नवोपक्रम, स्वदेशी संशोधनासह आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सावरकर (ला.ना.सा.) विद्यालयात केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार “विकसित भारत बिल्डथॉन–२०२५” राष्ट्रीय संशोधन स्पर्धेबाबत थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी १० ते १२ या वेळेत एलसीडी प्रोजेक्टरद्वारे केंद्र सरकारचा कार्यक्रम दाखविण्यात आला. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता, सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि दैनंदिन गरजा स्वदेशी तंत्रज्ञानातून पूर्ण करण्याची क्षमता विकसित करणे होता.“विकसित भारत बिल्डथॉन–२०२५” उपक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारताच्या धर्तीवर आयोजित केला आहे. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवकल्पना क्षेत्रात प्रोत्साहन देणे हा यामागचा…
Author: Sharad Bhalerao
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेतर्फे आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नेत्ररोग विभागातर्फे जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने जागतिक दृष्टी दिनानिमित्त नुकतीच जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत नर्सिंग, एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. रॅलीत दृष्टिदिनानिमित्त प्रबोधनात्मक संदेश असलेले फलक लक्ष वेधून घेत होते. यावेळी प्रमुख पाहुणे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक तथा नेत्रशल्यचिकित्सक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाविषयी माहिती दिली. ही रॅली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते महात्मा गांधी उद्यान, स्वातंत्र्यविर चौक दरम्यान काढण्यात आली. याप्रसंगी जळगाव नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. रागिणी पाटील, सचिव डॉ.…
अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांची कडक भूमिका, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्याही वाहनांना बंदी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मधून गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह इतरांची खासगी वाहनेमध्ये येण्यास बंदी घातली असल्याने आता रुग्णालयाचा परिसर मोकळा श्वास घेत आहे. अनेकदा सुरक्षा रक्षकांचे नागरिकांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वाद होतात. अनेकजण “भाऊं”सह “साहेबां”ना फोन लावतात. मात्र, कुठलेही वाहन सोडले जात नसल्याने अधिष्ठातांनी सुरक्षारक्षकांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. रुग्णालयांमधील बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर होती. त्यामुळे रुग्णांना आणि रुग्णवाहिकांना पोहोचण्यास अनेकवेळा अडथळा निर्माण होत होता. शहरातील रुग्णालयाच्या आवारात खासगी वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरू होते. जागा दिसेल तेथे दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्या जात असल्याने…
धामणगावला गंमत जोडशब्दांची रिडींग अँड लर्निंग सेंटरमध्ये ‘वाचन प्रेरणा’ दिन साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : धामणगाव येथील ‘माय माती फाऊंडेशन’तर्फे गंमत जोडशब्दांची रिडींग अँड लर्निंग सेंटर येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथील स्व. देवराम खुशाल पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छा पत्रे देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांसारख्या साहित्यकार व समाजसेवकांची पुस्तके वाचून मनोगत व्यक्त केले. त्यात दीपाली सपकाळे, मोहिनी सपकाळे, समीक्षा सपकाळे, तेजस्विनी सपकाळे, गायत्री सपकाळे, ओम…
जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढीने ‘वाचन प्रेरणा दिन’ नुकताच उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूर बोर्डचे सेवानिवृत्त विभागीय सचिव शशीकांत हिंगोणेकर, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक विजय लुल्हे उपस्थित होते. तसेच अभियंता पतपेढीचे आजीव अध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील, व्हा. चेअरमन इंजि. चंद्रशेखर तायडे, संचालक इंजि. ब्रह्मानंद तायडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. याप्रसंगी मान्यवरांचे शाल व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शशीकांत हिंगोणेकर यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विषद केले. तसेच डॉ.…
‘सूर चैतन्य’ दिवाळी पर्वातील एक अनुभव संपन्न पर्व ठरणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : यंदाही “साईमत परिवारा”तर्फे सांगितीक मेजवानीचा आस्वाद घेत एकूणच जळगावकारांची दिवाळी मनोरंजनात जाणार आहे. दिवाळी म्हणजे केवळ प्रकाश… उत्सव… किंवा फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. हीच दिवाळी जेव्हा पहाटेच्या नीरव शांततेत संगीताच्या सुरांनी सजते, तेव्हा ती एक सांस्कृतिक अनुभूती देणारी पर्वणीच ठरते…! सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी सहकार्य करणारा परिवार म्हणजे ‘साईमत’ परिवार आहे. प्रसिद्ध कलावंत तथा सेलिब्रिटी अँकर (निवेदक) तुषार वाघुळदे प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा ७ स्ट्रिंग्स प्रस्तुत “ सूर चैतन्य “ हे दिवाळी पर्वातील यंदाचे असंच एक अनुभव संपन्न पर्व ठरणार…
स्मशानभूमीत चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी मनपाच्या आयुक्तांना निवेदन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कंजरभाट समाजाच्या युवांनी आपले सामाजिक कर्तव्य बजावत जळगाव महानगरपालिका आयुक्तांना मेहरूण परिसरातील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी निवेदन दिले. याप्रसंगी फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, योगेश बागडे, विजय अभंगे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, सुमित माछरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर फाउंडेशनने सुरक्षा व्यवस्थेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली. निवेदन स्वीकारत आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाला संबंधित कार्यवाही…
जयपुरला केंद्रीय संस्कृत विद्यापीठात भव्य सत्कार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे (इ. १२ वी विज्ञान) याने ‘भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा जयपुरला केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला देशभरातील नामवंत संस्कृत पंडित, विद्यापीठाचे कुलगुरू, विविध प्रांतातील प्राध्यापक, पालक आणि विजेते विद्यार्थी उपस्थित होते. सोहळ्यात विद्यापीठाचे कुलगुरू यांनी स्वतःच्या हस्ते आयुषला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच हजाराचे रोख पारितोषिक प्रदान केले. यावेळी कुलगुरूंनी आयुषच्या परिश्रमाचे, भारतीय संस्कृत परंपरेवरील त्याच्या सखोल ज्ञानाचे आणि…
ग्रंथालयातील गोष्टीच्या पुस्तकांचे छोटेखानी भरवले प्रदर्शन साईमत/यावल/प्रतिनिधी : तालुक्यातील सांगवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती यांच्या निमित्त डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका रंजना सोनवणे होत्या. याप्रसंगी उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी विद्यार्थ्यांना डॉ.कलाम यांच्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे डॉ.कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या ग्रंथालयातील गोष्टीच्या पुस्तकांचे छोटेखानी प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पुस्तक अभिवाचन उपक्रम ग्रंथालय प्रमुख जयश्री काळवीट यांनी आयोजित केला होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील गोष्टीची पुस्तके खुली करून देण्यात आली. उपक्रमात इयत्ता पहिली…
एलसीबीने ४ दिवसात लावला छडा ; तीन गावठी पिस्तुल, मोबाईलसह रोकड जप्त साईमत/जळगाव/प्रतिनिधी : भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यातील तीन पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्यांच्या मालिकेचा अखेर उलगडा करण्यात आला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तब्बल चार दिवसांच्या अथक तपासानंतर या प्रकरणातील सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये अकोला येथील कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गेल्या ९ ऑक्टोबर रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर टोळीने मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप’ तसेच वरणगाव शिवारातील तळवेल फाटा येथील ‘सैय्यद पेट्रोल पंपावर’ लूट केली. सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर घेऊन गेलेल्या दरोडेखोरांनी १…