साईमत, पाचोरा : प्रतिनिधी ‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी, २१ जानेवारी रोजी हजारो नागरिक महालपुरे मंगल कार्यालय येथे ‘निर्भय बनो आंदोलन’ बॅनर खाली एकत्र जमले होते. त्यात अनेक मान्यवर, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. हजारो नागरिकांनी लोकशाही, संविधानाच्या रक्षणासाठी शपथ घेतली. देशातील दमणकारी मोदी सरकारविरोधात ‘निर्भय बनो’ आंदोलनाची सुरुवात केल्याचे पत्रकार गणेश शिंदे यांनी भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकारची हमी अश्या हुकूमशाही पदतीने जाहिरात दाखविणाऱ्या वाहनाला विरोध केला होता. त्यांनी घेतलेल्या आक्षेपावर अनेक बहुजन, व्यापारी, अधिकारी, विविध राजकीय नेते यांनी दखल घेतली. ‘निर्भय बनो’ यासाठी प्रागतिक नागरी समिती, क्षत्रिय ग्रुप, महापुरुष सन्मान समिती, पाचोरा समविचारी व मित्र मंडळ यांनी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी आजचे युवक हेच देशाचे वर्तमान व भविष्य आहेत. युवकांमध्ये संघ भावना व खिलाडीवृत्ती वाढीस लागावी, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने राज्यभरात ‘नमो चषक २०२४’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशातच मलकापूर येथे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन चैनसुख संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यश संचेती यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर पाटील, उमा तायडे, सारिका डागा, संजय काजळे, मिलिंद डवले, रामभाऊ झांबरे, सुभाष पाटील, डॉ.योगेश पाटणी, सुनील अग्रवाल, संतोष…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरातील राजस्थानी विप्र संघटनेतर्फे १८ ते २२ जानेवारी २०२४ पर्यंत पंचरंगी कार्यक्रम घेण्यात येत आहे. अशातच भुसावळ मध्यवर्ती भागातील सराफ बाजार, भजीया गल्ली, जाम मोहल्ला परिसरात गोसेवक रोहित महाले आणि त्यांचे सहकारी यांचे श्रीरामलला स्थापना निर्मित अनेकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी बबीता विनोद शर्मा होत्या. गोसेवक गाईला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवितात. त्यांची कत्तल थांबविण्यासाठी अथक प्रयत्न करतात. देशभक्तीची जाण ठेवतात. गोमाता म्हणजे भारताची अस्मिता वाचविण्याचे कार्य श्री.महाले करतात. तसेच त्यांचे सहकारी मित्र भुसावळ परिसरातील अनाथ, गोरगरीब, आजारी, जखमी व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करून तेथील डॉक्टरांच्या भेटी घेऊन त्यांना योग्य ते औषधोपचार मिळवून देतात. म्हणून श्री. महाले…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथे महसूल प्रशासनास कुंड खुर्द ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी मलकापुरचे तहसीलदार यांना सादर केलेल्या संयुक्त अहवालात कुंड खुर्द शिवारातील शासकीय ई क्लास गट नंबर ३७ चे जमीनीमधील अंदाजे तीन हजार ब्रास गौण खनिज उत्खनन करून गट नंबर ३८ चे नजीम खान गौसखान यांच्या शेतात वापरून सपाटीकरण केले असल्याची बाब समोर आली आहे. मलकापुरचे उपविभागीय अधिकारी यांना कुंड खुर्द शिवारातील शासकीय ई क्लास जमिनीवरील माती व मुरमाचे टेकडीचे खोदकाम करून शेजारील शेतमालकाने स्वतःच्या शेतात असलेल्या नाल्यांमध्ये भरणा करण्यासाठी वापर करुन शासकीय ई क्लास जमीनीवर बेकायदेशीर ताबा केला असल्याचे निवेदनाद्वारे निदर्शनास आणून…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी हिंदू धर्माचे पूजनीय श्रीराम म्हणजे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. त्यांनी रावणाचा वध करण्यासाठी पृथ्वीवर श्रीराम यांच्या रूपाने जन्म घेतला. सोमवारी, २२ तारखेला अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यामुळे पूर्ण देशात दिवाळीसारखा सण अथवा सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एस. बी. चौधरी हायस्कुल, चांगदेव शाळेतील कलाशिक्षक राजू साळी (फैजपूर) यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तववादी ‘श्रीराम’ शब्दाची अक्षररुपी ५५ बाय ३० या आकारात पोस्टर कलरच्या माध्यमातून पेंटिंग तयार केली आहे. पेंटिंगमध्ये ‘श्रीराम’ हे नाव विटेवर उभे केलेले आहे. श्रीराम नावामध्येच रामाचे मुख व संकटकाळी रामास मदत करणारे हनुमंत यांचे मुख…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी श्री तीर्थक्षेत्र अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त फैजपूर नगरी भगवामय होऊन सजली आहे. शहरात ठिकठिकाणी श्रीराम प्रभुच्या बॅनर, ध्वज, पताका आदींनी सुशोभीकरण करून भरभरून उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील राम मंदिरात प्रतिमेचे पूजन भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्त माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांच्याकडून राम मंदिरामध्ये एक हजार झेंड्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खंडोबा वाडी येथे सव्वा लाख दिवे प्रज्ज्वलित करण्यासाठी व्यवस्था केली आहे. मोटर सायकल रॅलीप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, भाजपाचे शहराध्यक्ष अनंता नेहेते, महिला तालुकाध्यक्ष जयश्री चौधरी, अनुराधा ताई, वसंत…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील मोहनराव नारायणा नेत्रालय, नांदुरा-शाखा मलकापूर तसेच व्हिजन सेंटर आणि ओम शांती ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २१ रोजी सरकारी दवाखान्याजवळ, मानस हॉस्पिटलसमोर ओम शांती व्हिजन सेंटर येथे मोफत नेत्र व हृदयरोग शिबिर आयोजित केले होते. शिबिराचा ८२ रुग्णांनी लाभ घेतला. अध्यक्षस्थानी डॉ.विजय डागा होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवाभावी संजय पाटील, सोमचंद दंड, हृदय रोग तज्ज्ञ डॉ. युसुफ खान, मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा येथील गजानन घोगरे, व्हिजन सेंटरचे ऑप्टोमेट्रीस्ट डॉ.ऋषिकेश लिंगोट उपस्थित होते. सर्व प्रथम ओम शांती सेवा समिती आणि ओम शांती ऑप्टिकलचे संचालक सचिन भंसाली, रक्तदान कार्यात व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर हनुमान सेनेचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे १६ ते २० जानेवारी २०२४ पर्यंत झालेल्या आंतरराष्ट्रीय कथावाचक प.पू. पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी लाखो भाविक चाळीसगावात येणार होते. त्यांच्या प्रवासाची सोय कुठेही कमी पडायला नको म्हणून अगदी पाचच दिवस हातात असतांना अचुक नियोजन आगारप्रमुख मयूर पाटील यांनी केले. त्यामुळे शिवमहापुराण कथेनिमित्त आलेल्या लाखो भाविकांसाठी प्रवासाचे ‘शिवधनुष्य’ सहजरित्या उचलुन दाखविले. पाच दिवसात आगार प्रमुखांनी अगदी ॲक्शन मोडवर सर्व प्रशासन पर्यवेक्षकीय कर्मचारी, चालक, वाहक, यांत्रिक यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रणनिती आखली. त्यात विभाग नियंत्रक जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी बंजारा, वि.क.वर्ग. अधिकारी चित्ते, क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले. पाच दिवस चाललेल्या कथेनिमित्त सर्व चालक,…
साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील पाचवीची विद्यार्थिनी तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू मोहिनी हरिभाऊ राऊत हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक मिळविले आहे. पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या सहा खेळाडुंनी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभाग नोंदवत राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एक कांस्य पदक पटकविले आहे. स्पर्धेत वृषाली पवार, श्रावणी लोहार, कार्तिक सोनवणे, वृषभ चौधरी, भावेश महाजन यांनीही उत्कृष्ठ सहभाग नोंदविला. त्यांना शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-सचिव तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालये क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत, भूषण मगरे, ईश्वर क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडुंचे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आपले जीवन सुंदर बनवायचे असेल, आपल्या मुलाबाळांवर-पत्नीवर जीवापाड प्रेम करत असाल तर तंबाखू, गुटखा, दारू अशा व्यसनांचा त्याग करा आणि कॅन्सरपासून दूर रहा, असे पं.प्रदीप मिश्रा यांनी उपस्थित भाविकांना सांगितले. सिनेमा पाहून व्यसनाची जशी सवय लागते. तसे चांगल्या सत्संगाने हे व्यसन का सुटू शकत नाही, असा प्रश्न करत त्यांनी व्यसनांचा त्याग करा आणि शिवजींचा जागर करा, आयुष्य सुखी होईल, असे सांगितले. एकतर हृदयात दारू राहील नाही तर शिव. आपल्या मुखातून कुणाची निंदा होणार नाही, असे आचरण आत्मसात करा, असा सल्ला त्यांनी दिला. शेवटच्या दिवशी पं.मिश्रा यांनी भाविकांना उद्बोधन करतांना अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार…