Author: Sharad Bhalerao

उमेदवारांच्या चाचपणीला प्रतिसाद, १९ वार्डांत उमेदवार देणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरपालिकेच्या रणसज्जतेला जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या उमेदवार चाचपणी बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ही बैठक आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व १९ प्रभागांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मनसेच्या जळगाव शहर शाखेतर्फे घेण्यात आली. ही बैठक पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी शहरातील पद्मालय विश्रामृहात पार पडली. बैठकीचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केले. जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलचा जनतेचा विश्वास वाढत आहे. शहरातील अनेक प्रभागातील नागरिक आणि अन्य पक्षांचे संभाव्य…

Read More

मागण्यांचा विचार न केल्यास जिल्ह्याभरातील सभासद तीव्र जनआंदोलन छेडणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील विविध नियमबाह्य आणि वादग्रस्त निर्णयांविरोधात सभासदांचा संताप वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्र. ह.दलाल, पी. एस.सोनवणे, शुद्धोधन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेचे अधीक्षक सुनील महाजन यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या विचारात न घेतल्यास जिल्ह्याभरातील सभासदांकडून तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा तुळशीराम सोनवणे यांनी दिला आहे. पतपेढीच्या नवीन इमारतीमधील सभागृहाला “छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” नाव देण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन अधीक्षकांना सादर केले. गेल्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मासिक सभेत आयत्यावेळी मंजूर केलेल्या एका ठरावाविरोधातही आवाज उठवण्यात…

Read More

सामाजिक बांधिलकीची सुंदर अभिव्यक्ती साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील सी.ए. शाखेतर्फे “सेवा हीच खरी साधना” अशा भावनेतून ‘सामूहिक गोसेवा-एक अनुष्ठान’ असा अनोखा सामाजिक उपक्रम नेरीनाका जवळील पांजरापोळ गोशाळेत नुकताच पार पडला. समाजाप्रती संवेदनशील बांधिलकी व्यक्त करत जळगाव सी.ए. शाखेने गोसेवेचा उपक्रम राबविला. ॲड. विजय काबरा यांच्या सान्निध्यात उपस्थित मान्यवरांनी गोमातेला सव्वा मणी खाऊ घालून गोसेवा अर्पण केली. याप्रसंगी ‘गोमाता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष हितेश आगीवाल, कार्यकारी मंडळ सदस्य नचिकेत जाखेटीया, सहकारी सदस्य हितेश जैन, विजय मंत्री, विकास सेठी, सी.सी.एम.सी.ए. अर्पित काबरा उपस्थित होते. याप्रसंगी ॲड. विजय काबरा यांचा जळगाव सी.ए. शाखेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात…

Read More

सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोशणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   आनंदाचा आणि उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट, रोशणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, हे करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोशणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन वीज महावितरणच्यावतीने केले आहे. दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोशणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे आर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी.…

Read More

विद्यार्थ्यांकडून वाचनाचा संकल्प, ग्रंथ प्रदर्शन भरविले साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील सानेगुरुजी कॉलनीतील स्थित कै. सुनिता जगन्नाथ वाणी-भगीरथ इंग्लिश स्कुलमध्ये बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आणि वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापक एस.पी.निकम यांच्या हस्ते पूजनासह माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचन प्रेरणादिनी सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा संकल्प केला. तसेच शाळेत ग्रंथ प्रदर्शन भरविले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, डॉ. अशोक पारधे, आर. डी. कोळी, किरण पाटील, ग्रंथपाल ऋषिकेश जोशी, मयुरी कोळी, चांदणी सूर्यवंशी, मानसी बडगुजर, स्पर्श…

Read More

प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देत रंगला सणाचा उत्सव साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील प्रेमनगरातील बी.यू.एन. रायसोनी स्कुलमध्ये (सी.बी.एस.ई. पॅटर्न) बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या पालक-शिक्षक संघाच्या सदस्या कुमुदीनी पाटील, ज्योती सोनवणे, सुवर्णा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवी, लक्ष्मीमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्ज्वलन करून झाली. इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीतील विविध दिवसांचे वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज यांचे महत्व नाटिकेद्वारे सादर केले. तसेच ‘समुद्रमंथन’ ही कथा नाटिकेच्या माध्यमातून सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. शेवटी पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे…

Read More

चेतना व्यसनमुक्ती केंद्राला हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत, समीक्षा आमटे यांची सदिच्छा भेट ; रुग्णमित्रांशी साधला संवाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  आपण जेव्हा स्वतःशी ‘सेल्फ कमिटमेंट’ करतो, तेव्हाच खरा बदल आपल्या जीवनात घडतो. आपण सर्वांनी ठरवू या की, यंदाच्या दिवाळीत आपल्या परिवाराला व्यसनमुक्त जीवनाची सर्वात सुंदर भेट द्यायची आहे. सर्व रुग्णमित्रांनी स्वतःशी वचनबद्ध राहून परिवारात आनंद निर्माण करण्यासह समाजात परिवर्तन घडवावे, असे आवाहन करुन व्यसनमुक्त जीवनासाठी ‘सेल्फ कमिटमेंट’ सर्वात मोठे औषध ठरेल, असे प्रभावी प्रतिपादन हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे आवाहन केले. लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे आणि समीक्षा आमटे यांनी बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी जळगाव दौऱ्यादरम्यान चेतना व्यसनमुक्ती…

Read More

वाचन : आत्मचिंतन, संवेदनशीलता अन्‌ विवेक जागवण्याचा मार्ग दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.             “ वाचन म्हणजे विचारांची नांगरणी,              ज्ञान म्हणजे प्रगतीची गंगाजळी.              पानापानांत उमटते ज्ञानाची फुले,            वाचताना जागतात अंतरीचे दिवे जुळे. ” आपल्या संस्कृतीत वाचन हा एक पवित्र संस्कार आहे. ज्ञानाचे, विचारांचे आणि संस्कारांचे बीज रोवणारी ही परंपरा आजच्या डिजिटल युगात अधिक जपण्याची गरज आहे. वाचन हे फक्त माहिती मिळवण्याचे साधन नसून ते आत्मचिंतन, संवेदनशीलता आणि विवेक जागवण्याचा मार्ग आहे.…

Read More

फटाक्यांमुळे पर्यावरण, मानव आरोग्य, प्राणी-पक्षी, समाज आणि अर्थव्यवस्था सगळ्यांवरच गंभीर परिणाम दिवाळी सण हा भारतातील सर्वात आनंदाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या सणात प्रत्येकजण आपले घर सजवतो, दिवे लावतो, नवीन कपडे परिधान करतो आणि कुटुंबासह आनंद साजरा करतो. दिवाळी म्हटली की, सर्वांना आठवते ती गोष्ट म्हणजे फटाके. रंगीत प्रकाशात आकाश उजळून निघते, कानठळ्या बसवणारे आवाज संपूर्ण वातावरणात पसरतात आणि क्षणिक उत्साह निर्माण होतो. मात्र, या सणातील ही एक प्रथा अनेक दुष्परिणाम घडवून आणते. फटाक्यांमुळे पर्यावरण, मानव आरोग्य, प्राणी-पक्षी, समाज आणि अर्थव्यवस्था सगळ्यांवरच गंभीर परिणाम होतात. खरं तर सण साजरे करताना आनंदात हरवणं स्वाभाविक आहे. पण त्याच…

Read More

“फटाके फोडणे टाळा प्रदूषणाला घाला आळा” विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात दिवाळीत फटाक्यांनी प्रदूषण होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांकडून म्हणून प्रतिज्ञा घेतली. भगवान नगर, भूषण कॉलनी परिसरातून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी “फटाके फोडणे टाळा प्रदूषणाला घाला आळा” अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे, समन्वयक प्रतिभा खडके, सीमा चौधरी, डॉ.प्रतिभा राणे, स्वाती कोल्हे, संतोष पाटील, विशाल पाटील, राजेश वाणी, दिनेश चौधरी, अजय कुवर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Read More