साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । येथील तुषार नरवाडे याची भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा ‘जेईई ॲडव्हान्सड’ अनुसूचित जाती प्रवर्ग २८६ रँक आणि महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेश परीक्षा एमएच-सेटमध्ये ९९.५० पर्सेंटाइल मिळवून नेत्र दीपक यश प्राप्त केल्याबद्दल ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी तुषार नरवाडेचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी अनिल झोपे, विजय तायडे, दिलीप इंगळे, श्री.निकम, रवी बाभुळकर, प्रमोद वानखेडे, प्रकाश नरवाडे, अनिल अहुजा, सुरेश वालेच्छा, अमर शर्मा, चंद्रकांत वर्मा, विनोद अकोटकर आदींनी तुषारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तुषारचे वडील उमेश नरवाडे हे भाजी बाजारात भाजीपाला विक्री करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी अत्यंत खडतर…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर । नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील, असा नारा दिला गेला. त्यासाठी दलीत, मुस्लिम कार्ड खेळले गेले तर भाजपाने ‘चारसो पार’ हा नारा दिला. त्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळले गेले. मात्र, निवडणुकीत ‘संविधान’ आणि ‘हिंदुत्व’ हे मुद्दे कोठेच दिसले नाही, असे परखड विचार साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले. अमळनेरातील साने गुरुजी विद्यालयात प्रागतिक समविचारी संघटना-संस्था समन्वय मंचच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संयोजक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल येथील समाजवादी नेत्या…
साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव । येथील पोलीस स्टेशन हद्दीतील टहाकळी फाट्यावर बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री करताना आणि कब्जात बाळगतांना मिळून आलेले दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतूस, असा ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांवर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दोघा संशयितांना सोमवारी, २४ जून रोजी न्यायालयात हजर केल्यावर एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील टहाकळी फाट्याजवळ सार्वजनिक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी, २३ जून रोजी रात्री ११.३० वाजता सापळा रचला होता. यावेळी संशयित आरोपी…
साईमत/ न्यूज नेटवर्क । यावल । शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून ग्राहकांना धान्य वितरण करण्याची पावती तथा कॅश मेमो आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ना. अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्राहकांनी यावलच्या तहसिलदारांसह पुरवठा अधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले. लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या धान्य वाटप संदर्भात तक्रार निवेदन वजा मोर्चात शिधापत्रिकेवर धान्य मिळविणाऱ्या महिला लाभार्थी ग्राहकही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी तहसिलदारांनी सर्वांच्या तक्रारी ऐकून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, रा.यु.काँ.चे…
साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर । तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे (एसटी) दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. यापूर्वी येथील प्रांत कार्यालयातर्फे शेकडो जातप्रमाणपत्र दिलेले आहेत. मग आत्ताच का देत नाहीत? अशा आशयाचे निवेदन अमळनेरचे प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना नुकतेच देण्यात आले. निवेदनात प्रांत कार्यालयाकडे जातप्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना सबळ पुरावे जोडलेले आहेत. त्यांची दोन वेळेस तपासणी व सुनावणीही झालेली आहे. अशा प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या…
साईमत/ न्यूज नेटवर्क । पाळधी, ता.धरणगाव । गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी आणि आपणही समाजाचे देणे लागतो, या उद्देशाने उपक्रम हाती घेतला आहे. अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांनी सतत संघर्ष करून लढत रहा यश निश्चित मिळेल. अनाथ, गरजू मुलांच्या शैक्षणिक आणि सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द आहे. पुढील शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या मागे ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित अनाथ, गरजू मुलांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. मोलाचा हातभार विद्यार्थ्यांसाठी ठरणार आधार शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनाथ, गरजू मुलांना शालेय शैक्षणिक…
साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । गेल्या २१ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनसमोर शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), काँग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन केले होते. त्यात महाविकास आघाडीचे नेते किसनराव जोर्वेकर यांनी आ.मंगेश चव्हाण यांना ‘माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तूल आणून गोळी घालून टाकेल’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे भाजपा महायुती तसेच चाळीसगाव तालुकावासियांतर्फे निषेध म्हणून सोमवारी, २४ जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात धमकी देणाऱ्या किसनराव जोर्वेकर यांना अटक करा, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करुन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही गरजू रुग्णाला जळगावसह नाशिक, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये उपचारांसह शस्त्रक्रियांची गरज असेल आणि त्यासाठी केवळ ५, १० नव्हे तर अगदी ५० लाखांपर्यंत खर्च येणार असला तरी भाजपाकडून ही वैद्यकीय मदत मोफत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. सामान्य नागरिकांसाठी हा एक भाजपाकडून मदतीचा वेगळा विभाग सुरु केला आहे. त्यामुळे गरजु रुग्णांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. गरजू रुग्णांवर विनामूल्य उपचार केला जाणार असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, राज्य आणि केंद्र शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांच्या उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, प्रधानमंत्री आरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले…
साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ । महाराष्ट्रात माळी समाजाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे माळी समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी विधानसभेत पाठवावे, असा ठराव भुसावळला झालेल्या माळी हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी अविनाश ठाकरे होते. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोदचे माजी आमदार कृष्णकांत इंगळे, उत्तमराव महाजन, विजय महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, पद्माकर महाजन, श्रीमती गुरुनुले, वंदना तिखे आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, ज्या राजकीय पक्षाने माळी समाजाचे उमेदवार दिले, त्या पक्षाच्या पाठीशी माळी समाज उभा राहणार आहे. तसेच त्या व्यक्तीस निवडून आणण्याचे कार्य माळी समाज हक्क परिषद करणार आहे. आम्ही सर्व पक्षाकडे माळी समाजाचा उमेदवार देण्यासाठी…
साईमत/ न्यूज नेटवर्क । भुसावळ । येथील डीआरएम कार्यालयात रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भुसावळचे डीआरएम ईति पांडे यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. चाळीसगाव, पाचोरा भागातून अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. मात्र, महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि मेमू गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने त्यात बदल करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच भुसावळ विभाग आणि जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी येत्या महिन्याभरात दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ‘संकटमोचक’ विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाचे पुर्ननिर्माण होत आहे. त्या अंतर्गत रेल्वे स्थानकाचा विकास केला…