साईमत/ न्यूज नेटवर्क/ अमळनेर : तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कुल, प्र. डांगरी येथील ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र तुकाराम बागुल यांची नुकतीच सेवानिवृत्ती झाली. त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात करणखेडे हायस्कुल येथून केली. त्यानंतर काही वर्ष मारवड येथे सेवा केली. त्यानंतर २९ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाचीही जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यानंतर त्यांची न्यू इंग्लिश स्कुल डांगरी येथे सेवानिवृत्ती झाली. त्यानिमित्त मुंदडा नगर -१ व जी. एम. सोनार नगर येथील सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेला उपक्रमशील असा ‘दुनियादारी’ ग्रुपतर्फे त्यांचा घरी जाऊन सपत्नीक शिवराज्याभिषेकची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक एस. व्ही.पाटील होते. सुरुवातीला ग्रुप ॲडमिन सुधाकर…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता.रावेर : रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तासखेड्यात कायद्याचा कोणताच धाक न बाळगता राजरोसपणे अवैधरित्या दररोज होणारी दारु विक्रीच्या त्रासाला कंटाळून व यामुळे त्यांच्या होणाऱ्या संसाराच्या राख रांगोळीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकत्र येऊन गावात कायमची दारुबंदी करण्यात यावी असा पवित्रा घेत थेट तासखेडा ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी यांना सोबत घेऊन व त्यांच्या मध्यस्थीने ४ जुलै रोजी सावदा पोलीस ठाण्यात महिलांनी आक्रोश मार्चा काढून आमच्या गावात कायमची दारुबंदी करण्यात यावी, अशी रास्त मागणी नूतन सहा.पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर दिव्या कोळी, सुपडाबाई कोळी, आशा गोसावी, कविता कुंभार, जिजाबाई पाटील, शारदा पाटील, रेखा…
साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर : आदिशक्ती संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी परिसरात संत मुक्ताईच्या मंदिराचे हेमांडपंथी जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या पुरातन चर्मकार मठाला आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून चर्मकार समाजाच्या वारकरी मठाला जागा मिळून येथे आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याने ३० लाखांचे भव्य असे सभागृह बांधकाम पूर्ण झाले. संत मुक्ताई चर्मकार मठ ट्रस्ट कोथळीला आ.पाटील यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याठिकाणी संत रोहिदास महाराजांची मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा तसेच संत मुक्ताई चरित्र व संत रोहिदास महाराज चरित्र पारायण सोहळ्याचे गेल्या २३ जूनपासून आयोजन केले होते. भागवत कथा ॲड. कैलास महाराज यांच्या सुश्राव्य…
साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : तालुक्यातील कुंड बु. येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे कुंड फाट्यावरून मलकापूरकडे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर यादगार हॉटेलजवळ रस्ता ओलांडताना चार चाकीने उडविल्याने ठार झाल्याची घटना सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. येथील कुंड बु. रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (वय ५८) हे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर येऊन कुंड बु. फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हाॅटेल यादगारनजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते. मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चारचाकी (क्र.जीजे-१५, बिएफ-२५६४) भरधाव येत कवळे यांना उडविले. या घटनेतील धडक एवढी भीषण होती की, ते अक्षरशः फुटबॉलसारखे हवेत उडून खाली कोसळले. डोक्यात…
साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता वेगळे आरक्षण देण्यात यावे, यासाठी सोमवारी, १ जुलै रोजी मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मराठ्यांना ओबीसीमधुन आरक्षण देऊ नये. कारण ओबीसीमध्येच जास्त लोकसंख्या आहे. त्यातच मराठ्यांना त्यांच्यात समाविष्ट करु नये. तसेच संगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करु नये. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. जर मराठ्यांना सरकार ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास ओबीसीवर हा अन्याय होईल, असे झाल्यास बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी व ओबीसी आरक्षण बचाव समिती…
साईमत/ न्यूज नेटवर्क/जामनेर : तालुक्यात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. तालुक्यातील शहापूर येथे एका महिलेचा अनैतिक संबंधातून दगडाने चेहरा ठेचून निर्घृणपणे खून करुन तिला ‘यमसदनी’ धाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी साडेदहा ते ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.संशयित आरोपीला तळेगाव येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संगीताबाई पिराजी शिंदे (वय ३६, रा. शहापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. ती विधवा असुन दोन मुलांसह शहापूर येथे राहत होती. तिला विदर्भामधील अमरावती जिल्ह्यात दिलेले होते. महिलेचा पती १०-१२ वर्षांपासून तिला सोडून गेल्यामुळे ती आपल्या दोन मुलांसह माहेरी शहापूर…
साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल : महाराष्ट्र राज्य सरकारने सोमवारी, १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी यावल तालुक्यासह शहरात महिलांनी आपली घरातील व काही आवश्यक कामे सोडून तलाठी कार्यालयात, सुविधा केंद्रावर आणि झेरॉक्स दुकानावर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आहे. तसेच महिलांना अर्ज भरून देण्यासाठी अनधिकृत लिखाण करणाऱ्या काहींनी (अधिकृत वेंडर नव्हे) महिलांच्या अज्ञानाचा व गर्दीचा फायदा घेऊन लिखाणासाठी पन्नास, शंभर रुपये न घेता ५०० ते १००० रुपये घेतल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा…
साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव : शहरातील रेल्वे स्थानक ते बसस्थानक चौकातील तिरंगा सर्कलपर्यंत सिमेंट कॉक्रीटीकरणाने रस्ता दुहेरी करण्याचे काम सुरू आहे . मात्र, होत असलेल्या रस्त्यात अधिकारी दुजाभाव करीत असुन रेल्वे स्थानक भागात १८ मिटर तर बस स्थानक भागाकडे केवळ १५ मिटर रुंदीकरणाचे काम केले जात आहे . त्यामुळे सा.बां. विभागाने रस्त्याचे काम नियमानुसार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील काळे व पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतली जात नसल्याने हा मार्ग रुंदीकरण करण्यात येवून त्यामध्ये दुभाजकांचे काम करण्यात यावे, यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच शहरातील काही नागरिक बुधवारी, ३…
साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर तीन नवीन कायदे सोमवारी, १ जुलैपासून लागू केले आहे. कायद्याची जनजागृती तसेच लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने फैजपूर पोलीस ठाण्यात हद्दीतील पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी फैजपुरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह होत्या. देशात तीन नवे कायदे १ जुलै पासून लागू केले आहे. या कायद्याची जनजागृती व्हावी, यासाठी येथील पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात आली. दरम्यान भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता असे तीन नवीन कायदे लागू केले आहे. नवीन कायद्यांची लोकांना माहिती व्हावी, याविषयी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी…
साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर सिंदखेडराजा तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून डॉ. अस्मा मुजावर ह्या रुजू झाल्या आहेत. पुन्हा रुजू झाल्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांची बदली सिंदखेडराजा तालुका, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा व बुलढाणा असे तालुके सोडून इतर कुठेही करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे व इतर जणांनी सिंदखेडराजा उपविभागीय अधिकाऱ्यांंना दिले नुकतेच दिले आहे. चार वर्ष डॉ. अस्मा मुजावर सिंदखेडराजा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर अगोदर कार्यरत होत्या. त्यांनी अनेक चांगली कामे केली. अवैध वाळू वाहतुकीला लगाम घातला. याबद्दल शंका नाही. परंतु सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकदारांशी तसेच एजंट यांच्याशी त्यांची ओळख असल्यामुळे तसेच…