साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील खोटे नगरातील साई मोरया ग्रुप आणि परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने खोटे नगरमधील वरुणेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धेत परिसरातील १७८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट अश्या दोन गटात घेण्यात आली. त्यात लहान गटास प्रभू श्रीराम यांचे चित्र रंगविणे व मोठ्या गटास प्रभू श्रीराम यांचे चित्र काढून रंगविणे असे विषय ठेवले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे मुख्याध्यापक गोकुळ महाजन, परिवर्तन इनिव्हेशनचे निखिल जाधव, साई मोरया ग्रुपचे संस्थापक-अध्यक्ष उमाकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक हेमंत महाजन,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भरारी फाउंडेशनतर्फे येत्या गुरुवारी, २५ जानेवारीपासून आयोजित करण्यात येत असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे भूमिपूजन सोमवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अयोध्या येथील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून महोत्सवाच्या स्थळी राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ते नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. भूमिपूजननिमित्त श्रीरामाची ‘महाआरती’ झाली. यावेळी क्षत्रिय वर्मा समाजातील कलाकारांनी सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. सागर पार्क येथे आयोजित महाआरती व भूमीपूजनाच्या कार्यक्रमात उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या यंदाच्या ९ व्या वर्षाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब सूर्यवंशी, रत्नाकर पाटील, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, अनील काकंरीया, ॲड. के .बी वर्मा,…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवारी २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भडगाव येथील विठ्ठल, रुख्मिणी व श्री संत सेना महाराज मंदिरात सकाळी १० वाजता महाआरती करण्यात आली. यावेळी शहरातील नाभिक समाजाचे रामभक्त अध्यक्ष संजय पवार पत्रकार, सचिव ॲड. भरत ठाकरे, खजिनदार दीपक शिरसाठ, कार्यकारिणी सदस्य सुभाष ठाकरे, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, भगवान नेरपगार, सूर्यभान वाघ, किशोर निकम, राकेश शिरसाठ, नितीन शिरसाठ, राजेंद्र महाले, नारायण शिरसाठ, ह.भ.प. नारायण निकम, संजय शिरसाठ, तुळशीदास निकम, सुभाष चव्हाण, अरुण पवार, सुभाष नेरपगारे, अनिल महाले, प्रल्हाद ठाकरे, अनिल शिरसाठ, राजु सोनवणे, शिवाजीनगर परिसरातील रामभक्त, प्रशांत कुंभारे, गोविंद राजपूत,…
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर तीन राज्यांना जोडणारा एकमेव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नियमित अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे हाडे ‘खिळखिळी’ झाली आहे. सध्या हा महामार्ग पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालविता येत नाही. जागोजागी फूटभर खड्डे पडलेले आहे. त्यामुळे वाहन चालवावे तरी कसे? असा प्रश्न महामार्गावरील प्रत्येक वाहनधारकांना पडत आहे. दुसरीकडे याच महामार्गावर नियमितपणे वाहतूक शाखेकडून वसुली होत असल्याने वाहनधारक चांगलेच कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूर्ण महामार्गाचे उच्च प्रतीचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. सविस्तर असे की, गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा एकमेव महामार्ग आहे. हा मार्ग कधी महामार्ग बनेल…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल (सी.बी.एस.ई.) शाळेचा सातवा वार्षिक स्नेहसंमेलन ‘समर्पण’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.अविनाश जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंभू पाटील (परिवर्तन सांस्कृतिक संस्था, जळगाव), शाळेचे मार्गदर्शक बजरंग अग्रवाल, चेअरमन डी.डी.पाटील, अध्यक्ष नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर, शालेय समितीच्या सदस्या सितीका अग्रवाल, ममता अग्रवाल, आचल अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर करून सर्व पाहुण्यांचे आकर्षकरित्या स्वागत केले. वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा विशिष्ट…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगाव येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र बाल राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जामनेर येथील स्वराज्य प्रतिष्ठान संचलित पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुल या शाळेने यावर्षी पहिल्यांदाच आपला सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कथालेखन, पात्रांचा जिवंतपणा, साजेसे नेपथ्य आणि आणि प्रेक्षकांच्या टाळ्या या सर्वांमुळे छत्रपती संभाजी महाराज नाट्य सभागृहात सादर झाले. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन संतोष मधुकर शिराळे यांनी केले. नाटकात विद्यार्थ्यांनी सुरेखपणे अभिनयाची चुणूक दाखविली. लहानग्या आदी नावाच्या लहान मुलाभोवती गुंफलेली ही कथा अतिशय साधी, सरळ पण तितकीच आपल्याला आपल्यातली वाटणारी अशी होती. लहान मुलांना अभ्यासाचा येणारा कंटाळा त्यात टीव्हीवर बघितले जाणारे सुपर कार्टून्स आणि मग आपल्याही जीवनात, आपल्याजवळही अशीच एखादी सुपर पावर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील बी. पी.आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के.आर.कोतकर ज्युनिअर महाविद्यालयात सोमवारी, २२ जानेवारी रोजी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्यावतीने श्रीराम लल्ला प्रतिष्ठापनादिनानिमित्त प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही.बिल्दीकर, उपप्राचार्य डी.एल.वसईकर, डॉ. के. एस. खापर्डे आणि उत्सव समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांनी १०८ वेळा राम रक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डी.एल. वसईकर यांनी रामरक्षा पठणाचे पौराहित्य केले. तसेच यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी मनोगतात मर्यादा पुरुषोत्तमाची माहिती सांगून संस्कार आणि मर्यादा यामध्ये…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील शुभम अनिल आगोणे मुंबई पोलीस याचा मकर संक्रांतच्या पूर्व संध्येला खुन करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपींपैकी काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यांच्या निषेधार्थ समाजबांधव व इतर समाज बांधवानी हजारोंच्या संख्येने मोर्चात महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. सोमवारी, २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता अहिल्यादेवी होळकर चौक, पाटणादेवी नाका ते घाटरोड छत्रपती शिवाजी महाराज चौक सिग्नल पॉर्इंट येथे निदर्शने केली. मोर्चात फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपींची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपी हे परंपरागत समाजविघातक…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी, २२ जानेवारी रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्त महाराष्ट्रातील विविध राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गावागावात दिवाळी साजरी करण्यात आल्याचे चित्र होते. तालुक्यातील पातोंडा येथील राम मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. गावात या दिवसानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी रोषणाई आणि सजावट करण्यात आली. तसेच दारापुढे सडामार्जन करुन सुबक काढलेल्या रांगोळी लक्ष वेधून घेत होत्या. सुरुवातीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कुशल देशमुख यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामाची पूजा केली. प्राणप्रतिष्ठा दिनाच्या दिवशी रामभक्तांनी राम नामाचा जयघोष करत शोभायात्रा काढण्यात आली.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील कोतकर कॉलेजपासून रविवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता पोलीस मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिकांनी भाग घ्यावा, असे आव्हान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. एक धाव व्यसनमुक्तीसाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत महाराष्ट्राचे ट्रिपल केसरी पहेलवान व पोलीस अधिकारी विजय चौधरी मोहिमेत सहभागी होणार आहे. मोहिमेसाठी जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, पोलीस उप अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, योगेश माळी बिरारी, गोपनीय विभागाचे पंढरीनाथ पवार, भटू पाटील यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहे.