साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात ‘माझी लाडकी बहिण योजना’ याविषयी तसेच योजनेच्या अर्जाविषयी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी नुकतीच मार्गदर्शनासह कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आ.चंद्रकांत पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, गटविकास अधिकारी निशा जाधव, संजय गांधी निराधार योजनेची समितीचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, नायब तहसीलदार निकेतन वाडे, बालविकास प्रकल्पाधिकारी संपदा संत, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, आमदार पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी उपस्थित होते. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. याप्रसंगी अंगणवाडी सेविकांनी ‘नारीशक्ती ॲप’ डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले. शासन प्रत्येक कामासाठी ५० रुपये…
Author: Sharad Bhalerao
साईमत/ न्यूज नेटवर्क/फैजपूर : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात प्रयत्नांची पराकाष्ठा करून उज्ज्वल यश संपादन करावे. विविध सुसंस्कारांनी आपले व्यक्तिमत्व आदर्श बनवावे. आत्मनिर्भर होणाऱ्या भारत देशात या माध्यमातून युवकांनी देश मजबूत करावा. भविष्यात भारत देश हा विश्वगुरू होणार असून यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वाचा असणार असल्याचे प्रतिपादन यावल शेतकरी संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे यांनी केले. शहरातील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेकडून सामाजिक उपक्रमांतर्गत म्युनिसिपल हायस्कुलमधील गरजू, निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर-वह्या, शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी. पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे…
साईमत/ न्यूज नेटवर्क/ खिडी, ता.रावेर : रावेर ताुक्यातील खिर्डी ते निंभोरा रस्त्यावरील असलेले खड्डे दिवसेंदिवस अपघाताला निमंत्रण देत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा वाहनधारकांचे खड्डे चुकवितांना अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. खिर्डी येथील एकाचा खिर्डी ते निंभोरा दरम्यान उड्डाणपुलाच्या आधी असलेल्या खड्ड्यांमुळे ५ रोजी गाडीचा टायर सरकल्याने अपघात झाला होता. सुदैवाने, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करतांना दिसत आहे. तसेच निंभोरा खिर्डी दरम्यान असलेल्या खिर्डी ते निंभोरा जातांना…
साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता.रावेर : रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या तासखेडा येथे कोणताही कायद्याचा धाक न बाळगता जोमाने दारू विक्री केली जात होती. अशा अवैध दारू विक्रीला कंटाळून गावातील महिलांनी ग्रामपंचायत सदस्याला सोबत घेऊन दारूबंदीसाठी सावदा पोलीस ठाण्यात ४ जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी नूतन स.पो.नि. विशाल पाटील यांच्या समक्ष आक्रोश करत ‘आम्हाला न्याय द्या…आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या… दारुमुळे आमचे कुटुंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राखरांगोळी होण्यापासून वाचवा…’ असे रडत रडत गावात कायमची अवैध दारुबंदी करण्याची रास्त मागणी केली होती. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर असे गृहीत धरण्यात आले होते…
साईमत/ न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर : वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या बाहेरील बाजुने तापी पाटबंधारे विभागामार्फत ओझरखेडा ते माळेगाव अशा साडेचार किलोमीटर रस्त्याचे डब्ल्यूबीएम (खडीकरण) पद्धतीने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही तक्रारींची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शनिवारी, ६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यामुळे निकृष्ट डब्ल्यूबीएमच्या कामाकडे कार्यकारी अभियंत्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ओझरखेड धरणाच्या बाहेरील बाजूस डब्ल्यूबीएम रस्त्याची निविदा १४ कोटी ५६ लाख एवढ्या मोठ्या प्रचंड रकमेची का…
साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल : यावल वन विभागात वटवाघुळाच्या हत्येला उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक जबाबदार असे वृत्त गेल्या १ जुलै रोजी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रसिद्ध होताच अज्ञात व्यक्तीने वडाच्या वृक्षावर लावलेली प्लास्टिकची पक्की जाळी यावल पूर्व वनक्षेत्रपाल यांच्या आदेशाने वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड यांनी काढली. त्यामुळे वडाच्या वृक्षावर येणाऱ्या शेकडो वटवाघुळांचे प्राण वाचणार आहेत. यावल येथे नगरपालिकेपासून आणि यावल न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर तसेच यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपालाच्या मुख्यालयापासून एक किलोमीटर अंतरावर महाराणा प्रतापनगरमध्ये अंदाजे ४०० ते ५०० वर्ष वयाचे जुने मोठे वडाचे वृक्ष आहे. या वडाच्या मोठ्या झाडावर दररोज अंदाजे तीनशे ते चारशे वटवाघुळ यांचे येणे जाणे आणि वास्तव्य असते यांची हत्या करणे…
साईमत/ न्यूज नेटवर्क/मुक्ताईनगर : नगरपंचायतीचा मुक्ताईनगर शहर विकास आराखडा अद्यापही मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. शहर विकास आराखडा अंतर्गत ग्रीन झोन आणि येलो झोन अंतर्गत येणाऱ्या सुमारे ७६ नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. ४ व ५ जुलै रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ७३ नागरिकांची बैठक घेऊन नगरपालिकेत सुनावणी केली. नागरिकांनी मुक्ताईनगर शहर विकास आराखडाविषयी आपले म्हणणे मांडले. तसेच योग्य कागदपत्रे दिली व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेले संत भूमी तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर नगरपंचायत हद्यीत असून येथे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वरादी चौघे भावंडातील संत मुक्ताबाई या अंतर्धान झाल्याने, त्यांचे मुक्ताईनगर शहराजवळच समाधी स्थळ आहे. शहरात नगरपंचायत…
साईमत/ न्यूज नेटवर्क/भुसावळ : शहरात एका गावातील रहिवासी साडेतीन वर्षीय मुलीचा शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार विनयभंग व पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही मुलगी सोमवार आणि मंगळवारी, २ जुलै रोजी शाळेत जात असताना व्हॅन चालक संशयित प्रसाद हिरासिंग चौधरी यांनी साडेतीन वर्षीय मुलीच्या गुप्तांगाची छेडछाड करून दुखापत करीत विनयभंग केला. हा प्रकार बालिकेने गुरुवारी आईला सांगितल्यानंतर याप्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला विनयभंग व पोक्सो अंतर्गत कलम अनुसूचित जाती अत्याचार अधिनियम…
साईमत/ न्यूज नेटवर्क/भुसावळ : महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेवून महाराष्ट्रात तिन्ही वीज कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यांचे पगारवाढ व इतर मागणीसाठी सुरु असलेले आंदोलनाची संपूर्ण माहीती देवून चर्चा केली. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भुसावळ निर्मिती झोनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभेमधुन निवडून आलेल्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही वीज कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यांचे पगारवाढ व इतर मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन यांची संपूर्ण माहिती दिली. तसेच प्रमुख सहा संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती…
साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव : शहरात गेल्या ४ जून रोजी जुन्या वादाची कुरापत काढून तिघांवर चाकु हल्ला करण्यात आला होता . यामध्ये एकाचा मृत्यू झाला असुन घटनेतील पाचपैकी तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील मुख्य सुत्रधार असलेल्या दोन्ही फरार आरोपींना त्वरित अटक करून सर्वांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीसाठी वरणगाव शहरातील मुस्लीम बांधवांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला . वरणगाव शहरात सहा महिन्यांपूर्वी एकाच समाजातील दोन गटात वाद निर्माण झाले होते. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, वादाची धुसपूस दोन्ही गटात धुमसत असतानांच ४ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिनेमा रस्त्यावर ( भवानी नगर ) दुचाकीला कट…