नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन झाले ‘सुन्न’ साईमत/वरणगाव/प्रतिनिधी: येथुन अयोध्या आणि तेथुन गोरखपूरहुन खासगी बसने नेपाळ येथे देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची बस ५०० फुट खोलदरीतील नदी पात्रात पडल्याने भुसावळ तालुक्यातील २५ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामध्ये वरणगाव, तळवेल, दर्यापूर, सुकळी (ता. मुक्ताईनगर) आणि भुसावळमधील भाविकांचा समावेश आहे. मयतांवर रात्री उशिरा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित जख्मींवर नेपाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. नेपाळमधील अपघाताच्या घटनेमुळे समाजमन ‘सुन्न’ झाले आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेतील ११० भाविक हे १६ ऑगष्ट रोजी अयोध्या येथील रामकथा श्रवणाला गेले होते. तेथील कथेची सांगता झाल्यानंतर सर्व भाविक गोरखपूर येथुन चार खासगी ट्रॅव्हल्स बसने नेपाळ…
Author: Sharad Bhalerao
शिवसेनेच्या वाघाला, दिलीप वाघांचे चॅलेंज! आमदारांनी पत्रकार परिषदेत अभ्यास करून बोलावे साईमत/पाचोरा/प्रतिनिधी: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पाचोरा मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांमध्ये ‘कलगीतुरा’ सुरू झाला आहे. विद्यमान आणि माजी आमदार, शिवसेना उबाठाचे घोषित उमेदवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहे. माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या मेळाव्यात आ. किशोर पाटील यांच्या कार्यशैलीवर टीका व आरोप केले होते. आ.किशोर पाटील यांनीही प्रत्युत्तर देण्यासाठी माजी आमदारांसह उध्दव ठाकरे सेनेच्या संभाव्य उमेदवारांचा खरपुस समाचार घेतांना दिलीप वाघ यांना केलेल्या टीकेत अनेक आव्हाने दिली होती. आमदारांनी दिलेल्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी दिलीप वाघ यांनी शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदारांचे…
धानोरा विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांचा आदर्श उपक्रम साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी: धानोरा येथील सातपुडा शिक्षण संस्था संचालित कै.झिपरु तोताराम महाजन माध्यमिक विद्यालय व नामदेव भावसिंग पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या किरण उमेश कोळी या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या निर्णयाचे धानोरा परिसरातून कौतुक होत आहे. धानोरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी किरण कोळी याच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे घराचा संपूर्ण भार आणि मुलाची शैक्षणिक जबाबदारी एकट्या त्याच्या आईवर आली होती. ही गोष्ट विद्यालयातील शिक्षक एस.एस.पाटील यांच्या कानावर आली. अशावेळी त्यांनी किरणचा संपूर्ण शैक्षणिक खर्च तसेच त्याला लागणारे शालेय…
महाविकास आघाडीने दिले तहसिलदारांना निवेदन साईमत/जामनेर/प्रतिनिधी: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील महिला व मुली सुरक्षित नाही. रोज अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आता तर ज्ञानदानासारख्या पवित्र ठिकाणीही घाणेरडे कृत्य होत असल्याच्या भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध करतांना येथील तहसील कार्यालयात व्यक्त केल्या. याबाबत जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथील दोन चिमुकलींवर अत्याचार घडल्यानंतर त्यांचे पालक संबंधित पोलीस स्टेशनला गेल्यानंतर १२ तास उलटूनही गुन्हा नोंदविला नाही. त्याचप्रमाणे कोल्हापूर, पुणे, अकोला, नागपूर, लातूर, नाशिक, मुंबई या मोठ्या शहरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातही दररोज अत्याचाराच्या घटना…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी: खेड्या-पाड्यातील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या असलेल्या शिष्यवृत्ती आणि वसतीगृहाच्या विविध योजना तसेच त्यासाठी असणारे निकष, पात्रता, कागदपत्रांविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांसाठी सरकारी योजनेतून शिक्षणाच्या आर्थिक खर्चाची तरतूद आहे. त्यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. यासाठी शासन प्रयत्नशील असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभाग प्रमुख संतोष मनुरे यांनी केले. येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता असलेल्या ‘विविध शासकीय शिष्यवृत्ती व धोरण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.…
नेपाळ दुर्घटनेतील मृत भाविकांना श्रद्धांजली साईमत/चोपडा/प्रतिनिधी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे (काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, आणि उबाठागट) बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निषेध मूक आंदोलन करण्यात आले. शनिवारी मविआतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला होता. परंतु उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांच्या आदेशाचे पालन करून आदर राखून महाराष्ट्र बंद रद्द करण्यात आला. त्याऐवजी बदलापूर येथील घटनेच्या शासनाच्या व प्रशासनाचा नाकर्तेपणाचा निषेध महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. तसेच नेपाळ येथील दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविक पर्यटकांचे अपघाती निधन झाले. त्यांना…
राजपूत समाजबांधवासह महिला मंडळाचा सहभाग साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी : येथून जवळील पाळधी येथील समस्त राजपूत समाजाच्यावतीने धने (भुंजरिया)चा विसर्जनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये ढोलताशे, लेझीमच्या पथकाने गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये तरुणांनी चित्तथरारक लाठीकाठी प्रात्यक्षिक करून दाखवले. भुंजरिया सण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस, चांगले पीक, आणि सुख-समृद्धीसाठी साजरा केला जातो. यावेळी उपस्थित समस्त राजपूत समाजबांधव आणि महिला मंडळ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. श्रावण महिन्याच्या अष्टमी आणि नवमीला बांबूच्या छोट्या टोपल्यात मातीचा थर टाकून गहू किंवा ज्वारी पेरली जाते. त्यानंतर त्यांना दररोज पाणी दिले जाते. श्रावण महिन्यात भुजऱ्यांना झुला देण्याची प्रथा आहे.…
यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील होते. बैठकीला रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, जळगाव महानगर कार्याध्यक्ष संग्रामसिंग सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी तालुक्याचा आढावा घेतला. आगामी काळात पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच रावेर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश…
फैजपुरला दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी लि.संस्थेची ४७वी वार्षिक सभा खेळीमेळीत साईमत/फैजपूर, ता.यावल/प्रतिनिधी: येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्थेने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधावर प्रतिलिटर (४.५) साडे चार रुपये व गाईच्या दुधावर प्रतिलिटर (३.५) साडेतीन रुपयाप्रमाणे प्रोत्साहन भाव फरक, सर्व दुधावर प्रति लिटरवर (०.६०) साठ पैसे बोनस, १३ टक्के लाभांश, मिटिंग भत्ता (२००) दोनशे रुपये व दुधाच्या प्रमाणात बक्षीस देण्याचे संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले. संस्थेने जाहीर केलेल्या रकमा दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे चेअरमन नितीन राणे यांनी सांगतले. सर्व दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध पुरवठा करण्याचे आवाहन केले. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. फैजपूर…
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची पत्रकार परिषदेत माहिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, २५ ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहेत. सध्याची पावसाची स्थिती असल्यावरही दौऱ्याच्या सर्व तयारी प्रशासनाकडून पूर्णत्वास आल्या आहेत. ‘लखपती दीदी’ सोहळ्यानिमित्त होणारा कार्यक्रम ऐतिहासिक होणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी शुक्रवारी, २३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे सीईओ अंकीत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी उपस्थित होते. ना.गिरीष महाजन पुढे म्हणाले की, ज्या कष्टाळू महिलांनी स्वबळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमवले आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत कुटुंबियाना हलाखीच्या…