साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील लोकसेवा बहुउद्देशीय मंडळ, शिक्षण संस्था संचलित पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयाला अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद’ टीमची नुकतीच भेट पूर्ण झाली. भारतात उच्च शिक्षणाची गुणवत्ता प्रमाणित करण्याची सुरुवात उदारीकरणानंतर सुरू झाली. विशेषत: नॅक स्वायत्त संस्थेची स्थापना १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडयातील ‘उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा ऱ्हास’ शीर्षकाखाली अहवाल व कृती कार्यक्रम १९९२ नुसार झाली. ही संस्था विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालते. ती स्वायत्त असून विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या कामगिरीचे मूल्यांकन व प्रमाणिकरण करते. शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेला प्रोत्साहन देण्याबरोबरच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची क्षमता, साधने, संधी संवर्धित करण्यासाठी प्रोत्साहित करते.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेत कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच ही भव्य मिरवणूक मुक्ताईनगर येथील जुनेगावातील हनुमान मंदिर येथून शहरातील प्रवर्तन चौकात समाप्त होऊन त्यानंतर मुक्ताईनगर येथील १५ कार सेवकांचा आ.चंद्रकांत पाटील यांनी शाल, पुष्पगुच्छ व प्रभू श्रीरामाची प्रतिमा देऊन सत्कार केला. त्यानंतर आ.चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण होते. घरोघरी रांगोळी, फुलांची सजावट, दिवे लावले होते. चौकात भव्य असे सुशोभित स्टेज तयार केले होते. यानंतर श्रीराम यांची आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच शहरातील मंदिरात रंगरंगोटी…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी देशातील सर्वसामान्य गरीब, पीडित, वंचित, महिला, युवक व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी १४ जानेवारी २०२४ पासून ‘भारत जोडो न्याय’ यात्रेला सुरूवात केल्याचे सर्वश्रुत आहे. मणिपूर येथुन निघालेली ही यात्रा नागालँड, अरुणाचल राज्यातील प्रवास पूर्ण करून आसाम राज्यात दाखल झालेली आहे. यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघता भाजपा प्रणित आसाम राज्यात काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांच्या गुंडांनी ‘भारत जोडो न्याय’ यात्रेवर हल्ला केला. खा. राहुल गांधी यांची बस अडविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आसाम काँग्रेसचे अध्यक्ष भुपेन बोरा यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाले…
साईमत, यावल : प्रतिनिधी शहरातील फैजपूर रस्त्यावरील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी, २३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात बेरोजगार विद्यार्थ्यांनी मुलाखती देऊन प्रतिसाद दिला. त्यात बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळास मुलाखती दिल्या. त्यातील काही गरजुंना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले. मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या विद्यमाने केले होते. सकाळपासून मेळाव्याला जिल्ह्याभरातून तरूणांनी उपस्थिती दिली. मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.संध्या…
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील मोठा आड सुभाष चौक परिसरात शिवसेनाप्रमुख हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्वामीनारायण मंदिराचे पुजारी सत्यप्रकाश स्वामी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी उबाठाचे उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद पाटील, शहर प्रमुख भरत नेहते, निलेश खाचणे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख योगिता वायकोळे, पूजा बेंडाळे, माजी नगरसेवक श्याम पाटील, शहर सचिव शरद भारंबे, उपशहर प्रमुख दिगंबर महाजन, डॉ.अजितकुमार पाटील, यशवंत भंगाळे, अतुल नेहते, डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रमोद कुरकुरे, संजय बेंडाळे, दीपाली नेहते, वैशाली भारंबे, पल्लवी चौधरी, श्री.जोगी, श्री.देवकर यांच्यासह परिसरातील महिला शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते. यानंतर देशमुख वाडामधील बॅरिस्टर…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी वरणगाव पोलीस स्टेशन बोदवड न्यायालयाला जोडण्यात यावे. कारण वरणगाव आणि परिसरातील गावे ही बोदवडच्या खरेदी विक्री ऑफीसला अगोदरच जोडलेली आहेत. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशन बोदवड न्यायालयास जोडण्यास कोणतीही प्रशासकीय अडचण येणार नाही. तसेच बोदवड न्यायालयात कोर्ट कॅन्टींग, बोदवडला वरिष्ठ न्यायालय (सिनियर डीव्हीजन) सुरू करण्यात यावे, अशा विविध मागण्या वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायाधीशांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी वकील संघातर्फे बोदवड न्यायालयातील असलेल्या समस्यांबाबत निवेदनही देण्यात आले. जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेख यांनी बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयास नुकतीच भेट दिली. याप्रसंगी वकील कक्षात बोदवड तालुका वकील…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील जामनेर रस्त्यालगतच्या रामानंद नगर, दूर्गा कॉलनी परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिरातर्फे परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते. ही मिरवणूक परिसरातून सायंकाळी काढण्यात आली. शोभायात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. सकाळी अकरा वाजेपासून मंदिर आवारात मंडप टाकून मोठ्या स्क्रीनद्वारे अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दाखविण्यात आला. शेकडो भाविकांनी मंडपात बसून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घेतला. त्यानंतर महाआरती झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी शोभायात्रेने मिरवणुकीची सुरूवात झाली. प्रभू श्रीरामाची भूमिका कुमारी भक्ती हिने, लक्ष्मणाची भूमिका सिद्धी हिने, सीतेची भूमिका लावण्या हिने तर हनुमानाची भूमिका दिशांत…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एणगाव हायस्कुलमध्ये हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण प्रशासन चालविण्यास सुरुवात केली आहे. २३ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सर्वेक्षणासाठी एणगाव हायस्कुलमधील मुख्याध्यापक वगळता सर्व शिक्षक या कामासाठी नियुक्त केले आहेत. परिणामी, ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षणाचा बोजवारा उडू शकतो. संभाव्य परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे अध्ययनाचे कार्य सुरळीतपणे सुरू रहावे, यासाठी मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी शिक्षक दिनी अध्यापन केलेल्या विद्यार्थी शिक्षकांना सोबत घेऊन शाळा नियमित सुरू केली आहे. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत विद्यार्थीच ‘मास्तर’ म्हणून ज्ञानार्जन करणार आहे. एणगाव हायस्कुलमध्ये अनेक विद्यार्थी वरखेड बुद्रुक, वरखेड खुर्द, राजुर, निमखेड आणि घाणखेड या गावामधून येत असल्याने त्यांच्या जाण्या-येण्याच्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यामुळे संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृह, सभामंडप क्र. २ ला कविवर्य ना. धों. महानोर सभागृह तर सभामंडप क्र. ३ ला बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. सभामंडप क्र.१ हे जर्मन हँगर पद्धतीचे भव्य असे सभामंडप आहे. त्यात सुमारे १० हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथे अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी, २२ जानेवारी रोजी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते. डीजेच्या तालावर आबाल वृद्ध मंडळी, तरुण-तरुणी, महिला वर्ग बेधुंद होऊन आनंदोत्सव साजरा करत होते. मुली आणि महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन शोभायात्रेत सहभाग नोंदविला. गावातील मुलींनीही भगवे फेटे घालून हजेरी लावली. सकाळी पूर्ण गावात रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी झाली. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे लाईव्ह प्रक्षेपण गावातील महिला नागरिकांनी पाहिले. गावातील शोभायात्रा श्रीराम मंदिर येथे आल्यानंतर गावातील कारसेवक अशोक चौधरी, माधव चौधरी, रमेश लिंगायत यांचा सत्कार करण्यात आला. गावातील…