Author: Sharad Bhalerao

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होणार अशी चर्चा असतांना ही निवडणूक भाजपाने एकतर्फी जिंकत मोठे मताधिक्य राखले आहे. या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षाताई खडसे यांनी हॅट्रिक साधून भाजपाच्या विजयाची परंपरा कायम राखली आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दणदणीत विजयी मिळवित जळगाव लोकसभा मतदार संघातून पहिल्या महिला खासदार होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. पहिल्या फेरीपासून महायुतीचे दोनही उमेदवार हे आघाडीवर होते. लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असतांना विरोधात असलेलेल महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करत मतमोजणी थांबविण्यात…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शहरातील जैन गल्लीच्या भागातील दोन ते तीन नळ कनेक्शनला वेगाने पाणी न आल्याच्या मुद्द्यावरून पूर्ण गावात पाणीटंचाई असून नवीन पाईप लाईन फेल असल्याचा खोटा आरोप करून उबाठा गटाने आपल्या बौद्धिक टंचाईचे दर्शन घडवित पालिकेत गोंधळ घातल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, संपूर्ण शहरात नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झालेले आहे. शहरात पाणी वितरणाचे चार झोन तयार केले आहे. सर्व चार झोनमध्ये साधारण ५ हजाराहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहे. चौथ्या झोनमधील साधारण ३५ ते ४० टक्क्याची कमिशिंग अर्थात पाणी वितरणची टेस्टिंग अपूर्ण आहे.…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी सध्या महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु हा संविधानाच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. असे झाल्यास त्यामुळे नागरिकांमध्ये भय आणि मानवी विषमता निर्माण होईल.तसे होऊ नये याकरिता मनुस्मृतीसारख्या विषमतावादी विचारांचा व धोरणांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येऊ नये, अन्यथा संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुक्ताईनगरतर्फे दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार डॉ.निकेतन वाळे यांना तसेच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीच्या…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी जळगाव पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे विभागात कालवा परिसरातील झाडे बेकायदा अत्याधुनिक मशिनरीने तोडल्याची तक्रार प्राप्त झाल्याने तसेच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यावल पूर्व वन विभागाचे वन क्षेत्रपाल स्वप्निल फटांगरे यांनी जळगाव पाटबंधारे विभागातील यावलचे जे.ई. यांना ३५ हजार रुपयांचा, यांत्रिकी विभागातील मेकॅनिकल जे.ई.यांना १५ रुपयाचा आणि दोन्ही ऑपरेटर यांना प्रत्येकी २ हजार ४०० रुपयाचा असा ५४ हजार ८०० रुपयाचा दंड ठोकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वृत्तास यावल पूर्व वन विभागातून दुजोरा मिळाला आहे. वनविभागाच्या कारवाईमुळे मात्र संपूर्ण तापी पाटबंधारे विभागात तथा जळगाव पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली असली तरी यात खरे…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील खामखेडा पुलावर एक मोठा पूल आहे. या पुलावरून नेहमी आत्महत्या होत असतात. त्यांना कुठेतरी आळा बसावा, म्हणून आ.चंद्रकांत पाटील यांनी नगरविकास विभागातून येथे जाळी बसविण्याचे काम केले. त्यामुळे सोमवारी, ३ जून रोजी या पुलावरील एक आत्महत्या रोखण्यास खामखेडा येथील शिवसैनिकांना यश आले आहे. आमदारांची दूरदृष्टी आणि शिवसैनिकांच्या सतर्कतेने तरुण करीत असलेली आत्महत्येची दुर्घटना टळली आहे. दिनेश तायडे (रा. मलकापूर) हा तरुण उचंदा येथील त्याच्या आत्याकडे आलेला होता. परंतु ३ जून २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अचानक खामखेडा पुलावरील तारांची जाळीवरच चक्क चढून त्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी येथून जात असलेले…

Read More

साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर शहरात गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी नालेसफाई झाली होती. सध्या मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये गाळ व कचऱ्यांचे ढिग साचल्याचे दिसून येते. असे असताना आता जून महिन्याची सुरुवात झाली असून याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. हे खरे असले तरी अद्यापही नगरपालिका हद्दीतील सर्व नाल्यांची साफसफाईची कामे सावदा पालिका प्रशासनातर्फे होतांना दिसून येत नाही. त्यामुळे ही बाब चिंताजनक असून, हा विषय शहरात चर्चिले जात आहे. पावसाच्या पाण्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही, हे मात्र खरे आहे. थेट याकडे दुर्लक्ष करून आधीच विकासाच्या नावाखाली सावदा नगरपालिका हद्दीत असलेल्या नैसर्गिक नाल्यांचे रुपांतर गटारीत झालेले आहे. त्यामुळे नाल्यांची उंची व…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील मूळ मंदिर जुनी कोथळी मंदिरात आदिशक्ती श्री संत मुक्ताईचा ७२७ वा अंतर्धान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी, ३ जून रोजी भागवत एकादशीच्या दिवशी मुक्ताईनगर, कोथळी, मेहूण येथील श्री संत मुक्ताई मंदिरात हजारो भाविकांनी मुक्ताईच्या दर्शनाचा लाभ घेतला, असे मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज, ह.भ.प. उद्धव जुनारे महाराज, ह.भ.प. विनायक हरणे, ज्ञानेश्‍वर हरणे यांनी सांगितले. सोहळ्यासाठी पंढरपूरहुन आलेले पंढरीश परमात्मा विठ्ठल पादुका सोहळा पालखी सोहळ्याचे प्रमुख मेघराज वळके पाटील यांनी सोमवारी, ३ जून रोजी भागवत एकादशीच्या मुहूर्तावर पंढरीश…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी कमलेश पंढरीनाथ पाटील यांनी ३० मे रोजी सकाळी आपल्या मोटरसायकलवरून पुणे ते लेह लदाख आणि शियाचीन बेस कॅम्पसाठी प्रवास सुरू केला आहे. हा प्रवास कमलेश यांच्या पूर्ण भारत भ्रमण करण्याच्या स्वप्नाचा दुसरा टप्पा आहे. मागच्यावर्षी त्यांनी दक्षिण भारताचा प्रवास पूर्ण केला होता आणि कन्याकुमारी आणि धनुष्कोडी रामसेतुपर्यंत पोहोचले होते, जे भारताचे दक्षिण टोक आहे. कमलेश यांना ‘बारा घाटचे पाणी पिणे आणि तेच बारा घाटचे पाणी पिण्यास’ (आयुष्याचा खरा अनुभव घेण्यासाठी) अशी खान्देशमधील म्हण आवडते. ते पुण्यात नोकरी करतात आणि वेळ काढून ते आपले भारत भ्रमणाचे स्वप्न पूर्ण करत आहेत. ते त्यांच्या प्रवासाचे…

Read More

साईमत, एरंडोल : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला तरी एरंडोलला नदी-नाले सफाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. जळगावसह राज्यात सर्वत्र नदी-नाले सफाई सुरू आहे. एरंडोलला का नाही? प्रशासक तथा मुख्याधिकारी बदली होवून चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे न.पा.चा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु प्रशासकाअभावी नागरिकांना, प्रशासनाला काय त्रास सहन करावा लागतो त्याचा विचार करणार कोण? नगरपालिकेत अथवा तहसीलदार कार्यालयात कोणत्याही कामासाठी नागरिक गेल्यावर लोकसभा निवडणुकीचे निमित्त सांगून नागरिकांची वाट लावली जाते.आता मतदान १३ मे रोजी संपले असले तरी ४ जून मतमोजणीचे निमित्त सांगितले जाते, यास म्हणावे तरी काय? असाही सूर…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची नुकतीच अमळनेर येथे भेट घेतली. भेटीत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, म्हणून मागणी केली.त्यानंतर ना.अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडून भरीव मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. यावल तालुक्यातील आंबापाणी येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर गेल्या २४ मे २०२४ रोजी वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्याकडे कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी, म्हणून यावल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. त्या मागणीला प्रतिसाद देत तत्काळ…

Read More