Author: Sharad Bhalerao

महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धांमध्ये जळगावच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि नंदिनीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता पवार हिने १९ वर्षाखालील मुलींच्या ५५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तिच्या यशामुळे तिला जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात स्थान निश्चित झाले आहे. जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील यशामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल आणि महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी नवीन प्रेरणा मिळणार…

Read More

भाजप अल्पसंख्यांक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा, कार्यकर्त्यांशी संवाद आणि समाजासाठी आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांकांसाठी अनेक योजनांद्वारे मदतीचा हात दिला आहे. ह्या समाजाचा खरा विकास भाजपाच्या माध्यमातूनच शक्य आहे. मुस्लिम समाजाने अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काँग्रेसला साथ दिली आहे. परंतु त्यातून समाजाला काहीही साध्य झालेले नाही. काँग्रेससारख्या पक्षांनी फक्त वोट बँक म्हणून मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. आता मुस्लिम समाजाने अशा संधी साधू पक्षाची साथ सोडून मुख्य प्रवाहात भाजपासोबत सामील होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले. उत्तर महाराष्ट्र दौऱ्याप्रसंगी त्यांनी नुकतीच जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते…

Read More

‘केसीई’च्या अध्यक्षांकडून पाच हजाराचा विशेष पुरस्कार जाहीर साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच पार पडलेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये देशातून द्वितीय क्रमांक मिळवून जळगावसह संस्थेचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अशा उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी ‘आयुष’ला प्रोत्साहनपर पाच हजार रुपयाचा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला. जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील हा यशाचा झेंडा केसीई संस्थेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तावर्धन प्रयत्नांसह विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला अधोरेखित करणारा ठरला आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजित स्पर्धेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी…

Read More

आजार टाळण्यासह आरोग्य रक्षणासाठी उपाययोजनांवर मार्गदर्शन साईमत/जामनेर/प्रतिनिधी :   धनत्रयोदशी आणि वैद्यक शास्त्राची देवता धन्वंतरी यांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातील वाकडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात धन्वंतरी पूजन आयोजित केले होते. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. धन्वंतरी पूजनाचे विधी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास माजी सभापती घनश्याम पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पाटील, डॉ. किरण पाटील, डॉ. गोपाल वाणी, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी मनिषा वाकोडे, औषध निर्माण अधिकारी अतुल पाटील, आरोग्य सहाय्यक व्ही.एच. माळी, आरोग्य सहाय्यिका सुरेखा गोसावी, शोभा घाटे, आरोग्य सहाय्यक अमित तडवी, आरोग्य…

Read More

मानापुरी पाड्यात घराघरात लावले दीप, वाटले फराळ अन्‌ आनंद साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकात्मतेचा उत्सव. हाच संदेश देत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या सदस्यांनी यावर्षी अत्यंत दुर्गम भागातील यावल तालुक्यातील मानापुरी पाडा येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने “दीपोत्सव” साजरा केला. उपक्रमात संस्थेच्या भगिनींनी स्वतःच्या घरची दिवाळी साजरी करण्यापूर्वी आदिवासी पाड्यावर जाऊन घराघरात दिवे लावले. फराळ, वाती, तेल, पणत्या, कपडे आणि लहान मुलांना फटाके वाटले. यानिमित्त त्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद आणि कृतज्ञतेची लहर दिसून आली. दिवाळीचा सण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि मानवी एकतेचा द्योतक आहे. हाच मानवतेचा दीप पेटवत नारीशक्ती आणि रेड स्वस्तिक…

Read More

फटाके मुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा. विद्यालयात शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी पर्यावरणपूरक दीपावलीचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील ६० विद्यार्थ्यांनी चित्रकला शिक्षिका नीलिमा सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे रंगीबेरंगी आणि आकर्षक ‘आकाशकंदील’ स्वतःच्या हातांनी बनविले आणि शाळेच्या परिसरात लावले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, शिक्षक सोमनाथ महाजन, नीलिमा सपकाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात संजय वानखेडे यांनी दीपावलीतील विविध दिवसांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी फटाक्यांमुळे होणारे ध्वनी, वायू, जल आणि माती प्रदूषण तसेच व्यक्ती, पशू-पक्षी, निसर्ग आणि जलाशयांवर होणारे गंभीर परिणाम…

Read More

दिवाळी सणाला ५० महिलांमध्ये चैतन्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  महिला सशक्तीकरण आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात कार्यरत पवन चॅरिटेबल ट्रस्टने दिवाळीच्या सणानिमित्त वंचित घटक व अनुसूचित जाती-जातीतल्या ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन व हँड एम्ब्रॉयडरी मशीनसह संपूर्ण किटचे वाटप केले. किटमध्ये कात्री, कापड, पावडर, विविध आकारांच्या २५ सुई असे १४ उपयुक्त साहित्य समाविष्ट होते. कार्यक्रमात दिल्ली येथील हॅंडीक्राफ्ट विभागाचे असिस्टंट कमिशनर अमन जैन यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपक्रमाचे कौतुक केले. पवन ट्रस्ट वंचित घटकांसाठी हस्तकला, स्वयंरोजगार तसेच स्वावलंबनाचे धडे देत आहे. यावेळी शिलाई प्रशिक्षणाचे आयोजनही केले होते. महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करता यावा, म्हणून मोफत शिलाई मशीन देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी…

Read More

२१ रुपये किलो दराने साखर, महिलांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  दिवाळीचा उत्साह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हरीविठ्ठल नगरातील शाखेत ‘आनंदाचा शिधा’चा उपक्रम राबविला. उपक्रमातंर्गंत गरजू कुटुंबांना फक्त २१ रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात आली. हा उपक्रम शहरातील हरी विठ्ठल नगरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये मनसे महिला शाखेच्यावतीने आयोजित केला होता. साखर वितरणावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. यावेळी ४०० किलो साखरचे वाटप करण्यात आले. सरकारने आम्हाला आनंदाचा शिधा दिला नाही. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आनंदाचा शिधा मिळाल्याचे उपस्थित काही महिलांनी नमूद केले. कार्यक्रमास महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे,…

Read More

आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश वाढत आहे. त्यामुळे पक्ष संघटन अधिक मजबूत होत आहे. त्याच अनुषंगाने शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी आकाश मंडोरे यांनी भाजपात प्रवेश करून पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. प्रवेश सोहळ्यावेळी आ. राजुमामा भोळे यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपात नव्या कार्यकर्त्यांचा होत असलेला सहभाग पाहता, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद अधिक वाढणार असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

Read More

ग्रंथप्रेम अन्‌ विचारप्रेरणेचा संदेश साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथप्रेम जागवणे आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून केली. याप्रसंगी मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, ज्येष्ठ शिक्षक सुभाष पाटील, दीपक पाटील, ग्रंथपाल सुनील अंबिकार, जागृती मोराणकर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध लेखकांची आवडती पुस्तके वाचून त्यावरील मनोगते…

Read More