Author: Sharad Bhalerao

सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून केले सादरीकरण साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवामध्ये सोयगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सादरीकरण केले. त्यात कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचे दोन गट सहभागी झाले होते. गोंदेगावातील एस.बी. हायस्कुलचा एक गट सहभागी झाला होता. त्यापैकी तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात सोयगावातील कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचा द्वितीय गटाला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचा सादरीकरणाचा विषय ‘ए आय आणि समाज’ होता. द्वितीय क्रमांकावर एसबी हायस्कुल गोंदेगावचा गट होता. त्यांचा विषय ‘आरोग्य आणि स्वच्छता’ हा होता तर तृतीय क्रमांक कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुलचा प्रथम गटाला मिळाला. त्यांनी ‘जागतिक जल संकट’ विषयावर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण परीक्षणासाठी…

Read More

आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, महिलांचा सहभाग साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोयगाव येथे आंदोलन करुन मोर्चा काढण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह सोयगावातील नागरिकांसह महिलांनी मोठ्या संख्येने निषेध आंदोलनात सहभाग घेतला होता. आंदोलनास शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह सोयगावातील नागरिकांसह महिलांनी आपला सहभाग घेतला होता. यावेळी शिवज्योती शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ज्योती काळे, उबाटा गटाचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.इंद्रजीत साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी काळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप मचे, तालुका संघटक गुलाबराव कोलते पाटील, दिनेश हजारी, कृष्णा…

Read More

पाचोऱ्यातील आयोजित मेळाव्यात दिलीप वाघ यांना आमदार करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : आमदारकीचे ‘स्वप्न’ पाहणाऱ्यांना माझीच मोठी भीती आहे. त्यामुळे माझ्यासंदर्भात चुकीच्या अफवा पसरवून दिशाभूल केली जात असल्याचे पाचोरा मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समर्थक व हितचिंतकांच्या मेळाव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करून दिलीप वाघ यांना विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने ५८ दिवे पेटवून दिलीप वाघ यांचे औक्षण करण्यात आले. विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांना सन्मानित केले. गेल्या साठ वर्षांपासून वाघ घराणे समाजसेवेत सक्रिय आहे. सत्ता असो वा नसो लोकसेवा आमचे व्रत आहे. प्रवेश सोहळे करून एकमेकांना धक्के…

Read More

गंभीर अवस्थेत जळगावला हलविले, प्रकृती स्थिर साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शहरातील गजबजलेल्या वाकी रस्त्यावरील ‘माऊली किराणा’जवळ भीषण अपघात घडला. अपघातात वाकी बु. येथील सोनेश्वर मंदिराजवळील दर्शन पार्कमधील रहिवाशी तथा महाराष्ट्रभर स्वच्छ, सुंदर, आरोग्य मिशनबाबत जनजागृती करणारे पथनाट्याचे कलावंत संतोष सराफ हे सिमेंट मिक्सर वाहनाच्या चाकाखाली आल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यांना लागलीच रुग्णवाहिकेने जळगाव येथे खासगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. सविस्तर असे की, पथनाट्याचे कलावंत संतोष सराफ हे दर्शन पार्क येथील घराकडून वाकी…

Read More

जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी घेतली महिलांची भेट साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी : येथील महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचे फटाके फोडून स्वागत केले. तसेच जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांनी महिलांची भेट घेत विविध योजनांच्यासंदर्भात महिलांशी दिलखुलासपणे चर्चा केल्या. ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अकाऊंटवर जमा होत असल्याने महिलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. महायुती सरकार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, साधना महाजन यांचे आभार मानले. विरोधक करीत असलेल्या अफवांना महिलांनी बळी पडू नये, सलग पाच वर्ष महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होतील, असे साधना महाजन यांनी सांगितले. जामनेर मतदार संघ हा आपला परिवार आहे. त्यामुळे नक्कीच लोहारा नगरीशी माझे नाते घट्ट जोडलेले आहे. म्हणून…

Read More

दंगलीत दहा ते बारा जण जखमी, ॲट्रॉसिटीसह परस्परविरोधी तक्रारीवरून ९३ जणांवर गुन्हा दाखल साईमत/चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील अडावद येथे बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावातील तडवी आणि मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये तकिया मशिदीजवळील मागील बाजुस ट्रस्टच्या मालकीच्या असलेल्या रिकाम्या जागेवर मदरसा बांधण्याच्या कारणावरुन वाद सुरु आहे. त्या वादाच्या कारणावरुन मुस्लिम आणि तडवी समाजाच्या ४० ते ५० जणांनी एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक करुन शिवीगीळ, दमदाटीसह चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेत दोन्ही गटातील जवळपास १२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चोपड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी परस्परांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, अडावदमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी…

Read More

टाकरखेडा शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांचा स्तुत्य उपक्रम साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील जि.प.मराठी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी बोदवड येथील आत्मसन्मान फाउंडेशन संचलित प्रमिलाई व मोहनराव परिवार मनोरुग्ण निवासी पुनर्वसन प्रकल्पात वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मनोरुग्णांना भोजनासह रक्षाबंधननिमित्त १२ महिला रुग्णांना कपड्यांचे वाटप तसेच त्यांनी संपादित केलेले “माय-बाप”, स्वलिखीत चारोळी काव्यसंग्रह, किलबिल पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मनोरुग्ण किंवा निराधार लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. समाजात अशी काही ठराविक माणसे आहेत की, अशा मनोरुग्ण किंवा निराधार लोकांविषयी काळजी वाटते. अशावेळी ते मदतीचा हात पुढे करतात. त्यामुळे त्यांना दानशूर व्यक्तींमुळे हातभार लागतो, असे मनोगत पी.टी.पाटील यांनी व्यक्त केले. यांची होती उपस्थिती यावेळी…

Read More

निरंतर रुग्ण सेवा कायम सुरू राहण्याची दिली ग्वाही साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : पनवेल (मुंबई) येथील डोळ्यांसाठी प्रसिद्ध असलेले आर झुणझुणवाला ट्रस्टचे शंकरा आय हॉस्पिटलला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भेटीत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील गरजू रुग्णांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन कसे होते ? त्यांची राहण्यासह जेवणाची सोय कशी असते? त्याची माहिती जाणून घेतली. गेल्या ९ महिन्यांपासून मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेकडो रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करवून त्यांना नवी दृष्टी दिली आहे. मतदारसंघात आपल्या नागरिकांचे आपण काही देणे लागतो, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सतत अशी रुग्ण सेवा करीत असतात. यानिमित्त हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी तेथील…

Read More

उच्च शिक्षणासाठी लवकरच होणार रवाना साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी : येथील बांधकाम व्यावसायिक, सामाजिक, राजकीय पदाधिकारी दत्ता बोरसे पाटील यांचा चिरंजीव सिद्धेश बोरसे पाटील यांची ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ संस्थेत एमएससी फायनान्स कोर्ससाठी निवड झाली आहे. ते लंडन येथे उच्च शिक्षणासाठी लवकरच रवाना होणार आहेत. हा दोन कोर्स वर्षांचा असतो. मात्र सिद्धेश बोरसे हा कोर्स एकाच वर्षांत पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल माजी आ.दिलीपभाऊ वाघ, पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांनी सत्कार सन्मान केला. यावेळी सिद्धेशचे वडील दत्ता बोरसे पाटील, पीटीसीचे संचालक खलील देशमुख, विनय जकातदार, रणजित पाटील, हारुण देशमुख आदी उपस्थित होते.

Read More

नदीचा प्रवाह वाढला, मुसळधार पावसामुळे तितुर डोंगरी नदीला पूर साईमत/ चाळीसगाव /प्रतिनिधी : तालुक्यात असलेल्या जागृत पाटणादेवी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी सततच्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराजवळून रस्त्यापर्यंत आणणाऱ्या पुलावरून तिथून डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे काही तास भाविकांना पाण्याचा स्त्रोत कमी होईपर्यंत मंदिर परिसरातच थांबावे लागले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तितूर डोंगरी नदीचा प्रवाह कमी झाला. त्यामुळे पाटणादेवी मंदिरात जाणाऱ्या पुलावरून पाणी कमी झाल्यानंतरच भाविकांना रस्त्यापर्यंत येता आले. मात्र, सततच्या पावसामुळे दर्शनासाठी गेलेले भाविक काही तास पाटणादेवी मंदिरातच अडकून पडले होते.

Read More