साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । पत्रकारांच्या हितसंरक्षणासाठी आणि पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष म्हणून ‘साईमत’चे व्यवस्थापकीय संचालक परेश सुरेखा प्रमोद बऱ्हाटे यांची नुकतीच निवड जाहीर केली आहे. ही निवड व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या संमतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी जाहीर केली. याबद्दल माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील, माजी महापौर जयश्री महाजन, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ‘साईमत’चे कार्यकारी संपादक सुरेश उज्जैनवाल, वाणिज्य संपादक विवेक ठाकरे, विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, संघटनेच्या…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क । वरणगाव । वरणगाव फॅक्टरीत उच्च पदस्थ पदावर कार्यरत अधिकाऱ्याला सैन्य दलासाठी वापरण्यात येणाऱ्या बुंदकीच्या काडतूस चोरी प्रकरणी अटक केली आहे. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून घटनेतील आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे. सर्व प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण? त्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे संरक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपीला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले होते. वरणगाव आयुध निर्माणीत (फॅक्टरी) सैन्य दल आणि इतर राज्यातील पोलिसांना आवश्यकतेनुसार विविध प्रकारचे काडतूस केंद्र शासनाच्या संरक्षण विभागातर्गंत तयार व वितरीत केल्या जातात. त्यामुळे वरणगाव फॅक्टरी हा परिसर अतिशय संवेदनशिल आहे.…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या निर्देशावरून आगामी विधानसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची नावे तसेच मतदार यादीतील चुकीची नावे दुरुस्त करून पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होतील. यासाठी काँग्रेसतर्फे विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय १० समन्वयकांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ जून ते २४ जुलै २०२४ पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. २५ जुलै ते ९ ऑगस्ट २०२४ दरम्यान मतदार यादीवर हरकती घेण्यात येणार आहे. तसेच २० ऑगस्ट २०२४…
साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर। येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांनी शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, यासाठी मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचे आयोजन केले होते. तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रथयात्रेचा नुकताच समारोप करण्यात आला. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून १६ मे रोजी जळगाव जैन हिल्स येथून मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचा प्रारंभ झाला होता. तालुक्यातील १५२ गावांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेती निविष्ठा खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. रथयात्रेचा नुकताच मंगळग्रह मंदिर परिसरात समारोप करण्यात आला.…
साईमत/ न्यूज नेटवर्क । मुक्ताईनगर । येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर मुक्ताईनगर शहरातील पिण्याच्या पाण्याचे तपासणीचे नमुने मुक्ताईनगर येथील भूजल सर्वेक्षण प्रयोगशाळेत पाठविले जात नाही. आता नगरपंचायत झाल्याने पिण्याचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात असलेल्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागात पाठविले जातात. महिन्याभरातून चार भागातील नमुने वेगवेगळे पाठविण्यात येतात. हे पाण्याचे नमुने चक्क मद्याच्या बाटलीमध्ये पाठविले जातात. बाटलीचे शुद्धीकरण केले जात असले तरी ह्या बाटलीमध्ये पाणी तपासण्याचे नमुने पाठवणे चुकीचेच आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. नव्याने उच्च प्रतीच्या दर्जा असलेल्या बाटल्या नगरपंचायतला वितरित कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र,…
साईमत/ न्यूज नेटवर्क । मलकापूर । शहरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.राहुल रमेश चोपडे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने मुलाच्या आयुष्याचे नुकसान झाले असल्याची तक्रार पीडित माता पूनम भारंबे यांनी गेल्या काळात केली होती. पीडित मातेच्या तक्रारीवरून तीन सदस्य समिती डॉ.चोपडेविरुद्ध गठीत केली होती. २६ जून रोजी मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे चौकशी करण्यासाठी समिती आल्यावर समितीतील सदस्यांची चुकीची वागणूक व चौकशीची चुकीची पद्धत पाहून पीडित मातेने समितीला विरोध दर्शविण्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. त्यामुळे गठीत चौकशी समिती वादाच्या ‘भोवऱ्यात’ सापडली आहे. सविस्तर असे की, डॉ.राहुल चोपडे यांच्याविरुद्ध नेमलेल्या तीन सदस्य समितीकडून चौकशीसाठी पीडित माता पूनम भारंबे, पीडित मुलगा दुर्गेश भारंबे आणि…
साईमत/ न्यूज नेटवर्क । फैजपूर। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्राध्यापकांची बहुप्रतिष्ठीत संघटना एन.मुक्टोच्यावतीने कॅस अंतर्गत विलंबाने झालेल्या पदोन्नती, आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रलंबित असलेली प्रकरणे, त्यामुळे होणारे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात झालेला बदल, विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संबंधीचे प्रश्न, पदवी स्तरावर कॅरीऑन पद्धत सुरू करावी, विद्यार्थ्यांचे ड्रॉप आऊट कमी व्हावे अश्या अनेक प्रश्नांवर खबरदारी आणि उपाय म्हणून डॉ.व्ही.एल.महेश्वरी-कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी चर्चेसाठी वेळ मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वीच निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी, २५ जून रोजी कुलगुरू यांच्या उपस्थितीत विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी प्र.कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे, संचालक डॉ.विनोद पाटील, डॉ.योगेश पाटील…
साईमत/ न्यूज नेटवर्क । चोपडा । येथील रोटरीसह रोटरॅक्ट क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन लेखन अभियान राबविण्यात आले. त्यात चोपडा शहरासह तालुक्यातील १२ शाळांमधील दीड हजार विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तकांसह वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शहरातील महिला मंडळ शाळेत करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया, सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख दीप अग्रवाल, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर, प्रकल्प प्रमुख प्रा.दिव्यांक सावंत, रोटरी क्लबचे सदस्य रूपेश पाटील, स्वप्निल महाजन, विलास पी.पाटील, विलास एस.पाटील, नयन महाजन, डॉ.ईश्वर सौंदाणकर, चंद्रशेखर साखरे, मयुरेश जैन, संजय बारी, शाळेचे मुख्याध्यापक अरूण संदानशिव आदी मान्यवरांच्या हस्ते उजळणी पुस्तकांसह वह्यांचे वाटप…
साईमत/ न्यूज नेटवर्क । चाळीसगाव । सोन्या मारुती मंदिर ते नवीन नाका हिरापूर रस्त्यापर्यंत नवीन रस्त्याचे वर्क आर्डर झाल्यानंतरही तीन महिने होऊनही रस्त्याचे काम सुरू होत नव्हते. रयत सेनेने सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे रस्त्याचे काम आठ दिवसात करण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत २७ जूनपासून सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने रयत सेनेने केलेल्या मागणीला यश आले आहे. प्रभाग क्र.९ मध्ये मलनिस्सारण योजनेचे (भुयारी गटार) काम होऊन सहा महिने झाल्यानंतरही वर्क ऑर्डर होऊनही सोन्या मारुती मंदिर ते नवीन नाका हिरापूर रस्त्यापर्यंत नवीन रस्त्याचे काम चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने केले जात नव्हते. या रस्त्यावरून जवळपास…
साईमत/ न्यूज नेटवर्क । जळगाव । निम्न तापी प्रकल्पाला कृषी सिंचन प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मंत्री ना. अनिल पाटील आणि खा.स्मिताताई वाघ यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी. आर. पाटील यांची नुकतीच भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. बैठकीला जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव देबाश्री मुखर्जी, पाणी पुरवठा-स्वच्छता विभागाचे सचिव विनी महाजन, जलशक्ती विभागाचे आयुक्त ए.एस.गोयल उपस्थित होते. निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील हे गेल्या साडेचार वर्षांपासून यशस्वी पाठपुरावा करून एक एक टप्पा पुढे सरकत असताना लवकरच प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्याची ग्वाही तथा संकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री…