Author: Sharad Bhalerao

साईमत, जामनेर ः प्रतिनिधी शहरातील जळगाव रस्त्यावरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेले प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यांचा मृतदेह जळगाव येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. सीआरपीएफमध्ये प्रकाश कापडे हे कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून झालेली होती. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्याकडे अंगरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. प्रकाश कापडे हे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जामनेर येथे काही दिवसांची सुट्टी घेऊन आले असल्याची माहिती मिळाली. ते आपल्या कुटुंबासह शेगाव येथे दर्शनास जाऊन आल्याचीही माहिती मिळाली…

Read More

साईमत, धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर मी तुम्हाला काय सांगू मायबाप हो… गोठ्यात ‘गाय’ आणि घरात ‘माय’ नसली तर घराला घरपण येत नाही. यासाठी सर्वांनी आपल्या गोठ्यात गाय आणा व जे काही महाभाग असतील की, ते आपल्या आईला सांभाळत नसेल त्यांनी आपल्या आईला घरी आणा व घराला खरे घरपण मिळवून द्या. तसेच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे अनेक उदाहरणे देऊन गायही आपली मायच आहे. माय-बापहो थोड्याफार पैशासाठी गायीला कत्तलखान्यात विकू नका जर तुमच्याने त्या गायीचा सांभाळ होत नसेल तर आपल्या तालुक्यातील गौशाळेत घेऊन जा, असे आवाहनही बालकिर्तनकार ह.भ.प. दुर्गेश महाराज यांनी…

Read More

साईमत, भुसावळ – प्रतिनिधी सीबीएससी बोर्डमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडिअम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीत प्रथम नमामि लक्ष्मण प्रजापती ९५ टक्के तसेच एसएसटी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. शुभीका स्वर्णकार ९४ टक्के, हितेन सुरंगे ९३ टक्के, हमीद आसिफ इक्बाल शेख ९२ टक्के, अशितोष सुरेश चावराई ९१.४० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील डॉ. वैभव पाटील व मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी कौतुक केले. बारावीच्या निकालातही नेत्रदिपक कामगिरी भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कुलच्या बारावीच्या निकालातही विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक कामगिरी…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कुल माध्यमिक शालांत परीक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान विभागातून तुषार हेमंत देशमुख ९२.४० टक्के, श्रीपाद नारद ९०.८० टक्के, रोशनी कुकरेजा ८९.२० टक्के, वाणिज्य विभागातून प्रथमेश लोहार ८०.२० टक्के गुण प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांचे गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील आणि शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. दहावीच्या निकालात मुली अव्वल सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या निकालात विद्यार्थिनीच अव्वल ठरल्या आहेत. सर्व विद्यार्थिनींनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खान्देशातील कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.आय.जी.गायकवाड यांनी केले. ते धनाजी नाना चौधरी यांच्या जे १३३ व्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त करतांना बोलत होते. कार्यक्रमाला तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी, चेअरमन लिलाधरशेठ चौधरी, सचिव एम. टी. फिरके, सहसचिव एन. ए. भंगाळे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. जगदीश पाटील, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. पी. डी. पाटील, उप प्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव आणि महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सण- उत्सव समितीचे चेअरमन डॉ.मारोती…

Read More

साईमत, चाळीसगाव ः प्रतिनिधी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ मे रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेनेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला होता. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला रा.वि.चे शिक्षक आर.बी.जगताप यांनी माल्यार्पण केले तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी पूजन केले. कार्यक्रमास रयत सेना संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समनव्यक पी.एन.पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, शहराध्यक्ष छोटु अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, सुनील पवार, प्रकाश…

Read More

साईमत, चोपडा ः प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुलच्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव करण्यात आला. पूर्वी पवन अग्रवाल ही विद्यार्थिनी ९४ टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम आली आहे. दिव्य हितेश जैन (९१.६०), राजवीर प्रशांत पाटील (९१.२०), स्पंदन उत्तम सोनकांबळे (९०.४०), सेजल अजय कासट (८७.४०), रोहित किशोर मराठे (८७), प्रियांशू खंडेराव पाटील (८६.४), मोहित भागवत पाटील (८६.४), मनीष भिकन शिरसाठ (८६.२), अक्षय संदीप पाटील (८४.८), देवांशू मनोज पाटील (८३.८), मंदाश्री चंद्रकांत पाटील (८२.८), हर्षदा प्रवीण बोरसे (८०.४) आणि रिद्धिमा विजय सोनवणे (८०.२) आदी विद्यार्थी व त्यांच्या…

Read More

साईमत, अडावद, ता.चोपडा ः वार्ताहर मोहंमद शफी शेख बाबू वडाला, मुंबई यांच्यावतीने त्यांच्या धर्मपत्नी स्व. ‘बहार यजदानी’ यांच्या स्मरणार्थ अडावद येथील मदरसा काफियतुल उलूम याठिकाणी ११ मे रोजी मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्यात आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील ११ जोडप्यांचा ‘शुभमंगल’ पार पडला. सोहळ्यात जवळपास तीन हजारपर्यंत समाजबांधवांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली. मोहम्मद शफी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात सर्व जोडप्यांना प्लंग, गादी, गोदरेज कपाट तसेच जवळपास सर्वच संसारोपयोगी साहित्य, नवदाम्पत्यांचा प्रत्येकी दोन, दोनशे पाहुण्यांना बऱ्हाणपूरी दाळभाताची मेजवानी देण्यात आली.विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मोहंमद शफी शेख यांच्या मित्रपरिवारातील सदस्यांनी तसेच गावातील तरुणांनी शिस्तबद्ध यंत्रणा उभारली होती. वधुरांच्या…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी, १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रावेर लोकसभा मतदार संघातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघनिहाय मतदान साहित्य, ईव्हीएम मशीनचे वाटप रविवारी, १२ रोजी मुक्ताईनगर शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालय येथे करण्यात आले. दुपारनंतर मतदान कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना झाले. १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात १ हजार ९०४ मतदान केंद्र आहेत. यामध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात ३२२ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी…

Read More

साईमत, जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगावच्या राजकीय क्षितीजावर अनेक वर्षे ज्यांनी अधिराज्य गाजवले, राजकीय पक्षाच्या वलयापेक्षा ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर करारी, धडाडी, भरारी अशी भूषणे मिळवत समाजात दबदबा निर्माण केला. त्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या गेल्या आठवड्याभरातील डळमळीत राजकीय भूमिकेबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्तीची भूमिका घेतली असतांना दोन दिवसातच असा काय साक्षात्कार झाला की, त्यांनी प्रचाराच्या तोफा थंडावत असतांनाच जळगाव जिल्ह्यातील दोन्ही भाजपा उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका अचानक जाहीर करुन पुन्हा राजकारणात प्रवेश केला. याबाबत त्यांच्या हजारो चाहत्यांमध्ये आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सुरेशदादा जैन हे १९८० पासून जळगावच्या राजकारणात सक्रीय झाले. प्रारंभीच्या…

Read More