Author: Sharad Bhalerao

मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भाजपा दलित आघाडीतर्फे निवेदन साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : रेल्वे स्टेशनजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अर्धवट सौंदर्यीकरण झाले आहे. उर्वरित पुतळ्याचे काम त्वरित पूर्ण करा, अशा आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना भारतीय जनता पार्टी दलित आघाडीचे शहराध्यक्ष कुणाल सावळे यांनी नुकतेच दिले आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर कुणाल सावळे, बाळू सावळे, अमित अवसरमोल, अर्जुन थाटे, राहुल अवसरमोल, आशिष चोपडे, अमोल रणीत, ज्वाला सिंग, पवन अवसरमोल, किरण सावळे व राहुल पानपाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहे. निवेदनात पुढे नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याचे अर्धवट झालेले काम गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित आहे.…

Read More

गणेश नर्सरीजवळील घटना साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : शेतातील काम आटोपून दुचाकीने घराकडे येत असताना जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्ञानेश्वर उर्फ बाळू रामकृष्ण तरवडे (वय ४३, रा.पहुर पेठ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सायंकाळी पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर मृत घोषित केले. याप्रकरणी ईको वाहनाचे चालक इमरान अलीम पटेल (वय ३१, रा.नांदेड, ता.धरणगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गणेश नर्सरीजवळ रस्ता ओलांडत असताना इको कारने (क्र.एमएच-१९ ईजी ४७०१) दुचाकीला मागून धडक दिली. त्यात ज्ञानेश्वर तरवाडे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पहुर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी देवेंद्र घोंगडे, संदीप घोंगडे यांच्यासह पहुर पेठचे सरपंच अफजल…

Read More

चौगाव, चुंचाळे, लासूरच्या शेतकऱ्यांचे तहसिलदारांना निवेदन साईमत/चोपडा/प्रतिनिधी: तालुक्यातील चौगाव-चुंचाळे येथे कार्यरत तलाठी भूषण शांताराम पाटील हे गेल्या तीन वर्षापासून चौगाव-चुंचाळे सजेच्या ठिकाणी उत्कृष्ठ सेवा देत आहेत. अशातच नुकतीच त्यांची बदली चोपडा तालुक्यातील धुपे येथे केली आहे. त्यांचे कार्य अतिशय चांगले आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्यांना पूर्ववत चौगाव-चुंचाळे येथील सजेचा कार्यभार सोपवावा, अशी मागणी चौगाव, चुंचाळे व लासूर येथील शेकडो शेतकऱ्यांनी चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तलाठी भूषण पाटील हे फक्त तलाठी नसून शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शक असल्याची भावना चौगाव येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.निसर्ग आणि पर्यावरणाबाबत गेल्या तीन वर्षात त्यांचे चौगाव-चुंचाळे परिसरात मोठे योगदान राहिले…

Read More

मतदार संघात शरद पवारांनी उमेदवारी द्यावी, आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचा दृढ निर्धार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : राज्यात शरदचंद्र पवार यांना प्रचंड सहानुभुती असल्याने जिल्ह्यात पक्ष संघटन आणि ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी काळात सज्ज रहावे. गेल्या दहा वर्षांपासून पक्षाचे पदाधिकारी सत्ता आणि आमदारकीपासून दूर आहेत. मतदार संघावरील राष्ट्रवादीने उमेदवारीचा ताबा सोडलेला नाही. पक्ष नेत्यांनी कार्यकर्त्यांची मागणीचा विचार करून मतदार संघात उमेदवारी दिली पाहिजे. पक्षाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो विधानसभेची निवडणूक ही वाघ परिवार लढणारच असल्याचे प्रतिपादन पक्षाचे नेते संजय वाघ यांनी केले. पक्षाच्या आढावा बैठकीत मतदार संघात शरद पवारांनी उमेदवारी द्यावी, असा दृढनिर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष नेतृत्वासोबत झगडावे लागले तरी…

Read More

विद्यार्थ्यांनी सादर केली देशभक्तीपर नृत्य, गीते साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कंजरभाट समाज युवा फाउंडेशन आणि प्रतिभा प्राथमिक, माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कंजरभाट समाज मंदिराच्या पटांगणावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतिभा शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रतिभा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस. बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका नंदा पाटील, कंजरभाट समाजाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनींनी ‘मायभुमी’ देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच संगीतमय कवायत, पहिलीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या कडकडाने दाद मिळवली. यशस्वीतेसाठी कंजरभाट…

Read More

प्रतिष्ठानतर्फे बालकवी, प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील काव्य रत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि प्र. के. अत्रे यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी होत्या. यानिमित्त कविसंमेलन घेण्यात आले. त्यात कवींनी सहभाग घेऊन कविता सादर केल्या. कविसंमेलनात स्वराचित कवितांबरोबरच बालकवी यांच्या ‘श्रावण मासी हर्ष मानसी’, ‘फुलराणी’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘औदुंबर’, ‘कोठुनी येते मला कळेना’ तर प्र. के. अत्रे यांची ‘प्रेमाचा गुलकंद’ अशा सुरेख कविता कविसंमेलनात सादर केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बालकवींच्या पणती विशाखा कुलकर्णी यांनी ‘आपणच खरे बालकवींचे नातेवाईक आहेत’ असे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन कवी अशोक…

Read More

पिंपळगाव कमानी गावात पसरली शोककळा साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : गोंदेगाव तांडा येथून जवळील पिंपळगाव कमानी येथे रक्षाबंधन जवळ आल्याने विवाहिता पूजा काशिनाथ पवार (वय २१) ही आई-वडिलांकडे आली होती. शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विषारी सापाने पूजा पवार यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर त्यांना काही वेळातच पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी पूजा यांना मयत घोषित केले. गेल्या ३ वर्षांपूर्वी पुजाचे लग्न झाले होते. पुजाला दोन वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे पिंपळगाव कमानी गावात शोककळा पसरली आहे.

Read More

जामनेरातील आयोजित शिबिरात श्याम चैतन्यजी महाराज यांचे प्रतिपादन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : रक्तदान ही काळाची गरज झालेली आहे. रक्तदानाच्या माध्यमातून आपण हजारो लोकांचे प्राण वाचवू शकतो. त्यासाठी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ठरले आहे. त्यामुळे जो व्यक्ती भाग्यवान आहे तोच रक्तदान करु शकतो, असे प्रतिपादन श्रद्धेय श्याम चैतन्यजी महाराज यांनी केले. ते ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्यजी बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट ‘चैतन्य धाम’ तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. श्रद्धेय श्याम चैतन्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर जामनेरातील मीरा हॉस्पिटल येथे नुकतेच घेण्यात आले. शिबिरात श्याम चैतन्यजी महाराज यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिरात त्यांनी स्वतः रक्तदान करून…

Read More

विविध उपक्रमांनी लक्ष वेधले, देशाविषयी भावना झाल्या जागृत साईमत/जळगाव/प्रतिनिधी: स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी देशभक्तीमय वातावरणात विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे देशवासियांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे देशाविषयी भावना जागृत झाल्या. जनता महाविद्यालयात रंगारंग कार्यक्रमासह स्पर्धां मलकापूर : येथील जनता कला, वाणिज्य महाविद्यालयात रंगारंग कार्यक्रमासह स्पर्धांचे आयोजन करून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विकसित भारत’ ही थीम घेऊन यावर्षी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. हेच उद्दिष्ट समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता महाविद्यालयातील इतिहास, एनसीसी व एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले…

Read More

एम.एम. महाविद्यालयात गुणगौरव, अंकुर प्रकाशन, विविध विभागांचे उद्घाटन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी आमदार दिलीप वाघ यांनी अध्यक्षीय मनोगतात दिली. येथील पीटीसी संस्थेच्या एम.एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अंकुर नियतकालिकाचे प्रकाशन, विविध विभागांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. सरस्वती पूजनासह दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. उपस्थितांच्या हस्ते स्वतंत्र आणि अद्ययावत आयसीटी आणि कॅम्प विभागाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, डॉ.मुकुंद करंबळेकर (चाळीसगाव), संमोहन तज्ज्ञ तथा अभिनेते शैलेंद्र गायकवाड, कजागिस्तान आर्यन मॅन पुरस्कार प्राप्त रजनीश गायकवाड, स्पर्धा…

Read More