चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची पाखरण साईमत/भुसावळ : येथील जैन समाज संचलित सुशील बहुल महिला मंडळाच्यावतीने नवरात्रीचे औचित्य साधत यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चवथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह खाऊ किटचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सांगवी खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुशील बहुल समूहाच्या ज्येष्ठ सदस्य आशा कोटे उपस्थित होत्या. तसेच मंडळाच्या मंगला कोटे, पारस नाहटा, ज्योती गादिया, किरण कोटे, कल्पना गादिया, सुनीता गादिया, कल्पना नहार, सपना नाहटा आदींचा सहभाग राहिला. कार्यक्रमाची सुरुवात सांगवी खुर्द शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित…
Author: Sharad Bhalerao
आरतीतील सामूहिक सहभाग, एकात्मतेचा निर्धार दिशा देणारा ठरला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील कंजरवाड्यातील जाखनी नगरात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे नवदुर्गा मित्र मंडळात महाकाली मातेची आरती आयोजित केली होती. हा कार्यक्रम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. धार्मिक व सांघिक उपक्रमातून फाउंडेशनची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक उपस्थिती अधोरेखित झाली. भगवे सहकारी मोठ्या शिस्तीने व वेळेवर सहभागी झाले. हा सामूहिक सहभाग आणि एकात्मतेचा निर्धार फाउंडेशनच्या कामकाजाला दिशा देणारा ठरला असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, सदस्य विजय अभंगे, उमेश माछरेकर, वीर दहियेकर, गौतम बागडे, संदीप…
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीची ३८ वी सर्वसाधारण सभा उत्साहात साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जगात प्रतिकूल परिस्थिती असताना ५०० कोटीची पाईप आणि इतर उत्पादने निर्यात व ३५० कोटींची फळप्रक्रिया उद्योगांमध्ये जैन इरिगेशन कंपनीने निर्यात केली. पाईप, सूक्ष्मसिंचन, टिश्यूकल्चर, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक शिट व सौलर विभागातून सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत भविष्यात एक हजार कोटींचे निर्यातीचे उद्दिष्टे कंपनीचे आहे. ‘सहनशक्तीने रूजलेले, उत्कृष्टतेत फुलणारे’ संकल्पनेच्या आधारावर भारतातील १४ कोटी शेतकऱ्यांपैकी एक कोटी शेतकऱ्यांपर्यंत कंपनी पोहचली आहे. गुणवत्ता व विक्री पश्चात सेवेतून मिळालेल्या विश्वासावर कंपनी खरी ठरली आहे. शेत, शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी जगातील सर्वात्तम तंत्रज्ञान अल्पभुधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचेही कंपनीचे उपाध्यक्ष अनिल…
कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे विविध विषयांवर सेमिनार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित चार दिवसीय प्रबोधन, जागरूकता आणि नवविचार संस्कार कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी रोज सकाळी ७ ते ९.३० या वेळेत पार पडली. ही कार्यशाळा पाचवी ते दहावी मधील १२०० विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभागी होऊन यशस्वी केली. चार दिवसीय व्याख्यानमालेत खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांचे “अंतरिक्षाची सफर”, प्रा. डॉ. रवींद्रकुमार बावणे यांचे “संशोधनाकडे वळा”, प्रा. दिलीप भारंबे यांचे “हसत, खेळत, गणित”, मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी आनंद ढिवरे आणि प्रा. दिलीप भारंबे यांचे “चमत्कारामागील विज्ञान” विषयांवर सेमिनार घेण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्य, विविध कृतीयुक्त…
कुसुंबे खुर्दला आयोजित शिक्षण परिषदेत प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांचा “गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम” काटेकोरपणे राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख प्रदीप राजपूत यांनी केले. जळगाव तालुक्यातील चिंचोली केंद्राच्या जिल्हा परिषदेच्या कुसुंबे खुर्द येथील उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद नुकतीच पार पडली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. परिषदेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यासपीठावर बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, मुकुंदा इंगळे, विलास चौधरी, संजय पाटील, संजय इखे, उषा माळी, अलका पालवे, चित्रलेखा वायकोळे आदी उपस्थित होते. परिषदेत शिक्षणातील नवीन प्रयोग, अभ्यासक्रमातील सुधारणा तसेच अध्ययन-अध्यापनात…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना स्वतःचा कल आणि छंद तपासून पाहावा. निकोप सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. आयुष्यात उद्दिष्टे आणि तत्त्वे निश्चित करूनच ध्येय गाठावे. त्यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने साकारता येतील, असे प्रतिपादन विज्ञान मंडळाचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.प्रतिभा निकम यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी ‘विज्ञान : एक प्रगतशील करिअरचे द्वार’ विषयावर मार्गदर्शन करतांना बारावीनंतर विज्ञानाच्या उपलब्ध विविध करिअर वाटांविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आर. बी.ठाकरे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी…
पाद्यपूजन, अभिषेक, गुरुपूजनासह नामसंकीर्तन प्रवचनाचा समावेश साईमत/जळगाव/प्रतिपादन : तालुक्यातील कुसुंबा येथील सद्गुरू समर्थ दत्ता आप्पा महाराज सेवा प्रतिष्ठानतर्फे स्वामी समर्थ शाळेजवळील सद्गुरू पादुका व कल्पवृक्ष शिवमंदिर, गट नं. ३८६, पुरुषोत्तम पाटील नगरात स.स. दत्ता आप्पा महाराज यांचा १७ वा पुण्यतिथी सोहळा आश्विन शुद्ध अष्टमी, मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. सुरुवातीला दै.‘साईमत’चे उपसंपादक शरद भालेराव यांच्या हस्ते पाद्यपूजन, अभिषेक, गुरुपूजन करण्यात आले. त्यांना प्रतिष्ठानचे सदस्य भागवत चौधरी यांच्या हस्ते दत्ता आप्पा महाराज यांचा ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव जगदीश देवरे यांनी दासबोधाचे वाचन करुन आप्पा महाराजांचे विविध भजने सादर केली. तसेच…
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीतील विशेष आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद साईमत/जामनेर/प्रतिनिधी : मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. प्रत्येक मुलगी व महिलेने या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. पाळी ही लाज नसून अभिमान आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. कारण, सशक्त स्त्री हीच सशक्त परिवाराची पायाभरणी असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे सशक्तीकरण करणे आणि त्यांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. उपक्रमाअंतर्गत जामनेर…
अग्निशामक यंत्राचा वापर करून विझवली आग साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून अधिपरिचारिका ज्यूलीना पिंपळसे आणि सुवर्णा पुरी यांनी तात्काळ आग विझविण्यास अग्निशामक यंत्रांचा वापर केला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी घटनेची दखल घेऊन दोन्ही अधिपरिचारिकांना दालनात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक अधिसेवक तुषार पाटील उपस्थित होते. घटनेवेळी प्रसुतीपूर्व दाखल कक्ष क्रमांक ६ मध्ये गरोदर माता व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. मुख्य दरवाजाजवळील स्विच बोर्डाजवळ स्पार्किंग होताच कर्मचाऱ्यांनी अधिपरिचारिकांना माहिती दिली.…
अनर्थ टळला, कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता, जीवितहानी टळली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतीगृहात सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आणि त्वरित वापरलेल्या अग्निशमन यंत्रांच्या साहाय्याने ही आग काही मिनिटातच आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली. प्राप्त माहितीनुसार, आग लागल्यानंतर प्रसूतीगृहातील विद्युत मीटर पूर्णपणे जळून खाक झाला. ज्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि दुर्गंधी पसरली. तसेच वातावरणात घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने प्रसूतीगृहात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले. प्रसूतीगृहाचे अधिकारी तुषार पाटील यांनी…