साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथून जवळ असलेल्या शहापुरा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. त्यात ३८ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात ‘बालविवाह’ नाटिकेत गावात घोड्यावर नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. बालविवाह दाखवून पोलिसांनी कशाप्रकारे नवरदेव, नवरी या सर्वांना अटक केलेले दाखविले. विविध नाटिका, देशभक्तीपर गीते, अंधश्रद्धापर नाटिका, भक्ती गीते अशा विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी शहापुरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्हसासचे सरपंच तथा शहापुराचे सरपंच योगेश राजपूत, उपसरपंच सुनील राजपूत, ईश्वर परदेशी, विनोद परदेशी, राजूभाऊ…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथे इयत्ता पहिली, चवथी आणि सातवीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या चोपडा टॅलेंट हंट स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. तब्बल १ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेल्या परीक्षेतील १५० यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले. तसेच उर्वरित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले, कवी विलास पाटील, पवन लाठी, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एस. सोनवणे, पी.व्ही.एम.इंग्लिश मीडियम स्कुलचे प्राचार्य रजिश, पत्रकार संदीप ओली आदी उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील स्टेट बोर्ड तसेच सीबीएसई माध्यमाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदविला. चोपडा टॅलेंट हंट आयोजन समितीमार्फत परीक्षेसाठी…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तालुका किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे खेळाडू तुषार नानासाहेब चौधरी आणि धीरज संदीप आगोणे यांनी आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक मिळविले आहे. त्यामुळे दोघांची आगामी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. याबद्दल यशस्वी खेळाडुंसह प्रशिक्षक अनिल मंगळकर यांचे कौतुक होत आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे नुकत्याच तिसरी वाको आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत जगभरातील २२ देशातील ८८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात भारताच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक घेऊन अथक परिश्रम करून देशाला पदक मिळवून दिले.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (नॅक) नुकतीच भेट देऊन मूल्यांकन केले. दरम्यान, महाविद्यालयाला देण्यात आलेल्या ग्रेडविषयी माहिती कळविण्यात येणार असल्याचे नॅकच्या सदस्यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांनी मूल्यांकनाचा अहवाल बंद पाकिटात महाविद्यालयाचे प्राचार्य ड़ॉ. पी.पी.चौधरी, स्टिअरिंग समितीचे समन्वयक डॉ.नयना वाणी यांच्याकडे सुपूर्द केला. अमळनेर येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने समितीचे अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा, प्रा. डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.), समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू आदी मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कुल येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत आरोग्य विषयांतर्गत बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात येणारा लठ्ठपणा, त्याची कारणे, त्यावरील उपाय यासंबंधी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा जनरल फिजिशियन डॉ. जयवंतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. मधुमेह आणि डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायावर नेत्र विकार तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आरोग्य समस्या आणि त्यावरील उपाय समस्यांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी आरोग्य विषयावर डॉक्टरांनी सांगितलेले उपाय विद्यार्थी योग्यपणे करतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली…
साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर येथील रेल्वे सल्लागार समितीने अमळनेर रेल्वे स्टेशन येथे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोककुमार मिश्रा आणि मुंबई सेंट्रलचे मॅनेजर यांना नीरज वर्मा यांना पाळधी रेल्वे स्टेशनला काही गाड्या थांबण्याबाबत निवेदन देवून सकारात्मक चर्चा केली. निवेदन देतेवेळी संदेश झंवर, प्रदीप जैन, महेंद्र चौधरी, योगेश पाटील, अधिकार पाटील, कैलास पाटील, मनोहर लंके आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पाळधी स्टेशन परिसरात पस्तीस ते चाळीस खेडे लागून आहेत. या गावातील जनता रेल्वे प्रवास मोठ्या प्रमाणात करतात. अमरावती, शेगाव, मुंबई, सुरत, उधना, येथील प्रवासी आहे. कारण कामानिमित्त पाळधी परिसरातील जनता मुंबई, सुरत रोजगारासाठी गेली आहेत. अनेक वर्षापासून सुरत…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मोताळा प्रेस टाइम्स आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोताळा येथे निदर्शने करून निषेध नोंदविला आहे. यावेळी तहसिलदारांमार्फत राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. मोताळा प्रेस टाइम्स तसेच फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा जोपासणारे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दंडांवर काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी मोताळा बस स्थानक चौकात निदर्शने करण्यात आली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदनावर मोताळा प्रेस टाइम्सचे अध्यक्ष सँडी मेढे, काँग्रेसचे नेते गजानन मामलकर, ‘समतेचे निळे वादळ’ मोताळाचे तालुकाध्यक्ष अरुण डोंगरे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा अंतर्गत ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. युवती सभेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ.पायल पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून महिलांनी आपले विचार, भावना, वागणूक यांची सांगड घातली पाहिजे. तसेच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच प्रश्नोत्तरामार्फत विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अजय काटे यांनी सध्याच्या धावत्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही जपले पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी गेल्या २५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आयशर वाहनातून दहा गोमातांसह त्यांच्या दहा वासरांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे कोंबून एरंडोल येथील कासोदा नाकामार्गे हैद्राबाद येथे घेवून जाण्यात येत होते. त्यावेळी वि.हिं.प.चे धरणगाव तालुकाध्यक्ष श्रीपाद शंभूप्रसाद पांडे हे बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष आकर्ष विरेंद्रकुमार तिवारी आणि भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष ॲड.संजय छगन महाजन यांच्यासह एरंडोल येथे गेले होते. त्याठिकाणी ॲड.अजिंक्य आल्हाद काळे, ॲड.निरज अतुलकुमार जगताप, ॲड.चंद्रकांत सुरेश पारखे आणि एरंडोल येथील असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी श्रीपाद शंभूप्रसाद पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दहा गोमातांसह त्यांच्या दहा वासरांना संगोपनासाठी धरणगाव येथील…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी पाचोऱ्यात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या आहेत. त्याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी बुधवारी, १४ फेब्रुवारी रोजी भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. भडगाव येथे युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरूवारी, १५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. त्याच्या नियोजनासाठी वैशाली सूर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील…