Author: Sharad Bhalerao

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी उमटली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवारी आयोजित केली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील तब्बल ५७ हजाराहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ३६ धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. आपल्या असोसिएशनसह भुसावळ शहराचे नाव अभिमानाने उंचावले. ही स्पर्धा ४२ कि.मी.ची पूर्ण मॅरेथॉन, २१ कि.मी.ची अर्ध मॅरेथॉन, महिलांकरिता १० कि.मी.चा रन आणि ६ कि.मी.चा ड्रीम रन या ४ श्रेणींमध्ये घेण्यात आली.…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द व बुद्रुक या गावांना येत्या आठ दिवसानंतर फिल्टर, शुद्ध पाणी मिळण्यास सुरूवात होईल. शुद्ध जल संचय विहीर व पंप हाऊसचा हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाची पाणी साठवणूक क्षमता ६ लाख २५ हजार लिटर्स एवढी आहे. मंगळवारी, २३ जानेवारीपासून प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला आहे. जानेवारी महिन्यापासून शुद्ध पाणी मिळण्याचा शब्द त्यांनी दिला होता. प्रकल्पाची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केली. त्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पाहणी केली. पाहणीत प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे निश्‍चित झाले. याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक संजय…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या सार्वजनिक जागी जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा १ लाख ७२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, पोलीस पथकाने सोमवारी, २२ जानेवारी रोजी रात्री छापा टाकला. कारवाईत जॉनी ऊर्फ मुन्ना सुंदर…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील वाडी चौक परिसरात अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सकाळी राम विठ्ठल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानिमित्त संत सखाराम माऊली मित्र मंडळातर्फे ‘एक शाम राम के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चांगल्या देखाव्यालाही लाजवेल अशी सजावट केली होती. सायंकाळी संपूर्ण परिसरात दिवे लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात सडा टाकून सुंदर अशी रांगोळी टाकण्यात आली होती. यावेळी भाऊ एडके, केशव पुराणिक, शारंगधर गुरुजी, प्रशांत जोशी, साहिल जोशी आणि ज्ञानेश्‍वर पाठशाळेचे विद्यार्थी यांनी रामरक्षा स्तोत्र आणि शांती पाठाचे वाचन केले. टाळ, मृदुंगांच्या गजरात संपूर्ण परिसर संगीतमय झाला. ‘रामराज्य काय उन्ये…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. मंगळवारी, २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील शहर महानगरपालिका, तालुक्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा व तालुक्यानिहाय सुमारे ८ हजारापेक्षा जास्त प्रगणक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक प्रगणक राखीव असून उर्वरित प्रगणक प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत. सर्वेक्षणाच्या…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यात असणाऱ्या श्रीराम मंदिरांना भेटी देऊन आरती, हनुमान चालीसा पठण केली. त्यामुळे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अमळनेर येथील राम मंदीर येथुन सकाळी कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. तालुक्यातील ढेकु, आर्डी, वावडे, एकलहरे, एकतास, तांदळी, कळमसरे, करणखेडा, नंदगाव, दहीवद, रामेश्‍वर, हेडावे येथुन अमळनेर येथे श्रीराम कॉलनीत माजी आ.स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीत विधान सभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, शहराध्यक्ष विजय राजपूत, सरचिटणीस गोकुळ परदेशी, प्रा. डॉ.जयंत पटवर्धन, किसान मोर्चाचे अध्यक्ष दीपक पवार, कोषाध्यक्ष अनिल लाड, उपाध्यक्ष सुभाष पाटील, दीपक पाटील, शिक्षक आघाडीचे प्रवीण पाटील, सदाशिव पाटील, परमेश्‍वर…

Read More

साईमत, पाळधी, ता .धरणगाव : वार्ताहर येथे नव्यानेच अशोक पाटील यांच्या सहकार्याने श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर उभारण्यात आले. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अशोक पाटील आणि ग्रामस्थांतर्फे सप्ताहाचे आयोजन केले होते. सोमवारी, २२ जानेवारी रोजी मुहूर्ताचे औचित्य साधून ग्रामस्थांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. याठिकाणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा पार पडली. अध्यक्षस्थानी अशोक पाटील होते. यावेळी किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज चिंचोलकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. गावात चौकाचौकात काढलेल्या विविध रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण गावात भगवे झेंडे, पताका, बॅनर व स्वागत कमानीमुळे गावासह मंदिर परिसर भगवामय झाला होता. याप्रसंगी व्यासपीठावर अशोक पाटील,…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवडी येथील गेल्या ३५ वर्षांपासून रहिवासी असलेल्या शासकीय जागेवर भर रस्त्यात मायलेकांसोबत तिघांनी अतिक्रमण करून रस्ता अडविल्याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अपंग रामा धोंडू दोळे यांच्यासह सात जणांनी एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. पाच दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा प्रजासत्ताक दिनी परिवारासह मलकापूर येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दोळे परिवाराने २१ जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात नमूद केले आहे की, दोळे परिवार गेल्या ३५ वर्षापासून लोणवडी येथे राहत आहे. वापराच्या रस्त्यात दिनकर निना दोळे याने टिन पत्राचे घर बांधून रस्ता अडविला आहे. वास्तविक पाहता दिनकर…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रभु श्रीराम यांच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आजपासून प्रत्येक घरावर दिवे लावण्यात आले. प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळी टाकण्यात आली. यानिमित्त ह.भ.प. मुकेश महाराज अम्बा पिंप्रीकर यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थांनी उपस्थितीत प्रभू रामचंद्रांचे भजन व कीर्तनाचा लाभ घेतला. सकाळी अयोध्याहुन आलेल्या कलश व रामपादुकाची पालखीची संपुर्ण गावात ढोलताशा, भजनी मंडळ, रामधुन या मंत्र घोषणा देत तिघी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढलेल्या दिसत होत्या. प्रत्येक घरासमोर पाच दिव्य व घरावरच्या छतावरती भगवा झेंड, भगवा रंगाचे पताके लावण्यात आले होते. सतेच…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सावदा येथे सोमवारी, २२ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शोभायात्रेत श्रीराम नामाचा गजर करत हजारोंच्या संख्येने भाविकांनी आवर्जून सहभाग नोंदविला. ही मिरवणूक गांधी चौक, गवत बाजार, वंजारवाडी, मोठा आड, लहान मारुती, पाटील पुरा, संभाजी चौक, चांदणी चौक मार्गे निघाली होती. मिरवणुकीचा मार्ग रंगबिरंगी रांगोळ्यांनी, भगवे ध्वज आणि पताकांनी सुशोभीकरण केल्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. तसेच शहरातील भोईवाडा, अमर गणेश मंडळ, साडी बाग, बुधवार पेठ, इंगळे वाडा, चितोडे वाणी समाज गल्ली, स्वामीनारायण नगर यांच्यासह विविध भागात राम भक्तांनी प्रभु श्रीराम यांचे तैल चित्र लावून विधिवत पूजा…

Read More