Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी हिंदू समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्‍मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या षडयंत्राला उद्धव ठाकरे यांचीही मान्यता आहे, असा हल्लाबोल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केला. ते चाळीसगाव येथे महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हा…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी हापूस आंब्याचा हंगाम सध्या जोमात आहे. अक्षय तृतीयेला आंब्याचे मोठे महत्त्व असते. आंब्याचे या सणापासून प्राधान्याने महत्त्व वाढत जाते. मागीलवर्षी हवामानाच्या संकटामुळे आंब्याची आवक तुलनेने कमी होती. यंदाचे चित्र मात्र समाधानकारक आहे. शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय तृतीया असल्याने त्यानिमित्त पाचोरा शहरात आंब्याच्या विक्रीसाठी बाजारपेठ फुलली आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणापासून आंब्याला मागणी वाढत जाते. पाचोरा शहरात आंब्याचा प्रचंड बाजार फुललेला दिसत आहे. पाचोरा शहरात रत्नागिरी, देवगड, कोकण व परराज्यातून आंब्याची मोठी आवक झालेली आहे. पाचोरा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आंबा खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. हापूस आंब्याचे दर टप्प्याटप्प्याने २०० ते १५० रुपयांपासून…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी जनता आणि मतदारांचा विश्‍वास हीच माझी प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आहे. जनतेच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रचार दौऱ्यात जनतेने आणि मतदारांनी ज्या-ज्या समस्या मांडल्या, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ, असे आश्‍वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी तालुक्यातील निंभोरा येथे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना दिले. तसेच येथील रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला दादर-अमृतसर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी निंभोरा रेल्वेस्थानक परिसर आणि निंभोरा गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने आमदार…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी कोण टीका करणार आहे, कोण चुका करणार आहे त्यांना परमेश्‍वर बघेल… ‘आधली भरलेली आहे त्याला शिगरी लावा’ आ.चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्र्यांचे विनंती वजा आदेश दिलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप मिळाल्याने गुरुवारी, ९ मे रोजी सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बाहेर निघा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. रावेर लोकसभा मतदारसंघात खा.रक्षाताई खडसे महायुतीच्या उमेदवार असताना शिवसेनेच्या विशेषता शिंदे गटाच्या आ.चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभाग घेण्यात यावा, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अचानक मुक्ताईनगरचा सकाळी…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथुन जवळील घिर्णी येथे नवीन विहाराची निर्मिती करुन बुद्ध विहारात बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त धम्मोत्सवाचे आयोजन घिर्णी येथील सर्व उपासकांनी केले होते. यासाठी शांताराम इंगळे, उत्तम इंगळे (फौजी) यांचे प्रमुख योगदान होते. बुद्ध मूर्तीचे दान उपासक उत्तम इंगळे तर बाबासाहेबांच्या मूर्तीचे दान एन.डी. इंगळे यांनी केले. कार्यक्रमात १४ भंतेजी उपस्थित होते. यावेळी भदंत सुगतवंस महाथेरो श्रीलंका, भदंत ज्ञानदिप महाथेरो, भदंत विनयपाल महाथेरो, भदंत धम्मसरण महाथेरो, भिक्खु यश श्रीलंका, भंते उपतिस्स मिझोरम आदी भंते लोकांनी उपस्थितांना प्रवचनातून धम्म विषयावर प्रबोधन केले. यावेळी सर्व भंतेजींना चीवर दान, अन्य यथोचित दान देण्यात आले.…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी जळगावला कालच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा नाही. समाजाचा व दलिताचा विकास नाही. बेरोजगार व महागाईचा मुद्दा नाही. समाजाची गरिबांची गरिबी कशी दूर होईल, त्याचा मुद्दा नाही. त्यांनी अर्ध भाषण मोदीजींना आणि महायुतीला शिव्या देण्यातच केले. अरे या नरेंद्र मोदीजींच्या समोर नेता नाही, निती नाही, नियत नाही अशा लोकांना काय निवडून देणार भाजपाला. ४ जूननंतर बिळातून काढून मारू. अरे, अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. तेव्हा उद्धव ठाकरे बिळ्यात लपले होते आणि आज बाहेर काढू म्हणता, वाघांना हात लावण्याची हिंमत आहे का? असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कधी कधी बोलताना सत्य तोंडात येते आणि ते…

Read More

साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप युतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी पहूर येथे मतदारांशी संवाद साधला. सायंकाळी पाच वाजता बस स्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रचार फेरीला सुरुवात झाली. पहूर पेठ, पहूर कसबे गावातून भाजपा कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीत सहभाग नोंदविला. त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गावात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. नुकतेच भाजपवासी झालेले माजी कृषी सभापती प्रदीप लोढा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी छाया लोढा, उज्ज्वला लोढा, प्राची लोढा, प्रांजल लोढा यांनी त्यांचे स्वागत केले. प्रचार फेरीत राजधर पांढरे, राजू पाटील, अरुण घोलप, बाबुराव घोंगडे, शंकर जाधव, रामेश्‍वर पाटील, श्‍याम सावळे, वासुदेव…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी माणसाने आयुष्यात नियमित व्यायाम केला पाहिजे. ताणतणावमुक्त जीवन जगल्यास माणसाला कोणत्याही प्रकारचे औषध घ्यावे लागणार नाही. तसेच वाढत्या हृदयविकाराच्या त्रासामुळे प्रत्येकाने दरवर्षी जर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्राथमिक तपासण्या केल्यास आपण हृदयविकार टाळू शकतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णास प्राथमिक कशा प्रकारे सीपीआर द्यावा, सीपीआर देण्याचे प्रात्यक्षिक करुन त्याचे महत्व डॉ. सुजित वाघ यांनी सीपीआर मार्गदर्शन शिबिरात सांगितले. जेसीआय चाळीसगाव सिटी आणि भारतीय आयुर्विमा निगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सीपीआर मार्गदर्शन शिबिर ७ मे रोजी चाळीसगाव येथील भडगाव रस्त्यावरील भारतीय आयुर्विमा निगमच्या मिटींग हॉलमध्ये घेण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आयुर्विमा निगम चाळीसगाव शाखेचे शाखाधिकारी संजय मोरे, सीए…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदार संघात जळगाव जिल्ह्यातील पाच व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघांचा समावेश केला आहे. गेल्या १० वर्षापासून भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे ह्या विद्यमान खासदार आहेत. नक्कीच यामुळे मतदार संघात भाजपचे पारडे जड मानले जात आहे. लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे शिरीष चौधरी हे एकमेव विधानसभेचे आमदार आहेत. राज्यात तुलनेने मोठा असलेला हा मतदासंघ असून महायुतीकडे ग्रामपंचायतपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे रावेर मतदार संघावर कायमच भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात यंदाच्या निवडणुकीत काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ‘तुतारी’ की ‘कमळ’ कोण…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिक घेतली आहे. त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर येथे निदर्शने आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उप तालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट, संतोष मराठे, योगेश मुळक, संतोष माळी, प्रवीण चौधरी, गणेश पाटील,…

Read More