Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गडखांब येथील आश्रमशाळेचे उपशिक्षक चेतन किसन जाधव यांना पुणे येथे विद्यार्थी महादिक्षांत समारंभात वनस्पती शास्र विशारद पदवी बहाल करून सन्मान करण्यात आला. नाशिक येथील वनस्पती विद्या मिशन संचलित सागर अहिरे यांच्या मार्गदर्शनाने वनस्पतीशास्त्र व वैदिक वास्तुविशारद यामध्ये पदवी प्राप्त वनस्पती व त्यांचे आपल्या जीवनातील विशेष महत्त्व याविषयी परिपूर्ण अशी माहिती प्राप्त करून देण्यात आली. प्रशिक्षणात ज्यांनी यश प्राप्त केले त्यांना यात पदवी बहाल करण्यात आली. हा विद्यार्थी महादिक्षांत समारंभ पुणे येथे आयोजित केला होता. समारंभाला महाराष्ट्र व भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्र व वैदिक वास्तु विशारद यामध्ये पदवी प्राप्त करून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सागर अहिरे यांच्या…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर शहरात पूर्वी झालेल्या चोऱ्यांमध्ये सावदा-फैजपूर रस्त्यावरील न्यू पंजाब हॉटेलमधून सुमारे ६३ हजार, जाकीर कुरैशी यांच्या घरातून ७ लाख, शरद भारंबे, देवीदास तायडे, भागवत कासार, अक्रम खान, बासीद खाटीक यांच्या घरी झालेल्या चोऱ्या, सोनाली कोल्ड्रिंकसह परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतातून शेतीपयोगी मौल्यवान साहित्य चोरीस गेल्या बाबतच्या नोंदी सावदा पोलीस ठाण्यात आहेत. अशा चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा तपास शून्य आहे. दुसरीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. सावदा येथील सोमेश्‍वर नगरमध्ये सात दिवसांपूर्वी धनराज रंगु पाटील यांच्या घरी ७० हजारांच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केले. त्याच ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर व…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी बहुभाषिक ब्राह्मण समाज व भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे ५ मे रोजी कृष्णा क्लिनिक येथे भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रथमच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रक्तदान शिबिरात प्रत्येकाला रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. शिबिरास समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ७५ युनिट रक्त संकलन झाले. विशेष म्हणजे शिबिरात महिलांनीही रक्तदानासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. रक्त संकलनासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तकेंद्राचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते. भर उन्हाळ्यात रक्तासाठी रुग्णांकडून मोठी मागणी होते. त्यात बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे तब्बल ७५ युनिट संकलन होणे म्हणजे एक प्रकारे ही रुग्णांना संजीवनी देणारे काम बहुभाषिक ब्राह्मण…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील कोळी वाड्यातून चोरट्यांनी रात्री ट्रॅक्टर लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. येथील कोळी वाड्यातील रहिवासी अनिल शालिक सपकाळे यांनी घराबाहेर लावलेले निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र. एमएच २० एवाय ७०२७) स्वराज ७३५ कंपनीचे ट्रॅक्टर अंदाजे किंमत एक लाख पन्नास हजार रुपयांचे चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना त्यांना सकाळी कळताच त्यांनी सगळीकडे ट्रॅक्टरचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पाळधी पोलिसात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. त्यांनीही शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. पुढील तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल पाटील करीत…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे झालेल्या २६/११ आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबच्या हल्ल्यात शहीद झाले नसून पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे बेताल वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. या वक्तव्याचा भुसावळ तालुका शिवसेनेच्यावतीने मंगळवारी, ७ मे रोजी शहरातील गांधी पुतळा भागात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे वडेट्टीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला. वडेट्टीवार यांनी त्यांचे विधान मागे घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी, महिला जिल्हा संघटीका नंदा निकम, शहरप्रमुख पवन नाले, सामाजिक कार्यकर्ते…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील जुने गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ एप्रिल ते ६ मे या कालखंडामध्ये सामूहिक श्री गुरूचरित्र पारायण व अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने झाला. केंद्रात २४ तास साखळी पद्धतीने दोन सेवेकरी वीणा वादन, दोन सेवेकरी स्वामी चरित्र वाचन, दोन सेवेकरी श्री स्वामी समर्थ जप माळ, सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत महिला सेवेकरी, सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत पुरुष सेवेकऱ्यांनी सेवा रुजू केली. सात दिवसात रोज नित्य स्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग झाला. सप्ताहाची…

Read More

साईमत, पहुर, ता.जामनेर : प्रतिनिधी येथून जवळील पाळधी येथील रहिवासी धनराज शेनफडू बाविस्कर (वय ३६) हे सुप्रीम कंपनीत कामाला होते. ते काम संपल्यावर घरी येताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला. मयत मित्राच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी २००० मधील दहावीच्या बॅचचे वर्गमित्र सरसावले आहे. त्यांनी सर्वांनी एकत्र येत २१ हजाराची मदत केली आहे. त्यामुळे दिल…दोस्ती… दुनियादारीचा… सर्वांना प्रत्यय आला आहे. मैत्री म्हणजे सुखात समोरच्याला हात देणे, मैत्री म्हणजे दुःखात समोरच्याचा हात होणं तसेच ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ अशी पंक्ती याठिकाणी तंतोतंत लागू पडली. अन्‌ हे मित्रत्व पाहून अनेकांनी मैत्रीला सलाम केला आहे. तसेच मित्राच्या दुःखात सहभागी होऊन वर्गमित्रांनी मैत्री…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कुलमध्ये मानव विकास कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत गरजू, पात्र लाभार्थी मुलींना सायकलीचे नुकतेच वाटप करण्यात आले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कोमल संजय जाधव, कांचन संजय जाधव, निशा दिलीप जाधव, उज्ज्वला रोहीदास पावरा, भारती बन्सिलाल पावरा या पात्र मुलींना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी, अरविंद सोनटक्के, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांच्या उपस्थितीत सायकलींचे वाटप करण्यात आले.

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी मतदान हा मतदारांचा हक्क आहे. परंतु अनेकांकडून मतदान करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. तेव्हा मतदारांना मतदानाविषयी जागृत करीत त्यांना आपल्या हक्काची जाणिव करून देण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त कर्मचारी हरीदास गणबास सायकलवर ‘छोडो अपने सारे काम, पहले करे मतदान’ असे पोष्टर लावून मतदार जागृती करीत आहेत. मतदानाकडे अनेकांकडून दुर्लक्ष केले जाते. कंटाळा केला जातो किंवा जाणून-बुजून मतदानाच्या अधिकाराला दुर्लक्षित ठेवले जाते. परंतु मतदान हा आपला हक्क आहे आणि प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव व्हावी व मतदान करून आपला हक्क बजवावा, यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी हरीदास गणबास हे सायकलवर फिरून मतदार जागृती करीत आहेत.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळी येथील आगग्रस्त कुटुंबाला नर्मदा मेडिकल फाउंडेशन डॉ.अनिल शिंदे यांच्यातर्फे आर्थिक रोख रकमेची मदत करून दिलासा दिला आहे. पिंपळी येथील दिलीप नामदेव पाटील यांच्या घराला २४ मार्च रोजी सायंकाळी अचानक आग लागली होती. सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले होते. घरातील कर्ता पुरुष दिलीप पाटील यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. आग लागताच दिलीप पाटील यांनी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि नात याना वाचविण्यासाठी घराबाहेर ढकलले होते. मात्र, त्यांना घराबाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. काही क्षणातच घरातील संपूर्ण कपडे, रोख रक्कम, गृहोपयोगी वस्तू, किराणा दुकानातील माल, अन्न धान्य तसेच मुलगा प्रीतम…

Read More