव घेतला. स्काऊटच्या कब – बुलबुल विभागाचा उपक्रम उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील आणि शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश स्वार, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप अहिरराव, संचालक मु.रा. अमृतकार, एच. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बागड, सराफ इंग्लिश मीडियम स्कुलचे अध्यक्ष नीलेश छोरिया, क्रीडा समितीचे अध्यक्ष योगेश करनकाळ, शिक्षक प्रतिनिधी उपप्राचार्य डॉ. अजय…

Read More