Author: Sharad Bhalerao

प्रशासनाच्या विरोधात आदिवासी जमातीत पसरला असंतोष साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : उपविभागीय अधिकाऱ्यांंच्या कार्यक्षेत्रातील मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे गेल्या १३ ऑगस्टपासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यात कोळी महादेव जमातीचे ज्ञानेश्वर काशिराम खवले, मनोहर भोलाणकर, सूरज तायडे आणि संदीप सपकाळ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब दामोदर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. आदिवासी कोळी महादेव जमातीला भारतीय राज्यघटनेचे कलम ३४२ नुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात आलेले आहे. तरीही उपविभागीय अधिकारी हे आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे…

Read More

पोलीस पाटीलला जबर मारहाण, पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना जमावाचा चोप पोलीस वाहनाची फोडलेली काच रात्रीच्या रात्रीच बदलली? साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : तालुक्यातील खडकदेवळा बु.येथील शेतकऱ्याने जंगली जनावरांपासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतात इलेक्ट्रीक तारांचा वीज प्रवाह सोडला होता. या इलेक्ट्रीक तारांचा शाॅक लागुन भिल्ल समाजाच्या एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेममुळे त्या समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनास्थळाची पाहणी करायला गेलेल्या गावाच्या पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षकांवर घटनास्थळी अज्ञात समुहाकडून दगडफेक करण्यात आली. त्यात पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षकांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी आम्हाला मारहाण झाली नाही, अशी सारवासारव करून जमावाने पोलीस वाहनाची फोडलेली काच रात्रीच बदलवून टाकली…

Read More

मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील वाकी रस्त्यालगतच्या बेस्ट बाजाराच्या आवारात फोटोग्राफर मित्र मंडळाच्यावतीने सोमवारी, १९ रोजी जागतिक फोटोग्राफर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर अरुण रत्नपारखे, प्रशांत बेलपत्रे, मनोज दुसाने, शशी पाटील, आबा पाटील, सुपडू जाधव, प्रल्हाद सावडकर, प्रवीण गावंडे, प्रभु झाल्टे, विनोद नाईक, सचिन तायडे, संदीप पाटील, पवन सावडकर, गोपाल माळी, गणेश सातवे, अमोल मराठे, वैभव पाटील, किरण पाटील, नीरज चौधरी, राहुल इंगळे, पवन भोई, अनिकेत सिसोदे, पवन चोपडे, कुंदन साळुंखे, कुणाल पाटील, गोपाल माळी, दिलीप साळुंके, हर्षल जैन, राहुल बाविस्कर, राहुल भोईटे, पिंगला भोई,…

Read More

‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’च्या जयघोषात चौदा जोडप्यांच्या हस्ते महाआरती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : ‘बोल बम का नारा है, बाबा एक सहारा है’, ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमोस्तुभ्यंम’च्या जयघोषाने भक्तीमय वातावरणात सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी सकाळी चौदा जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. सोनी नगरातील भाविकांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात नंदीदेवता आणि महादेवाच्या शिवलिंगाला पहाटे नीलेश जोशी आणि नरेश बागडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. श्रावण महिना हा महादेवाला प्रसन्न करण्याचा पवित्र महिना असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. तसेच रक्षाबंधन हा सण सोमवारी आल्याने महादेवा….‘भाऊ-बहिणीसह भाविकांना सद्बुद्धी देवो, सर्वांना सुख समृद्धी लाभो’ अशी प्रार्थना आरतीचे मानकरी…

Read More

चाळीसगावला रोटरी क्लब, शहर पोलीस स्टेशनतर्फे स्तुत्य उपक्रम साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त चाळीसगाव पोलीस स्टेशन आवारात झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शिबिराला अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँक, दत्ता भदाणे, डॉ.आसिफ अली, प्रवीण पाटील आणि त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. शिबिरात १५ पोलीस, २५ रोटरी सदस्य, गावातील इतर ३० नागरिक असे ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात रोटरीच्या महिला सदस्या पूजा मालपुरे, विजया बोरसे, मनीषा मालपुरे, दर्शना येवले, दीपाली सोनगिरे, नेहा शाह यांनीही स्वयंस्फूर्तीने…

Read More

मान्यवरांकडून पुस्तकाचे होतेय कौतुक साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी लिखित आणि नाशिकच्या ज्ञानसिंधु प्रकाशनद्वारा प्रकाशित ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकांचे प्रकाशन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या.संगीतराव पाटील, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक एम.डी. बागुल, प्राचार्य बी.पी. पाटील, प्राचार्य एस.एस. राठोड, मुख्याध्यापिका मिना बागुल,शेठ नारायण बंकट वाचनालयाचे ग्रंथपाल ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, पर्यवेक्षक सी.डी. पाटील, लेखक सतीश सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सतीश सूर्यवंशी लिखित ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तक त्यांच्याकडून मान्यवरांना भेट दिले जात आहे. त्यामुळे…

Read More

चाळीसगाव इंडियन मेडिकल असोसिएशनची आर्त हाक साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : कोलकत्ता येथील आर.जे.वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका महिला डॉक्टरवर अत्याचार, बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. डॉक्टरांनी आपआपले हॉस्पिटल्सचे बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून, काळ्या फिती बांधून निदर्शने करून, घोषणा देत आंदोलन करुन निषेध नोंदविला. ‘लाडकी बहिण नको….आम्हास ‘सुरक्षित बहिण’ हवी’, अशी चाळीसगाव इंडियन मेडिकल असोसिएशनने आर्त हाक दिली. दरम्यान, अत्यावशक सेवा सुरु होत्या. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन, वीर सावरकर चौकात धरणे आंदोलन केले. घोषणा देत तहसीलदार, माजी खासदार उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार, माजी खासदार…

Read More

छत्रपती शाहू महाराज संस्था, माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : येथे मजूर, शेतकरी, गरजू नागरिकांना ‘फॅमिली हेल्थ’ कार्डचे सभासद नोंदणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. शिबिराचा २५० सभासदांनी लाभ घेतला. ‘फॅमिली हेल्थ’ कार्डमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांमध्ये लागणाऱ्या बिलांमध्ये वीस ते पन्नास टक्केपर्यंत सभासदांना सूट मिळणार आहे. त्यात ओपीडी, सोनोग्राफी रक्त तपासणी, अति दक्षता उपचार आदी समाविष्ट केले आहे. बऱ्याच दिवसांपासून माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांचा आग्रह असल्याने लोहारा येथे शिबिर लावण्यात आल्याचे छत्रपती शाहू महाराज संस्थेचे प्रकल्पाधिकारी आकाश एस.आर.के यांनी सांगितले. यावेळी विकासाचे चेअरमन प्रभाकर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, छत्रपती शाहू महाराज संस्थेचे फिल्ड…

Read More

एका घरातील एक बहिणीला एक साडी गिफ्ट घरपोच देण्यात येणार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी: भडगाव तालुक्यातील मतदार संघातील सर्व बहिणींना रक्षाबंधनानिमित्त आ.किशोर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मतदारसंघातील पाचोरा आणि भडगाव शहरासह ग्रामीण भागातील एका घरातील एक बहिणीला एक साडी गिफ्ट घरपोच देण्यात येणार असल्याचे आ.किशोर पाटील यांनी शुभेच्छा देतांना सांगितले. विधानसभा पार पडेपर्यंत उमेदवारांची होणार दमछाक तर मतदारांची ‘बल्लेबल्ले’ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जनहिताच्या योजना अंमलात आणून त्याचा लाभ जनतेला दिला जात आहे. पाचोरा – भडगाव मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आ. किशोर पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि संभाव्य अपक्षासाठी तयारी करत असलेले विधानसभा…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांसह पदोन्नतीप्राप्त समाज बांधवांचा गौरव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने नुकताच साजरा करण्यात आला. जिव्हेश्वर युवक मंडळातर्फे ओक मंगल कार्यालयात यानिमित्त गुणवंत विद्यार्थी, पदोन्नतीप्राप्त समाज बांधव यांना गौरविण्यात आले. प्रारंभी समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव रामदास डहाके यांनी पोथी वाचन केले. गौरव आखडकर आणि प्रियंका आखडकर ह्यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा झाली. दिनेश लोखंडे आणि गिता लोखंडे या दाम्पत्यांनी पालखीचे पूजन केले. यानंतर जिव्हेश्वर महिला मंडळाच्या उपस्थितीत दीपाली खंडारे यांनी भगवान जिव्हेश्वरची भजने म्हणून मोठ्या जल्लोषात भगवान जिव्हेश्वरच्या नामघोष करुन महिला मडंळाने फुगड्या खेळुन पालखी यात्रा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा सत्कारमूर्ती पदोन्नती नायब…

Read More