माजी राष्ट्रपतींचे भाचे किशोर पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जळगाव / प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह त्यांच्या भावंडांच्या नावावरील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शिवारातील शेत जमिनीवर मंत्री जयकुमार रावल यांच्या कुटुंबियांनी बेकायदा कब्जा केला आहे. याप्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला आहे. न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाचे दोन बेलीफ प्रत्यक्ष त्या शेतजमिनीवर आले असताना त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना हुसकावून लावल्याचा आरोप वजा माहिती माजी राष्ट्रपतींचे भाचे किशोर दिलीपसिंग पाटील यांनी शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात सविस्तर माहिती देतांना किशोर पाटील म्हणाले की, दोंडाईचा शिवारातील गट क्रमांक ३५१ ही आठ हेक्टर ३२ आर शेतजमीन आणि…
Author: Sharad Bhalerao
तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना एचआयव्ही, एड्स नियंत्रणावर मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील स्थित किड्स झोन प्रि-स्कुल, राज प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि डॉ. सुनीलभाऊ महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये जळगाव जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातर्फे इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत संवेदीकरण कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमात रुपाली दीक्षित, मनीषा वानखेडे, निशिगंधा बागुल, दीपक धनगर यांनी विद्यार्थ्यांना किशोरवयीन जीवन कौशल्य, किशोरावस्था व वाढते वय, पौगांडावस्थेतील प्रजननक्षम व लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य समस्या, मादक पदार्थांचा दुरुपयोग तसेच एचआयव्ही, एड्स नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य माहिती दिल्यामुळे कार्यक्रमातून त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक विकास…
शिबिरात विविध आसनांसह स्वास्थ्यवर्धक तंत्रांचे प्रशिक्षण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील श्रीधर नगर येथे मु.जे.महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथीतर्फे महिलांसाठी योग प्रशिक्षण शिबिर १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर कालावधीत सकाळी ६ ते ७ या वेळेत पार पडले. शिबिरात महिलांना योगाविषयी माहितीसह धडे देण्यात आले. संचालक प्रा.डॉ. देवानंद सोनार आणि मार्गदर्शिका प्रा.डॉ. ज्योती वाघ यांनी सहभागींना योग्य मार्गदर्शन केले. याशिवाय योगशिक्षिका अर्चना गुरव यांनी महत्त्वाचे योगदान दिले. योग प्रशिक्षिका किर्ती गोळे यांनी शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी योग्य रितीने केली. यावेळी सहाय्यक योग प्रशिक्षिका मीनल इंगळे, रजनी जाधव, नम्रता पाटील, स्नेहांकिता पाटील यांची उपस्थिती लाभली.शिबिराद्वारे महिलांना योगाच्या विविध आसनांचे आणि स्वास्थ्यवर्धक तंत्रांचे…
नवरात्रीनिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हरिजन कन्या छात्रालयात कन्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी, लहान मुलींमध्ये देवीचे रूप मानून ही परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कार्यक्रमात कन्यांना आसनावर बसवून त्यांचे पाय धुणे, स्वच्छ पुसणे, कपाळी तिलक लावणे, फुले अर्पण करणे तसेच भेटवस्तू व फळे देणे अशा पद्धतीने पूजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाद्वारे मुलींमध्ये सणाची पवित्रता आणि नारीशक्तीची जाणीव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, ॲड.सीमा जाधव, वंदना मंडावरे, आशा मौर्य,…
उमेद अभियानातंर्गंत ३ महिला बचत गटांना २४ लाख रुपये निधीचे धनादेश ; ९४६ लाभार्थ्यांना विविध योजना, दाखले वितरित साईमत/एरंडोल/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित महासमाधान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून शिबिर यशस्वी केले. शिबिरात ९४६ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना आणि दाखले तात्काळ वितरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरात खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील आणि १८ विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरात २० स्टॉल्स लावण्यात आले होते. ज्यातून नागरिकांना विविध विभागांच्या योजना…
दहशत माजविणाऱ्या सराईतावर ‘एमपीडीए’ची कारवाई साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरात दहशत माजविणाऱ्या आणि शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्ध १३ गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा) याला अखेर एमपीडीए कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील समीर काकर हा कुख्यात गुन्हेगार आहे. तांबापुरा, मेहरुण व जळगाव परिसरात त्याची दहशत होती. नागरिकांना विनाकारण मारहाण, दरोडे, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत अशा १३ गंभीर गुन्ह्यांत तो गुंतलेला आहे. यापूर्वी त्याला जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, हद्दपारीनंतरही त्याने गुन्हेगारी सुरुच ठेवली होती. एमआयडीसी पोलिसांनी…
महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, गुजराती वेशभूषेत जल्लोष ; विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षीस साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील भुसावळ रस्त्यावरील कालंका माता मंदिर परिसरातील जमुना नगर येथे नवरंग दुर्गोत्सव मंडळाच्यावतीने यंदा नवरात्री उत्सव रंगारंग कार्यक्रमात साजरा होत आहे. यावर्षी नवीन प्रकार म्हणून ‘सावरिया शेठ…..’ गाण्यावर चार टाळीची स्टेप, कानुडो, टेटीडो तसेच गरबा रास आयोजित केले आहेत. दररोज विविध राज्यातील सहभागी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन व गुजराती वेशभूषेत गरबा-दांडिया रास खेळत आहेत. विजेत्यांना दररोज आकर्षक बक्षीस देण्यात येत आहे. त्यामुळे गरबा-दांडियात उत्सव ‘धूम’ रंगली आहे. नवरंग दुर्गोत्सव मंडळाने यंदा वणी गडाची सप्तश्रृंगी देवीची साडेसात फुटाची मूर्ती येथे स्थापना केली आहे. सकाळ – सायंकाळी ८ वाजता महापूजा,…
वीज प्रभाग कार्यालयाचे हेमंत बेलसरे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी : वीज मीटर बदलल्यावरही बिलाची तक्रार करुनही निराकरणात उशीर होत आहे. यासंदर्भात ग्राहकाच्या केलेल्या तक्रारीकडे वीज प्रभाग कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड ग्राहकाने वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जाद्वारे केली आहे. त्यामुळे वीज महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चौकशीची मागणी केली आहे. शहरातील रायसोनी नगरातील रहिवासी हेमंत बेलसरे यांनी त्यांच्या घराच्या वीज मीटरबाबत गंभीर तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या सहा महिन्यांपासून वीज मीटर नादुरुस्त होते. त्यांनी अनेकवेळा अर्ज देऊन पाठपुरावा केला असला तरी वीज मीटर लवकर बदलून मिळाले नाही. एक ते दीड महिन्यापूर्वी वीज मीटर बदलून मिळाले.…
अमली पदार्थाविरोधी जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अमली पदार्थांचे मानसिक दुष्परिणाम म्हणजे चिंता, डिप्रेशन, मानसिक तणाव, मतिभ्रम आणि स्मृतीभ्रंश होणे. शारीरिक दुष्परिणामांमध्ये वजन कमी होणे, झोप न लागणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या येणे यांचा समावेश होतो. त्यामुळे युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली अवलंबावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अवित पाटील यांनी केले. राष्ट्रीय हरित सेना आणि दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्यावतीने आयोजित अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमात युवक-युवतींमध्ये वाढलेल्या व्यसनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व उपस्थितांनी अमली पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्धार व्यक्त केला. अमली पदार्थामुळे शारीरिक व मानसिक आजार, कौटुंबिक तणाव, आर्थिक अडचणी,…
चैतन्यधामला आयोजित बालसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : बालपण हे जीवनाचा पाया असतो आणि त्या वयात मुलांच्या मनावर जे संस्कार होतात. त्यावर त्यांच्या पुढील आयुष्याचा संपूर्ण प्रवास ठरतो. बालसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची दिशा मिळत असल्याचे मत गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती प.पू. श्याम चैतन्य महाराज यांनी व्यक्त केले. ते जामनेर तालुक्यातील होळहवेली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चैतन्यधाम येथे आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बालसंस्कार शिबिर म्हणजे मुलांना योग्य दिशा देणारे, जीवनमूल्य शिकवणारे आणि सदगुणांचे बीजारोपण होणारे एक पवित्र साधन आहे. आजची पिढी संस्कार आणि संस्कृती विसरून विकृतीकडे जात आहे. त्यामुळे धावपळीच्या जीवनात…