सर्पमित्राने सापाला जीवदान देऊन नैसर्गिक अधिवासात सोडले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील कुसुंबा परिसरात पुन्हा एकदा दुर्मीळ भारतीय अंडी खाणाऱ्या सापाचा शोध लागल्याने स्थानिकांमध्ये उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही पसरली होती. हा दुर्मीळ प्रजातीचा साप सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडल्याबद्दल सर्पप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांनी कौतुक केले आहे. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील स्टेट बँकेच्या मागील भागातील एका रहिवाशाच्या घरात रात्री घरात साप आढल्याची माहिती सर्पमित्र मंदार वाढे यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कुशलतेने सापाला पकडून कोणतीही हानी न करता नैसर्गिक अधिवासात सोडले. हा साप भारतीय “एग ईटर” म्हणून ओळखला जातो. तो विषारी नसून माणसाला धोका पोहोचवत नाही. परंतु त्याच्या दुर्मीळतेमुळे…
Author: Sharad Bhalerao
मनपाच्या फंडातून उभे राहिले १५ विद्युत पोल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनी नगर ते सावखेडा मेन रस्त्यावर पथदिवे नसल्याने महिलांना आणि नागरिकांना रात्री पायदळ येताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पिंप्राळ्याकडून येताना रस्त्यावर अंधारामुळे अपघातांचा धोका निर्माण होत होता. पावसाळ्यात जवळच्या मोठ्या नाल्यामुळे दुचाकीस्वारांसह काही नागरिक जखमी झाले होते. अशातच आता सोनी नगर ते सावखेडा रस्ता ‘प्रकाशमय’ झाला आहे. मनपाच्या फंडातून १५ विद्युत पोल उभे केले आहेत. यासंदर्भात स्थानिकांनी अनेकवेळा महावितरण आणि मनपा प्रशासनाकडे निवेदन दिले होते. पण दुर्लक्ष होत असल्याने वर्तमानपत्रात याबाबत बातम्या छापल्या होत्या. त्याची दखल घेत मनपाने आपला निधी वापरून रस्ता प्रकाशयोजनेवर कार्यवाही केली. विद्युत…
एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की, कोणाच्या आधाराविना विविध कारणांमुळे सिंगल म्हणजे ‘एकल’ जीवन जगत आहेत. त्यात अनेक स्त्री-पुरुष, युवक-युवतींचा समावेश आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरोग्य, स्वतःचे हक्काचे घर, रोजगार, सुरक्षितता, आपुलकीचा वर्ग, दरमहा शासनाकडून वेतन मिळावे, अशा अनेक विषयांवर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी विविध कार्पोरेट कंपनी, विविध समाजसेवी संस्था, सोशल वर्कर्स, देणगीदार, अभ्यासक आदी लोकांनी अशा लोकांना समजून घेऊन सहकार्य करणे काळाची गरज आहे. अशा एकल, अविवाहित (एज बार झालेले) व्यक्तींना शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबवाव्यात. तसेच कोणताही…
मनपा पातळीवरील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेम नगरातील बी. यू. एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा केवळ स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक प्रगतीकडेच भर दिला जात नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच महत्त्व दिले जाते. शाळेत विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले जाते. खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ, फुटबॉल आदी खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मनपा पातळीवर झालेल्या स्पर्धांमध्ये काही विद्यार्थ्यांनी उत्तम प्राविण्य मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी शाळेत शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी विजेत्या…
पथसंंचलन करुन शासनाच्या निष्क्रियतेचा नोंदविला जाहीर निषेध साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मोहाडी परिसरातील नव्याने उभारलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा गंभीर दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “मोबाईल लाईट आंदोलन” करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईलचा प्रकाश प्रज्ज्वलित करून पथसंंचलन करुन शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध नोंदवला. पथदिवे नसल्याने रुग्णालयाच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. हे शासनाच्या विकासाच्या घोषणांना काळा फटका आहे, असा तीव्र रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेले हे शासकीय रुग्णालय १०० खाटांचे आहे. प्रसूती विभागही येथे कार्यरत आहे.…
अध्यक्षपदी ॲड. कृतिका आफ्रे, कोषाध्यक्षपदी सरला पाटील साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चा जिल्हा कार्यकारिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वात प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटन मंत्री रवि अनासपुरे, खा.श्रीमती स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे, आ मंगेश चव्हाण, आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मान्यतेनुसार जिल्हाध्यक्षा अॅड. कृतिका जगदीश आफ्रे यांनी भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली. नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी ॲड. कृतिका जगदीश आफ्रे (पारोळा), सरचिटणीस नूतन पांडुरंग पाटील(भडगाव), साधना रवींद्र देशमुख (पिंपळगाव हरे.),…
सुशिक्षित बेरोजगारांचा सवाल साईमत/जळगाव/ विशेष प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २२० जागांच्या नोकर भरतीला राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतरही भरती प्रक्रिया विलंब का होत आहे…? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांमधून उपस्थित होत आहे. भरती प्रक्रिया कशी व कोणत्या नामांकित कंपनीमार्फत राबवावी, हे शासनाने निर्देशित केलेले आहे. शासन स्तरावरून सर्व बाबी अनुकूल आणि स्पष्ट असताना भरती प्रक्रिया ही हकनाक प्रलंबित करण्याचे काहीही कारण नाही, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे. नोकर भरतीची प्रक्रिया कशी पूर्ण करावी, ही बाब जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ किंवा प्रशासनाला नवीन नाही. कारण साधारणपणे पाच वर्षांपूर्वी २०० पेक्षा जास्त पदांची नोकर भरती बँकेने यशस्वी आणि निर्विवादपणे पार पाडली…
३० हजार सिंधी बांधवांकडून सेवा, विविध संतांचे भजन-कीर्तनाने धार्मिक वातावरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अखंड पाठ साहेब आणि अखंड रामायण वाचनाचे भोग साहेब (समाप्ती) कार्यक्रम वर्सी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला. यासाठी देशभरातून भाविक आले होते तर शहरातील संपूर्ण सिंधी बांधवांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे ३० हजार बांधवांनी व्यवसाय बंद करून सेवा केली, त्यात पुरुषांसह महिलांसाठी स्वतंत्र भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या भाविकांनी अतिशय आनंद व्यक्त केला. पूज्य सेवा मंडळाची नवीन वास्तू पाहून आनंदात भर पडली. कार्यक्रमाला मंत्री गिरीष महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भवरलाल जैन यांचे सुपुत्र…
जामनेरातील चैतन्य धामात कन्या पूजनात ३५० कन्यांचा सन्मान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : मुलींनी दुर्बल न राहता सबल बनावे. स्वतःचे रक्षण स्वतः करावे. आजच्या काळात मुलींनी ‘पराटे’ सोबत ‘कराटे’ आणि ‘बाटी’ सोबत ‘लाठी’ शिकणे आवश्यक असल्याचे प्रभावी मार्गदर्शन प.पू.श्याम चैतन्य महाराज यांनी केले. हिंदू संस्कृतीत नारी पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमीला कन्या पूजन कार्यक्रम पारंपरिक स्वरूपात आयोजित केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर, रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे परिसरातील ३५० कन्यांचा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात कन्यांचे पाय स्वच्छ करून पुसून, पूजन केले गेले. त्यानंतर भोजन व दक्षिणा देण्यात आली. यावेळी अनेक कन्या आणि महिलांनी…
आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरच्या उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिसाद : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन कमी करणे आणि शरीर-मन तंदुरुस्त ठेवणे या उद्देशाने आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरतर्फे सोनी नगरात मोफत योगा वर्गाचे उद्घाटन रविवारी सकाळी ६.३० वाजता केले. कार्यक्रमात जागतिक आरोग्य सल्लागार आदिनाथ खेडकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योगामुळे लवचिकता वाढते, ताण कमी होतो, झोप सुधारते आणि एकाग्रता वाढते. नियमित योग केल्याने शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक संतुलन आणि मानसिक स्पष्टता येते. त्यामुळे एकंदरीत आरोग्य सुधारते, असे जागतिक आरोग्य सल्लागार रेणुका खेडकर यांनी महिलांना प्रशिक्षण देतांना सांगितले.योगा वर्गाचे उद्घाटन होताच पहिल्याच दिवशी ३० महिलांनी सहभाग घेतला. हा वर्ग पहाटे ५.३० ते ६.३०…