साईमत, फैजपूर : प्रतिनिधी श्री तीर्थक्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर येथील प्रसिद्ध खंडेराववाडी देवस्थान याठिकाणी सव्वा लाख दिवे प्रज्वलित करण्याची तयारी पूर्णत्वास आली असल्याचे खंडेराव वाडीचे उत्तराधिकारी पवन कुमारदासजी महाराज यांनी सांगितले. खंडेराववाडी देवस्थानमधील यात्रास्थळी भव्य पटांगणावर एक लाख २५ हजार दिव्यांची व्यवस्था केली आहे. या दिव्यांची मांडणी सुटसुटीत आणि प्रज्वलित करताना सर्वांना सोयीचे होईल या उद्देशाने केली आहे. सव्वा लाख दीप तथा जय श्रीराम ही भव्य अक्षरे दिव्यांनी प्रज्वलित होतील. त्याचप्रमाणे तब्बल ३५० चौकोनामध्ये ३५० दिव्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी फैजपूर परिसरातील असंख्य दानशूर श्रीराम भक्तांनी योगदान दिले आहे. ‘न भूतो न…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून शेती आणि शेतकरी यांच्यासाठी मी काम करत आलो आहे. पण गेल्या काही वर्षापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न, भाववाढीचे प्रश्न सुटत नाही, वेळोवेळी आंदोलन करूनही प्रशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेत नसल्याचे दुःख आहे. त्यामुळे मी माझे उर्वरित आयुष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करणार असल्याचा निर्णय माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात गुलाबराव देवकर यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे व नांगराचे पूजन करून करण्यात आली. शेतकऱ्यांचा राजा हा बळीराजा असून कृषी परंपरेचे प्रतीक म्हणजे नांगर आहे, हे नांगर कष्टाचं, शेती फुलविण्याचे प्रतीक आहे. नांगराची पूजा करून गुलाबराव देवकर यांनी…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदे येथील घनश्याम काशीराम विद्यालयात २०२२-२३ वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) प्राचार्य डॉ. अनिल झोपे होते. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ठेवीदारांनी ठेवलेल्या ४ लाख ३९ हजार ४४८ रकमेवरील रुपये २८ हजार ३५२ चे वार्षिक पारितोषिक समारंभात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. संगीता महाजन होत्या. अनुभव ही खूप मोठी शिदोरी असते. यश प्राप्तीसाठी अथक परिश्रमाची गरज आहे. जीवनात भावनिक बुद्धिमत्ता व चांगुलपणा गुणांचा विकास केला तर यश अधिकच सुंदर दिसेल, अशी अपेक्षा डॉ. अनिल झोपे यांनी व्यक्त…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत शुभम अनिल आगोणे याची गेल्या १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजेच्या दरम्यान पाटणादेवी रोड बामोशी बाबा दर्गा समोर क्रिकेटच्या कारणावरून चाळीसगाव येथील सराईत गुन्हेगारांनी तीक्ष्ण तलवारी व चॉपरच्या साह्याने हत्या केली होती. पोलीस कर्मचाऱ्यांवर गावगुंडाकडून असा हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे दाद मागावी तरी कुणाकडे? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. भर दिवसा तलवारी काढून एका पोलिसावर हल्ला करण्याची हिम्मत सराईत गुन्हेगार करतात. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था पणाला लागल्याचे चित्र सर्व सामान्यांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांना वेळीच पायबंद न घातल्यास दिवसाढवळ्या सामान्य जनतेचे हाल होतील. त्यामुळे शुभम आगोणेची…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असणाऱ्या हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स शरीफला येत्या शुक्रवारी, २६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. दर्गा समोरील डोंगरी नदी पात्रात खूप झाडेझूडपे वाढली आहे. नदीत पाणी कमी असले तरी त्यात गटारीचे घाण पाणी साचून झाडी गवतामुळे डासांचा उपद्रव वाढलेला आहे. त्यामुळे दर्गा परिसर विविध समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे. त्यामुळे उर्सपूर्वी नगरपरिषदेने स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत आहे. बामोशी बाबा दर्गा मेन पायरीपासून शिरणीचे दुकाने यांना कायमस्वरूपी नदीत असलेला नाला पलीकडे दुकाने लावली गेली पाहिजे. दर्गाला लागून असलेली दुकाने चहा टपऱ्यावर सुरु असलेले अवैध धंदे बंद केले पाहिजे. जेणेकरून…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनानिमित्त सोमवारी, २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम् आदी कार्यक्रम प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात दररोज दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान होतील. येत्या २९ रोजी आर्या शेंदुर्णीकर कथ्थक नृत्य, तेजल जगताप एकल तबला वादन तर सुनील वाघ व त्यांचे सहकारी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर करतील. मंगळवारी, ३० रोजी नयना कुलकर्णी आणि समूह ‘आमची माती आमची संस्कृती’, अमळनेर महिला मंच…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील अल्पसंख्यांक विकास मंडळाची चाळीसगाव तालुक्याची कार्यकारिणी राज्याचे प्रदेशाध्यक्ष शोएब खाटीक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष मुराद पटेल यांनी नुकतीच जाहीर केली. लवकरच शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे मुराद पटेल यांनी सांगितले. कार्यकारिणीत तालुका सचिवपदी अजिज खाटीक, तालुका कार्याध्यक्ष अलिम शेख, तालुका उपाध्यक्ष गफ्फार मलिक, उपाध्यक्ष अनिस शेख, पिंपरखेड, उपाध्यक्ष मुन्तजिम शेख, तालुका संघटक सलिम सैय्यद, कोषाध्यक्ष अल्ताफ खाटीक, खडकी, सहसचिव जावेद मुल्ला, वाघळी, सहसंघटक जावेद शेख, जामदा यांचा समावेश आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जीवन जगताना बालपण, तरूणपण, म्हातारपण आनंदाने आणि समाधानाने जगा. गोरगरीब, गरजवंतांना मदत करा, एखादा मुलगा हुशार आहे मात्र त्याच्याकडे शिक्षणासाठी पैसे नाही अश्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करा, असे पंडित प्रदीप मिश्रा यांनी खा.उन्मेष पाटील आणि संपदा पाटील आयोजित शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी सांगितले. यावेळी राज्याचे कॅबीनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांनी कथास्थळी भेट देऊन प्रदीप मिश्रा यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी खा.उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण उपस्थित होते. माणसाला मिळालेले आयुष्य हे फार सुंदर आहे. ते आयुष्य जगण्याची कला आपल्या अंगी असली पाहिजे. परमेश्वराने आपल्याला मानव जन्म दिला. या मानव जन्माला व्यर्थ घालवू नका. आयुष्यभरात जी कमाई कराल, त्या…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भव्य नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन ‘नमो चषक’-२०२४ अंतर्गत केले होते. स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यातील जवळपास ७० हुन अधिक संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या महाअंतिम सामन्याचे नाणेफेक प्रसंगी आ.संजय सावकारे, आ.किशोर पाटील, नाशिक पश्चिमच्या आ.सीमा हिरे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, उद्योजक मनोज बियाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी काही दिवसांपूर्वीच निधन झालेले क्रिकेटपटू स्व.शुभम आगोणे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सात दिवस रात्र चाललेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यांमध्ये चाळीसगाव पोलिसांच्या ‘रक्षक ११’ विरुद्ध नवतरुण युवा मित्रांची ‘शक्ती ११’ अश्या दोन संघांचा सामना झाला. त्यात अनुभवी असणाऱ्या ‘रक्षक ११’ ने चमकदार कामगिरी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भारत सरकारमार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या युजीसीच्या परीक्षेसाठी भारतातून १ हजार ६८९ विद्यार्थी बसले होते. त्यात अमळनेर तालुक्यातील बहादरवाडी येथील रहिवासी रोहित संतोष पाटील हा यूजीसी नेट, जेआरफच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने हे यश अभ्यासाच्या जोरावर मिळवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. तो निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष, पत्रकार तथा शेतकरी संतोष बाबुराव पाटील यांचा चिरंजीव आहे. तसेच अमळनेर येथील, सक्सेस अकॅडमीचे संचालक पवन संतोष पाटील यांचा लहान बंधू आहे. रोहित हा सध्या लखनऊ, उत्तर प्रदेश येथे डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी, लखनऊ येथे एम.फार्म, ॲनालिसिस विषयात कार्यान्वित आहे. त्याला डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर, युनिव्हर्सिटी,…