Author: Sharad Bhalerao

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी संविधान आणि कायद्याचे अभ्यासक भाष्यकार ॲड.असिम सरोदे, सामाजिक व पर्यावरणवादी कार्यकर्ते डॉ.विश्‍वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली रविवारी, २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता भडगाव रस्त्यालगतच्या महालपुरे मंगल कार्यालयात लोकशाही….संविधानाचा सन्मान, सुरक्षा, संवर्धन, अंमलबजावणी करीता भारतीय जनमनाकरीता ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन केले आहे. सभेला सहकुटुंब परिवार, मित्र मंडळी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यवसायिक, वैद्यकीय सेवा, न्यायिक क्षेत्रातील, पत्रकार यांच्यासह जो अस्वस्थ आहे, चिंतीत आहे अशा प्रत्येक भारतीय नागरिकाने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रागतिक नागरी समिती, क्षत्रिय ग्रुप, महापुरुष सन्मान समिती, समविचारी व मित्र मंडळातर्फे केले आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे येथे अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून तीर्थक्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर आणि तिन्ही गावांच्या परिसरात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेतून मंदिर आणि आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. त्यामुळे स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे. तसेच परिसर स्वच्छ केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गुरुदेव दत्त मंदिर, श्री चमत्कारी शनी मंदिर, महादेव मंदिराच्या परिसरात तसेच मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कै.सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळेचे मुख्याध्यापक अशोक देसले, सर्व शिक्षक, कर्मचारी, गावातील…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील ‘मॉर्निंग वॉक’ ग्रुपच्यावतीने विविध ठिकाणी निवड आणि पुरस्कार प्राप्त गुणवंत सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच सारोळा शिवारातील भोला आप्पा चौधरी यांच्या फार्म हाऊसच्या प्रांगणात पार पडला. अध्यक्षस्थानी योगशिक्षक सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अशोक पाटील होते. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळू पाटील, ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सतीश चौधरी, बापू बडगुजर, प्रा.सी.एन.चौधरी, प्रा.डी.पी.वाणी, सहाय्यक फौजदार भगवान बडगुजर, शशिकांत पाटील, विजय पाटील, माजी सैनिक किशोर पाटील, मंडळ अधिकारी विजय येवले, पीपल्स बँकेचे निवृत्त कॅशियर आर.आर.वाणी, अशोक पाटील, ग.स.सोसायटीचे निवृत्त अधिकारी चंद्रकांत शेलार, प्राचार्य संजय पाटील, सेवानिवृत्त तलाठी गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी पीटीसी संस्थेचे संचालक व…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा-भडगाव मतदारसंघात परिवर्तनाचा नारा बुलंद करत सर्वसामान्यांशी संवाद साधणाऱ्या शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचे येथे स्वागत करण्यात आले. एकाच दिवशी येथे १२ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. त्या माध्यमातून तरूणाईची मोठी फळी त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याची स्थिती आहे. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महा संपर्क अभियान सुरू केले आहे. त्याला समाजाच्या सर्व स्तरांमधून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे त्यांचा दौरा पार पडला. त्यात त्यांनी १२ शाखांचे उद्घाटन करतांनाच ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येक शाखेच्या ठिकाणी ढोल-ताशांचा गजर आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मनुष्याचे विचार आणि व्यवहार चांगले असतील तर त्याला ध्येय प्राप्तीपासून कोणी रोखू शकत नाही. तसेच सनातन धर्माच्या बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवसाच्या वाणीतून खा. उन्मेष पाटील, संपदा पाटील आयोजित शिवपुराण कथेचे श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेल्या लाखो शिवभक्तांसमोर बोलतांना सांगितले. मानवाने जमा केलेल्या संपत्तीचा वापर धर्म कार्यासाठी केला तर त्या मनुष्याचे धन आणि धर्म दोघांची वाढ होते. त्यामुळे मानवाने धर्म कार्यासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. खा.उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून दोन लाख दिव्यांनी रंगवित प्रभू श्रीरामाचे चित्र आणि अयोध्या मंदिराचे चित्र साकारण्यात आले आहे. त्याचे कौतुकही…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी ‘खान्देशातील काव्यनिर्मितीत कुसुमताई चौधरी यांचे योगदान’ विषयावर कवयित्री संध्या भोळे यांनी कुसुमताई यांच्या कविता खान्देशातील समाज संस्कृती दर्शन घडवितात. यावेळी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. ‘कमलगंध’ व ‘मधुगंध’ कुसुमताई यांच्या काव्य संग्रहाचा आढावा घेतला. तसेच संध्या भोळे यांनी आपल्या ‘जावे गुंफित अक्षरे’ यातील ‘माही भाषा माही माय’ या स्वरचित काव्यगित सादर केले. डॉ.अरविंद चौधरी लिखित ‘काय गतका फुटला…!’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे व प्राचार्य डॉ. अरूणा चौधरी, विभाग प्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुणा चौधरी होत्या. त्यांनी कुसुमताई यांचे व्यक्तित्व आणि साहित्य त्यातील त्यांच्या…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी अयोध्या येथे प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात सामाजिक, सांस्कृतिक व सर्व हिंदूचे आस्थेचे प्रतिक प्रभु श्रीराम यांच्या उत्सव सोहळ्यात कुठलेही अपकार्य व अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भुसावळ शहरातील सर्व मास विक्री व मद्य (दारु) विक्री करणारे दुकाने येत्या २२ जानेवारी २०२४ ला बंद ठेवण्यात यावे, याबाबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गौरव आवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजयुमोचे सरचिटणीस लाजरस मणी, अर्थव पांडे, यशांक पाटील, भाजयुमोचे उपाध्यक्ष चेतन सावकारे,…

Read More

साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील न.ह.रांका माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक स्नेहमेळाव्यातून बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन संचलित प्रमिलाताई व मोहनराव फाउंडेशनच्या निवासी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रास ४० हजार रूपयांची भेट दिली. गेल्या वर्षीही माजी विद्यार्थ्यांच्या गटाने बोदवड येथील जि. प. शाळेसाठी निधी भेट दिला होता. गेल्या काही वर्षांपासून शालेय मित्रांचा दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. यावेळी त्यांनी एकत्र येऊन एखादा सामाजिक उपक्रम हे सर्व मित्रपरिवार राबवितात. यावर्षी मनोरुग्ण सहाय्यता केंद्रास आर्थिक निधी व एक दिवस जेवण देऊन या सर्वांनी संक्रांत गोड केली. त्या दिवशी मनोरुग्ण केंद्रात शरद काळे आणि अविनाश मोते यांनी जेवण दिले. हा उपक्रम पार पाडण्यासाठी शरद…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील ओम कॉलनी परिसरातील दोन वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना मोकाट असणाऱ्या कुत्र्यांनी तिला चावा घेतला. त्यामुळे तिला जळगाव येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अशा घटना शहरात जवळजवळ सहा महिन्यात सहा ते सात वेळा घडल्या आहेत. पालिकेला वेळोवेळी सूचना देऊनही मोकाट कुत्र्यांसह डुकरांना पकडण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर न घातल्यास पालिकेवर सावदा परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सावदा शहरात मोकाट डुकरांसह कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. संपूर्ण गावात डुकरे फिरून जनतेचे आर्थिक नुकसान करीत आहे. तसेच मोकाट कुत्रेही बालकांना व नागरिकांना चावा घेत आहे. सावदा शहरात ओम…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील महावितरण विभागातील भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराच्या परिसरातील नागरिकांकडून वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता जरी बदललेले असले तरी महावितरणचा भोंगळ कारभार थांबण्याचे नाव घेत नाही. त्याचेच भयावह उदाहरण म्हणजे मुक्ताईनगर महावितरणच्या विभागीय कार्यालय शेजारी उभ्या असलेल्या ट्रान्सफार्मरवरील डिस्ट्रीब्यूशन बॉक्स काही महिन्यांपासून उघडा पडलेला आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही महावितरण विभाग बॉक्सला पेटी बंद करण्यासाठी इच्छुक नाही. विशेष खेदाची बाब म्हणजे कार्यकारी अभियंत्यांसह विभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या चकाचक वाहने याच ट्रान्सफार्मरच्या रस्त्यावर पार्क केली जातात.त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा जीवघेणा कारभार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्याच्यावर तक्रारीनंतरही कोणतीही कार्यवाही करायला तयार नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये…

Read More