Author: Sharad Bhalerao

माजी आ.दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत घेतला समाचार साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा-भडगाव मतदार संघातील भडगाव येथे शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी होणारा शेतकरी मेळावा हा महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमुळे सोमवारी, २६ ऑगष्ट रोजी भडगाव येथे होणार आहे. मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भडगाव शेतकी संघ व पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आ.किशोर पाटील यांनी केले. स्व.आर.ओ.पाटील हे वैशाली सूर्यवंशी यांचे वडील असले तरी ते माझे ‘राजकीय बाप’ आहेत. त्यांचा आदर आणि आदर्श आयुष्यभर माझ्या व माझ्या परिवाराच्या ह्रदयात राहणार असल्याचे सांगत माजी आ. दिलीप वाघ आणि वैशाली सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार आ.किशोर पाटील यांनी घेतला. शिवालय…

Read More

सरपंच, उपसरपंचासह सदस्यांच्या निर्णयाचे स्वागत साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : बदलापुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा अध्यादेश काढलेला आहे. त्यातच तालुक्यातील वडोदा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेत सरपंच स्वप्ना संदीप खिरोळकर, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांनी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून तरतूद करत शाळेत १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तालुक्यातील वडोदा येथील मराठी शाळेत ३५० विद्यार्थी संख्या आहे. मुलांची शाळेसह परिसरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय वढोदा येथील सरपंच, ग्रा.पं.सदस्यांनी घेतला. यावेळी सरपंच स्वप्ना खिरोळकर, उपसरपंच रंजना कोथळकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष…

Read More

गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात धनंजय चौधरी यांचे प्रतिपादन साईमत/निंभोरा, ता. रावेर/प्रतिनिधी : आपण समाजाचे देणे लागतो हा भाव कायम ठेवून कार्यरत व्यक्तींचा समाजासमोर आदर्श ठेवता येतो, असे प्रतिपादन युवा नेते धनंजय चौधरी यांनी केले. येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांच्या मातोश्री स्व. कलाबाई देवीदास ठाकरे यांच्या स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. निंभोरा येथील स्टेशन रोड भागातील सौ.डी.आर.चौधरी माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन ज्ञानदेव गणपत नेमाडे होते. आपल्या पूर्वपरिस्थितीची कायम जाण ठेवून पुढे केलेला मदतीचा हात पुण्यकर्म असल्याच्या भावना मधुस्नेह संस्था परिवाराचे समन्वयक तसेच माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी व्यक्त केल्या. व्यासपीठावर सरपंच सचिन महाले, तंटामुक्तीचे…

Read More

चार ते पाच गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता, सा.बां.उपविभागाला सांगूनही काम होईना! साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील सातोड गावा जवळील एका पुलावरील वाळूचा भराव संततधार पावसामुळे वाहून गेल्याने याठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. नागरिकांनी मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करूनही डागडुगी होत नसल्याचा आरोप केला आहे. मुक्ताईनगरपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील सातोड गावाजवळील पूल पावसाच्या पाण्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून भराव वाहून जात असतो.पूल हा दोन तालुक्याला तसेच चार ते पाच गाव जोडणारा आहे. वारंवार त्याची माहिती मुक्ताईनगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाला तसेच सोशल मीडियाद्वारे करूनही लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी घटनेकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना…

Read More

अनेकांचे आधार लिंक नाही, धानोरा बँकेचे नियोजन ‘कोडमडले’ साईमत/धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी : ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ ही एक जुलैपासून सुरू केली आहे. त्याचे पैसे १७ ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पडण्यात सुरुवात झाली. मात्र रक्षाबंधनाची सुट्टी तसेच विविध सुट्ट्या मध्ये आल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून धानोरासह परिसरातील महिलांची हजाराेच्या संख्येने बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी नजरेस पडत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्या कारणामुळे बँकेचेही नियोजन ‘कोडमडले’ आहे. महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश शासनाप्रमाणे ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना’ सुरू केली आहे. त्याचे अर्जही भरले गेले. काहींना अक्रोड असे मेसेज आले तर काहींचे रिजेक्ट असे मेसेज मोबाईलवर आले. त्यात १७ तारखेपासून…

Read More

पूर्ण डांबरीकरणची मागणी, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष साईमत/धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी : तीन राज्यांना जोडणारा एकमेव बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नियमित अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे हाडे ‘खिळखिळी’ झाली आहे. सध्या पूर्णपणे हा महामार्ग खराब झाला आहे. यामुळे कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालवता येत नाही. जागोजागी फूटभर खड्डे पडलेले आहे. यामुळे वाहन चालवावे तरी कसे? असा प्रश्न महामार्गावरील प्रत्येक वाहनधारकांना पडत आहे. दुसरीकडे याच महामार्गावर नियमितपणे वाहतूक शाखेकडून वसुली होत असल्याने वाहनधारक चांगलेच कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे.त्यामुळे पूर्ण महामार्गाचे उच्च प्रतिचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सविस्तर असे की, गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेश अशा तीन राज्यांना जोडणारा बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा एकमेव महामार्ग आहे. हा मार्ग…

Read More

ह.भ.प. शिरीष महाराज व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/यावल/प्रतिनिधी : जाहीर व्याख्यानातून समाजात जनजागृती होऊन सकारात्मक विचारांचा प्रसार होतो, असे प्रतिपादन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले. येथील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांचे जाहीर व्याख्यान झाले. व्याख्यानाचा लाभ अनेक भाविक श्रोते नागरिकांनी घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजक म्हणून डॉ.कुंदन फेगडे समारोप प्रसंगी बोलत होते. डॉ.कुंदन फेगडे (अध्यक्ष, आश्रय फाउंडेशन, जळगाव जिल्हा सरचिटणीस – भाजपा वैद्यकीय आघाडी) यांच्या पुढाकाराने ह.भ.प.शिरीष महाराज यांचे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास तालुक्यातील भक्त आणि संत साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिरीष महाराजांनी आपल्या प्रवचनात संत तुकाराम…

Read More

मुलींच्या सुरक्षतेबाबत जागरूक राहण्याचे जयश्री पाटील यांचे आवाहन साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटांसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या एक हजार १०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त येथील आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्यातर्फे पैठणी साडी देऊन सभारंभपूर्वक गौरविण्यात आले. चोबारी येथील स्व.देना पाटील माध्यमिक विद्यालयात झालेल्या रक्षाबंधन व स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या जयश्री पाटील होत्या. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी झटणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकर्त्या भगिनींच्या परिश्रमाची भाऊ या नात्याने दखल घेऊन माझ्या बहिणींना पैठणी समारंभपूर्वक देऊन गौरविणे माझे नैतिक कर्तव्य समजतो, असे कार्यक्रमाचे संयोजक बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी…

Read More

सावित्रीबाई फुले विद्यालयाचे ‘जलदूत’ अव्वल, लिटल फ्लॉवर्स द्वितीय तर गरुड विद्यालय तृतीय साईमत/जामनेर/प्रतिनिधी : शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनासह नाट्यसंस्कार रुजविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या जलदुतांनी सादर केलेली ‘जलजागराची दिंडी आली हो गावा’ ही नाटिका प्रथम आली. जामनेर येथील लिटिल फ्लॉवर स्कुलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक तर वाकडी येथील भास्करराव खंडेराव गरुड विद्यालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांच्या हस्ते तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातून १३ शाळांच्या बालवैज्ञानिक नाट्य कलावंतांनी त्यात सहभाग नोंदविला. जागतिक जलसंकट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज, स्वच्छता आणि आरोग्य, आपत्ती…

Read More

रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशनसह स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी बैठक घेवून रेल्वे संदर्भात विविध विषयांवर चर्चा करून कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक इती पाण्डेय यांची उपस्थिती होती. बैठकीच्या सुरूवातीला इती पाण्डे यांनी रेल्वे विभागात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा संदर्भात सविस्तर माहिती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना दिली. त्यात विविध रेल्वे प्रकल्प, अपग्रेडेशन आणि स्थानिक सुविधांच्या संदर्भात माहिती सादर करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी रोड अंडर पास, रोड ओव्हर ब्रीज, पाचोरा, जामनेर, बोदवड रेल्वे कामाचा आढावा, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मलकापूर, नांदुरा,…

Read More