Author: Sharad Bhalerao

भाविकांचा जनसागर उसळला, संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’ साईमत/शिर्डी/प्रतिनिधी :    येत्या नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी आणि सरत्या २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर पूर्णपणे सज्ज झाले आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा जोडून आलेला सुट्ट्यांचा काळ यामुळे शिर्डीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला असून संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’ झाली आहे. भक्तीच्या या महापुरात भाविकांनी शिर्डीतील रस्ते, चौक आणि गल्लीबोळ गजबजून गेले आहेत. नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २५ डिसेंबर रोजी एकाच दिवसात एक लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे या गर्दीत आणखीनच भर पडली आहे. गर्दी इतकी…

Read More

संभाव्य वेळापत्रक समोर, मोर्चेबांधणीला सुरुवात साईमत/मुंबई/प्रतिनिधी :  येत्या नवीन वर्षात राज्याच्या ग्रामीण राजकारणाचा धुरळा उडणार असून ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून, पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. आरक्षणाच्या तांत्रिक तिढ्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ही निवडणूक दोन टप्प्यात घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केल्या जाणार आहेत. यासाठी ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निवडणूक आयोगातील…

Read More

वाचनासाठी ३०० विद्यार्थी तर चर्चेत ३५ विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय विभागात वीर बाल दिवस, ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन व गट चर्चा असे दोन उपक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थी वाचनासाठी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसाठी ज्ञानस्रोत केंद्राच्यावतीने अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी, प्रा. पवित्रा पाटील, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रशेखर वाणी, विजय आहेर, प्रवीण…

Read More

शिबिरात ६५ स्काऊट, ७० गाईड अशा १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात दोन दिवशीय शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. शिबिरात ६५ स्काऊट व ७० गाईड अशा १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बंडू काळे, सचिव लीलाधर नारखेडे, समन्वयिका प्रतिभा खडके, उद्योजक ज्ञानदेव काळे, जिल्हा स्काऊट ट्रेनिंग आयुक्त रवींद्र कोळी, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे स्काऊट मास्टर किशोर पाटील, मुख्याध्यापक डॉ. विलास नारखेडे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्काऊट गाईड ध्वजवंदनाने व बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आणि दीप प्रज्ज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. शिबिरात रवींद्र कोळी, किशोर पाटील…

Read More

महामानवाच्या चार शासकीय ग्रंथांचे मुद्रित शोधन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे संशोधनात्मक अभ्यास करणारे ८ हजारापेक्षा अधिक ग्रंथाचे संग्राहक अरुण सुरवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या ४ ग्रंथांचे मुद्रित शोधन करून दिल्याबद्दल येथील अजिंठा हाऊसिंग सोसायटीतर्फे जेतवन बुद्ध विहारात शाल, बुके, ग्रंथ देऊन नुकताच सत्कार करुन गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते. याप्रसंगी अरुण सुरवाडे यांनी मुद्रित शोधन करणे किती जिकरीचे व जबाबदारीचे काम असते, याबदल मनोगतात माहिती दिली. साहित्यिक जयसिंग वाघ म्हणाले की, शासनातर्फे प्रकाशित ग्रंथ हे प्रमाण मानले जाते. त्याचे संदर्भ इतरत्र दिले जातात. मात्र, शासनाने अनेकदा चुकीची माहिती छापलेली आहे,…

Read More

सुवर्णसह चार पदकांची ऐतिहासिक कमाई, जळगावच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा  साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   ५४ व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या कन्येने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. आकांक्षा म्हेत्रे हिने प्रतिष्ठित स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि तीन कांस्य पदकांची कमाई करत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने गेल्या १९ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्तराखंडमधील रूद्रपूर येथील शिवालिका वेलोड्रमवर राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. देशभरातून १४, १६, १८ व सिनिअर गटातील ६०० हून अधिक सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आकांक्षा म्हेत्रे हिने टीम परस्यूट प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. दुसऱ्या दिवशी झालेल्या टीम…

Read More

विद्यार्थ्यांच्या प्रतिभा, व्यक्तिमत्त्व विकासाचे मनमोहक सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील प्रेमनगरातील बी. यू. एन. रायसोनी शाळेचा १२वा वार्षिक “एक्सझुबेरेंट” कार्यक्रम महाबळ रस्त्यालगतच्या छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात नुकताच पार पडला. रंगीबेरंगी सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षमतेचा ठसा उमटविण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला. भारतीय संस्कृतीतील मूल्यांची जाणीव करून देत आधुनिक समाजातील बदलांवर चिंतन मांडण्यात आले. विशेष ठळक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जन्मजात कौशल्यांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या “मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट” उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. हा उपक्रम परिसरातील इतर शाळांमध्ये अभावाने आढळणारा शैक्षणिक प्रयोग असल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…

Read More

‘नवरसांची भाव सरिता’ सादरीकरण ; २६० विद्यार्थ्यांचा सहभाग  साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात किशोर महोत्सवाअंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शालेय प्रशासन, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, मुख्य समन्वयक पद्मजा अत्रे, संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, सुरेंद्र लुंकड, पारसमल कांकरिया, सहसचिवा मीरा गाडगीळ, संचालक ॲड. पंकज अत्रे, रजनी पाठक, सचिन दुनाखे, रेवती शेंदुर्णीकर, लता छापेकर, सोनिका मुजुमदार, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापिका राजश्री कुलकर्णी, सुषमा…

Read More

स्पर्धेत राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजित योनेक्स सनराईज जी.एच.रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंटचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमेंटन हॉल येथे नुकतेच झाले. ही स्पर्धा रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स ॲण्ड कल्चर प्रायोजित व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जळगाव जिल्हा क्रीडा संघ सहप्रायोजित महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. ही स्पर्धा २४ ते २८ डिसेंबर दरम्यान होत आहे. उद्घाटनाप्रसंगी रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरचे प्रीती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कॉलेजचे रफिक शेख, जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे सहसचिव सचिन गाडगीळ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य पंच ब्रिजेश गौर, जळगाव जिल्हा बॅडमिंटन…

Read More

अमृतयात्री डी. डी. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जामनेर/प्रतिनिधी :    जामनेर तालुका साहित्य व सांस्कृतिक मंडळातर्फे सोमवारी, २९ आणि ३० डिसेंबर अशा दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा साहित्य संमेलन जळगाव रस्त्यालगतच्या शिवाजी नगरातील एकलव्य माध्यमिक व ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे. संमेलनाला साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संयोजक तथा साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृतयात्री डी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. पत्रकार परिषदेला साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.एस.आर. महाजन, सचिव गोरख सूर्यवंशी, खजिनदार सुखदेव महाजन यांच्यासह संचालक उपस्थित होते. पत्रकारांना संमेलनाविषयी पुढे माहिती देताना अध्यक्ष अमृतयात्री डी.डी. पाटील म्हणाले की, पहिल्या दिवशी २९ डिसेंबर…

Read More